Skip to main content

राम अनुज भरत भाग २८

राम अनुज भरत भाग २८

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

लक्ष्मण क्षणाचाही विलंब न करता, नम्रपणे म्हणाला. 

"आपण मला या वनवासात तातांच्या जागी आहात. त्यामुळे आपली आज्ञा, ती माझी कर्मगती आहे. याहून दुसरं माझ्याबाबत मला आणि माझ्या नियतीला माहीत नाही." 

श्रीराम म्हणाले

" म्हणजे तुमच्या दोघांचंही मत विपरीत नाही, हा सुवर्ण संयोग आहे. आपण आता याचं परिसरात वास्तव्य करून राहूया." 

जवळपासचे काही प्रदेश पाहून झाल्यावर व निसर्गाच्या समृद्धीचा आनंद घेतल्यावर. दोन्ही बंधू आणि देवी सीता आपल्या पर्णकुटी कडे परत आले. इकडे भरत आणि त्यासोबत असलेला जनसमुदाय, सैन्य, राजपरीवार यांची पुढे मार्गक्रमणा सुरूच होती. संपूर्ण वनप्रदेश, जो घनदाट वृक्ष राजीनी व्याप्त होता, तो हळूहळू क्रमणा करत, करतं आपल्या लक्षाकडे निघाला होता. मार्ग ज्या प्रमाणे महर्षी भारद्वाज यांनी सांगितला होता, त्याप्रमाणे क्रमला जात होता.

मार्गक्रमण सुरू असतानाच, भरत, आर्य सुमंत याना विचारून, आपण योग्य मार्गाने जात आहोत याची खात्री करून घेत होता. वाटचाल करत करत ही राम प्रेमींची यात्रा मंदाकिनी आणि चित्रकूट यांच्या मधील वनाकडे हर्षाने निघालेलेली आहे. 

ही मांदियाळी श्रीराम प्रेमींची होती आणि श्रीराम भेटी साठी जाऊन, त्यांना पुन्हा माघारी बोलावून आणण्या साठी, राजकुमार भरत याच्या सोबत निघाली होती. वनांच्या या वाटचालीत, आपण साधारण मंदाकिनी च्या समृद्ध प्रदेशात पोचलो आहोत असा, अंदाज राजकुमार भरत याला आला.

म्हणून त्याने आर्य सुमंत याना सांगितले.

"आर्य, मला असं वाटतं आहे की, महर्षी भारद्वाज यांनी कथन करून सांगितलेल्या मंदाकिनी नदीच्या प्रदेशात आपण पोहोचलो आहोत. मला असही वाटतं आहे की, या उत्तर दिशेकडे नदी असावी आणि दक्षिण दिशेकडे असलेला तो पर्वत चित्रकूट पर्वत असणार. 

म्हणून आपण त्या दक्षिणेकडे असलेल्या पर्वताच्या प्रदेशा कडे जाऊया. मला विश्वास आहे की, त्या चित्रकूट आणि मंदाकिनी यांच्या मधे असलेल्या या विशाल वन क्षेत्रात ज्येष्ठ भ्राता श्रीराम,देवी सीता आणि लक्ष्मण यांसह निवास करत असतील. आपण त्या दिशेने प्रस्थान ठेवूया." 

भरताच्या आज्ञेनुसार आर्य सुमंत यांनी सैन्याला आणि प्रजाजन यांना दक्षिण दिशेने निघण्यास सूचित केले. अर्थातच, त्यानुसार सर्व सोहळा, दक्षिण दिशेकडे असलेल्या वनाच्या दिशेने मार्गस्थ झाला. काही अंतर गेल्यावर, त्या सुंदर पर्वत राजीच्या रांगा समीप दृष्टीस दिसायला लागल्या.अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय रंगसंगती,असलेल्या पर्वत कडेकपारींवर, दुपारच्या तिरक्या सूर्य किरणांनी,त्या कडेकपारींना हेम,रौप्य,ताम्र व पितवर्णी रंग छटा देऊन आपली प्रभा परावर्तित केली होती. 

या अत्यंत सुंदर दृष्यात आणि वन परिसराची निसर्ग शोभा पाहण्यात परिवार, सर्व प्रजा आणि सैन्य दंग होते. त्या समयी, श्रीराम, देवी सीता आणि लक्ष्मण परिसरा तील निसर्ग पाहून, आपल्या पर्णकुटीत परतत होते. जातेवेळी, कुटी बाहेरील चुलीची मंद केलेली धग, लक्ष्मणाने, मोठी केली आणि त्यात काही कंद मूळ भाजण्यासाठी ठेवली. त्यानंतर लक्ष्मण, आपल्या नित्याच्या सुरक्षे साठीच्या टेहेळणीसाठी, धनुष्याला बाण सज्ज करून, चारही बाजूंनी फिरून, दूर अंतरापर्यंत काही दिसत आहे का, याचं अवलोकन करायला लागला. 

अचानक लक्षणं, सवेगे, प्रभूंच्या दिशेने दौडत आला.....

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०६/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...