Skip to main content

अध्यात्म विराम १९३

अध्यात्म विराम १९३

आता अश्रद्ध जनांची वृत्ती आणि त्याबद्दल जाणूया. अश्रद्ध लोक दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे आपला म्हणजे सनातन धर्माचे ज्याचे ज्ञान जगाला करून दिले आहे त्या ईश्वराला, न मानता, एका वेगळ्याच प्रणेत्याला ते मानतात. त्यातही त्यांची धारणा इतकी आत्यंतिक असते की, त्यांच्या मानलेल्या धारणेतील प्रणेत्याला सोडून बाकी कोणीही अस्तित्वात नाही, हीच त्यांची वृत्ती करून देण्यात आलेली असते. त्यामुळे यांची श्रद्धा ही संकुचित असते. वास्तविक सनातन धर्माने ईश्वर हा एकमेव आहे आणि तो सर्व निर्मित धर्मांच्या पलीकडे आहे, हे सप्रमाण आणि वारंवार सिद्ध केलेले आहे.

पण त्याला खोटं ठरवून, आमचाच आणि आम्ही मानत असलेला प्रणेता हाच खरा ईश्वर आहे आणि त्याला सर्वांनी मानावं. त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. इथे एक मुद्दा स्पष्ट करतो की, या जगताचा आणि जगतात आलेल्या प्रत्येक मानवाचा जन्माने धर्म एकच आहे. तो म्हणजे सनातन धर्म. या व्यतिरिक्त मानव निर्मित कोणतेही इतर धर्म हे वरून पांघरलेली शाल आहेत. त्या आतील माणूस आणि त्यांचा मूळ धर्म हा एकच आहे आणि एकच राहणार. 

याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण मानलं म्हणून जसं काळा रंग पांढरा असतं नाही किंवा स्त्री ही पुरुष असू शकत नाही. त्याचप्रमाणे मी मला सनातनी न मानता, अमुक एक धर्मातील मानला, तरीही मूळ स्वरूप बदलू शकत नाही. तुमची धारणा ही तुम्ही घातलेल्या चुकीच्या चष्म्यामुळे आहे. तो चष्मा ज्यावेळी उतरतो, त्यावेळी हा देह संपलेला असतो. पण माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो स्वतः चुकीचा चष्मा लावून, आपल्याला दिसणारं जग हेच खरं आहे आणि त्याव्यतिरिक्त असणारं जग हे अस्तित्वहीन आहे किंवा त्यांनासुद्धा आमचाच चष्मा घालावा, ही असुरी वृत्ती या चुकीच्या चष्म्याने बळावली आहे. 

अर्थात या जगतात निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीला एक निश्चित आयुष्य आहे आणि तो दिवस आला की, हे चष्मे आपोआप गळून पडतील. पण तोपर्यंत श्रद्धावान लोकांनी या जगताच्या निर्मात्या इश्वरावर पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास ठेवावा. कारण आपण येण्याआधी व आपण गेल्या नंतर सुद्धा हे जग असणार आहे. त्यामुळे त्याच्या निर्मात्याला आपल्याहून जास्त चिंता आहे आणि असणार, हे ध्यानात असूद्या. तरच आपली श्रद्धा पूर्णांशाने त्या एकाच इश्वरावर राहील. 

तर हा अर्धवट अश्रद्ध लोकांचा प्रकार पाहिला. आता पूर्णतः अश्रद्ध लोक, हे या जगतात आपला जन्म आणि आपलं या जगातून निर्गमन, या मधल्या, आपल्या जीवित अवस्थेतील,उण्यापुऱ्या साठ,सत्तर ऐंशी वर्षाच्या काळात हे सिद्ध करण्यात मग्न असतात की, ईश्वर नाही. याचं त्यांचं महत्वाचं तार्किक पाया म्हणजे, मी मानत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही दाखवून द्या, हा ईश्वर. म्हणजे त्याने नस्तिकातून अस्तिकात यावं, याची जणू काही आम्हालाच गरज आहे. 

मी अश्या लोकांना, स्पष्ट सांगतो, तुम्हाला समजावून सांगण्याची व तुम्हाला आस्तिक करण्याची कोणतीही जबाबदारी, या जगताच्या ईश्वराने, मला दिलेली नाही. माझं ते कार्य नाही.जर तुम्हाला तसं वाटावं,असं ईश्वराला वाटलं तर नक्की तुम्हाला तो अस्तित्व दाखवेल. पण तोपर्यंत तुम्ही खुशाल तुमची नस्तिकपणाची झूल अंगावर बाळगून आयुष्य काढा. 

अर्थात, ज्याने या जगात पाठवलं आहे आणि जन्म व मृत्यू या पलीकडील काहीही ज्ञान आपल्याला नसताना, फक्त काही वर्षांच्या अनुभवाने, या करोडो वर्षांच्या ब्रम्हांड पसाऱ्याचा किंवा व्यापाचा निष्कर्ष, एका क्षणात किंवा स्वतःच्या आयुष्यातील,एखाद्या प्रसंगातून काढणाऱ्या, अश्या अज्ञानी जनांना, ईश्वरच काय तो मार्ग दाखवेल. 

त्यामुळे अश्या अश्रद्ध व अर्धश्रद्ध जनांची अनन्यता ही, अळवावरच्या पाण्यासम असते. तितकीच भासमान जितकी त्यांची अश्रद्ध वृत्ती. असो. आता पूर्ण श्रद्धावान जनांची अनन्यता ही कशी असावी,जी अनन्यता , ईश्वराला अभिप्रेत आहे, त्याचं चिंतन, उद्याच्या भागात करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...