Skip to main content

अध्यात्म विराम १९७

अध्यात्म विराम १९७

ईश्वराची आज्ञावली आत्म्याला देऊन, त्याला या जगतात धाडताना, ईश्वर हे नक्कीच जाणत असतो की, ही आज्ञावली, अशुद्ध आणि विकाराने ग्रस्त होऊ शकते. म्हणूनच त्याने अनेक प्रकारची साधनं निर्माण करून, ही अशुद्धता कमी करून, शुद्धता वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक देहाने करावा,अशी योजना निर्माण करून दिली. त्या साठी श्रवण कीर्तन आदी भक्तीची अंग, उप अंग निर्माण केली. 

पण प्रत्येक युगात जसजशी, माया, असुरादिक शक्तींची स्वरूपं, त्यांची अस्त्र शस्त्र, काळाचे बदलते रूप, त्यामुळे उद्भवणारी भौतिक व पारमार्थिक संकटं, आपदा, विपदा, कर्मावर येऊ शकणारी बंधनं हे सर्व जाणून, ईश्वराने कर्म कांड रहित शुद्धता वाढवणारा आणि कर्माची शून्यता हळू हळू वाढवत नेणारा सर्वोत्तम उपाय आखून दिला. आता हा उपाय कोणता, जो माणसाला मायादिक भौतिक जगताची आज्ञावली, विसरायला लावून,पारमार्थिक मार्गा वरील ईश्वरी आज्ञावली अर्थात programme कडे घेऊन जातो, यावर आता विचार करूया.

ईश्वराने आखून दिलेल्या अज्ञात मार्गाकडे जाण्यासाठी, त्या ईश्वराच्या स्मरणाचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग, आहे. त्याचं कोणत्याही स्वरूपातील, रुपातील नाम यांचं, स्मरण करून, आपण त्याला आपल्या समीप येण्यासाठी साद घालू शकतो. शास्त्र, वेद व पुराणं यांनी सांगितल्या प्रमाणे आणि संत, महंत, ऋषीमुनी यांनी दिलेल्या साक्षी प्रमाणे, ईश्वर हा हृदयात स्थित, आत्म्याच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या ईश्वर रूप परम आत्म्याला, त्याच सक्षित्वाने स्मरण करताच, तो आपल्या अस्तित्वाची साक्ष देतो.

नुसतीच साक्ष देत नाही तर आपल्या अस्तित्वाची प्रचिती देतो. पण यासाठी त्याला पाहण्याची अलौकिक दृष्टी आणि त्यासाठीची अपार श्रद्धा मात्र, मनात स्थिरपणे स्थापित असणं, गरजेचं आहे. श्रद्धा मनातील इच्छांना बांधून, त्यांना एकाच लक्षामागे स्थिर उभ करण्याची शक्ती देते आणि असलेली वाढवते. शक्ती वाढली की मनातील ऊर्जा त्या कार्याच्या मागे पूर्ण एकाग्र होऊन, कार्याला सहाय्य भूत होते. ही इच्छेची शक्ती आणि ऊर्जा प्रत्येक शुभ आणि अशुभ, सकारात्मक व नकारात्मक कार्यात लक्षापर्यंत जाण्यासाठी परिपूर्ण सहाय्य व सहकार्य करते. 

म्हणजेच एक स्मरण, इच्छेला जागृत करून, मनाला एकाग्र करून, शक्ती व ऊर्जा यांचा पूर्ण प्रवाह एकाच दिशेने जाईल आणि राहील, हे पहातं. आपल्या मनाला ज्याची जास्त गरज भासते किंवा मनाची ज्या गोष्टीकडे, उद्देशाकडे ओढ जास्त असते, त्याचं स्मरण हे मनाला सतत होत असतं. म्हणजेच मनाचा नैसर्गिक ओढा हा वासना, मोह, माया यामुळे चुकीच्या गोष्टीकडे, त्या आकर्षणामुळे जास्त असतो. 

देह, बुद्धी व मन यांमुळे, अनेकदा हा ओढा निसर्गतः चुकीच्या गोष्टीकडे अनिर्बंध असतो.अनेकदा हा ओढा, मूळ आत्म्याच्या इच्छेविरुद्ध सुद्धा मनाला, बुद्धीला व देहाला वाहून नेतो आणि अनेक अहितकारक, चुकीच्या स्मरणात, विघातक कर्म करायला भाग पाडतो. म्हणजेच स्मरण हे देहासाठी, बुद्धिसाठी, मनासाठी व आत्म्यासाठी अहेतुक व सहेतुक असतं. 

आता हे अहेतुक व सहेतुक स्मरण म्हणजे काय आणि कर्म शून्यता यावर पुढच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...