Skip to main content

अध्यात्म विराम १९१

अध्यात्म विराम १९१

ईश्वराला, कलियुगात घडत जाणाऱ्या घटना, दिसल्या असणार. त्या अनुषंगाने ईश्वर भक्तीत होत जाणारी घट आणि भक्तीपेक्षा, देवाची, ईश्वराची हेटाळणी करण्याने संतुष्ट होणारी वाढती प्रजा, या गोष्टी नक्कीच त्रिकाल ज्ञान यामुळे, माहीत असणार,नव्हे दिसलं सुद्धा असणार. त्यामुळे ते घडतं असताना सुद्धा, भक्तांच्या मनोधैर्याची पातळी कमी न होता, निदान आहे ती राखली जाईल, त्यासाठी भक्तांनी काय केलं पाहिजे, याची रूपरेषा, ईश्वराने गीतेतील त्या श्लोकात स्पष्टपणे सांगितली आहे. लक्षात घ्या, ईश्वर जो निर्गुण, निराकार परब्रम्ह आहे, त्याला आपल्या स्तुतीने आणि टीकेने काही फरक पडत नाही किंवा पडणार नाही.

पण भुलोकी आलेला प्रत्येक जीव आपली अध्यात्मिक व पारमार्थिक उन्नती करवून घेण्यास पात्र आहे, या एका सद् इच्छेने ईश्वराने, खास कलियुगासाठी भक्ती आणि साधना यांच्या सुलभते साठी, अत्यंत सोपा राजमार्ग, सामान्य जनांसाठी आखून दिलेला आहे. राजमार्ग म्हटल की त्यावर कोणीही चालू शकतो व ईश्वराने सांगितलेल्या धोरणानुसार पावलं टाकली की, ईश्वराकडे आत्मरुप पोचण्याचा शुद्धिमार्ग नक्कीच आपल्याला हाती लागेल. शुद्धीमार्ग यासाठी म्हटलं की, ईश्वर हा अत्यंत, शुद्ध व सात्विक स्वरूप आहे. 

त्यामुळे त्याच्याकडे पोचण्यासाठी या जगतात जन्मो जन्मी मलिन झालेला आत्मा, शुद्ध करून मगच तिथपर्यंत जातं येते. पण त्यासाठी अनेक शुद्धिक्रिया करणं गरजेचं आहे. त्यासाठीच ज्ञान, वैराग्य, विवेक, कर्मशुद्धी, योगक्रिया यज्ञयाग, अष्टांग मार्ग, नवविधा भक्तिमार्ग, असे अनेक उपाय ईश्वराने स्वतः योजून दिलेले आहेत. पण या सर्वात सामान्य माणसाचा पार लागणं, जन्मोजन्मी त्यावर चालता येणं आणि ते चालणं एक समान राखणं अत्यंत दुर्लभ आहे. 

कारण प्रत्येक जन्मानंतर पुढचा जन्म त्या पुढील पायरीचा मिळेल याची शाश्वती नाही. कारण शेवटी संचित आणि अन्ते मती सा गती या नुसार कोणता जन्म आपण लिहून ठेवलेला आहे, हे देखील अशाश्वत आहे. म्हणून अश्या स्थितीत प्रवाह पतीत झालेल्या सामान्य ते अती सामान्य जीवांनी काय करायचं, हा प्रश्न या श्लोकात ईश्वराने सोडवून दिलेला आहे. जो कोणी, म्हणजे यामधे, तो भक्तच असावा, त्याचं पूर्वकर्म पुण्यवान असावं, त्याने ज्ञान,भक्ती व कर्मशुद्धी साधलेली असावी,असा कोणताही नियम व अट यामधे प्रभूंनी घातलेली नाही किंवा त्यांना अपेक्षित आहे. तर असा जो कोणी, अनन्य भावाने, अनन्यतेने माझे नित्य, निरंतर चिंतन करून, माझी उपासना करेल. 

इथे नित्य का आवश्यक कारण प्रसंगोपात भक्ती किंवा ईश्वर चिंतन होऊ शकत नाही, तर तो एक निव्वळ व्यवहार वा सौदा होऊ शकतो. म्हणजे नित्य असणं आवश्यक आहे. निरपेक्ष असाव का, तर हो कारण निरपेक्ष असल्या शिवाय अनन्य होताच येणार नाही. आपण एखाद्याला आपलं मानतो पण काही योग्य आणि तार्किक कारणांमुळे तो आपल्या उपयोगात आला नाही. त्यानंतर आपण मनात म्हणालो की, तुला मी आपला मानला आणि तू मला उपयोगात आला नाहीस, मग तुझा काय फायदा.

ही अनन्यता नाही. अनन्य असणं म्हणजे, अजून एक भाव यात अपेक्षित आहे, तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणीही माझं नाही. किंवा मी दुसऱ्या कोणालाही भजत, पूजत व अर्चत नाही. म्हणजे तू एकमेव आहेस, ज्याला मी आपला मानतो आणि फक्त तुझच नित्य चिंतन करतो. बरं हे चिंतन कसं असावं, तर क्षणोक्षणी त्याची आठवण, स्मरण असाव. किंबहुना स्मरण हे विस्मरण झाल किंवा होऊ शकेल म्हणून केलं जातं. ईश्वर स्मरण हे त्याही पलीकडे असावं. 

यातील अजून काही मुद्दे आपण पुढील भागात पाहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...