Skip to main content

राम अनुज भरत भाग २४

राम अनुज भरत भाग २४

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

वनाची ही स्थिती असताना, समस्त जनसागर, प्रभूंच्या दर्शन हेतूने प्रेरित होऊन, वनाचा घनदाट मार्ग, श्रीराम, देवी सीता आणि भ्राता सुमित्रा नंदन लक्ष्मण यांच्या जयघोषात व त्यांच्या स्मरणात, सूखेनैव क्रमणा करत होता. 

त्याचवेळी इकडे चित्रकूट पर्वत राजींच्या विस्तीर्ण भूभागा वर वसलेल्या त्या वनात, घनदाट वनांच्या मध्यभागी, अत्यंत सुरक्षितस्थळी एक सुंदरशी,शाकारालेली पर्णकुटी बांधून, दशरथ नंदन, रघुकुल भूषण, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, अयोध्येची कुलवधू, मिथिलाकुमारी आर्या सीता आणि अत्यंत कर्तव्य तत्पर, श्रीराम बंधू, सुमित्रा नंदन लक्ष्मण, आपल्या नित्य दिनक्रमात व्यग्र आणि व्यस्त होते. भ्राता लक्षणं आपल्या नित्य कर्माच्या पूर्ततेसाठी, अग्निसाठी काष्ठ, कंदमूळ, उत्तम उत्तम पक्व असलेली फळे, इत्यादी घेऊन येण्यासाठी, पर्णकुटी सोडून, वनात गेला होता.

आपल्या पर्णकुटीचा मार्ग प्रशस्त व्हावा,तो स्वच्छ असावा व सहज नजरेस यावा यासाठी, दोनही बंधूंनी मार्ग सुलभ व स्वच्छ करून, पुरेशी व्यवस्था केली होती. पर्णकुटीच्या मार्गात ठराविक अंतरावरील वळणांच्या स्थानी असलेल्या वृक्षांवर आपल्या ओळखी साठी, परंतु आगंतुक मार्गस्थांना समजणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊन, काही श्लोक व मंत्र या रुपात गुप्त संदेश कोरून ठेवले होते. ज्याद्वारे मात्र दोन्ही भ्राता व देवी सीता यांनाच हा मार्ग समजून येईल आणि ते वनात अन्यत्र कुठेही गेले तरीही, आपल्या पर्णकुटीकडे परतून येऊ शकतील. याचसाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. 

पर्णकुटी अत्यंत साधी पण उत्तम प्रकारचे बांबू, त्यांच्याच ताडपत्री बनवून, त्यांच्या भित्ती व छताला देखील वापरून,एक उत्तम सुरक्षित आणि मजबूत अशी पर्णकुटी तयार करण्यात आलेली होती. त्यासमोर झाडलोट आणि पानं साफ करून, मृत्तिका आणि विशिष्ट वृक्षांच्या खोडा तून द्रव काडून, त्याच्या मिश्रणातून व उत्तम दगड आणून, एक सुंदर सुबक व मजबूत ओटा तयार करण्यात आलेला होता. जवळच्या वनातून,वन्य वसाहतीत असलेल्या गोमातेच्या गोमयापासून उत्तम द्रावण तयार करून, तो ओटा नीट सारवून घेण्यात आला होता. 

त्या ओट्याला सुद्धा छान शाकारलेल्या बांबूच्या आच्छाद नाने झाकून, उत्त्तम छाया निर्माण करण्यात आलेली होती. त्या ओट्यासमोरील जागा उत्तम गोमयाने सारवून, तीनही बाजूने, खड्डे करून,बोरीच्या,बाभळीच्या फांद्यांनी छानसे कुंपण तयार करण्यात आलेले होते.तीनही बाजूने असलेल्या या फांद्यांना लवचिक व न तुटणाऱ्या वेलींचे धागे बनवून, त्यांनी बांधून ठेवण्यात आले होते. इतकी उत्तम व्यवस्था करण्याची ही कला, दोन्ही बंधूंनी, महर्षी वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात आणि नंतर महर्षी विश्वामित्र यांच्या सान्निध्यात प्राप्त केली होती.

वनात अग्निसाठी काष्ठ व कंद मूळ आणण्यासाठी लक्ष्मण गेला असताना, प्रभू श्रीराम आपल्या भार्येसह अर्थात देवी सीता यांच्यासह जवळील, परिसर, एका बाजूला दिसणारा उंच चित्रकूट पर्वत रांगा, यांच्यासह दिसणाऱ्या विलोभनीय निसर्गाच्या मुक्तपणे उधळलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी, फिरण्यास निघणार होते. परंतु दोघेही, भ्राता लक्ष्मण याची प्रतीक्षा करत होते. वनाची सोभा अवर्णनीय होती. मंदाकिनी नदीच्या सुंदर, शुभ्र स्फटिका समान वाहात असलेल्या जलामुळे, संपूर्ण प्रदेश सुपीक, सुजल आणि सुफल होता. 

अनेक प्रकारचे वृक्ष त्या परिसराला वेढून होते. आंबा, पिंपळ, जांभूळ, साग, अशोक, वड यासारख्या डेरेदार वृक्षानी उत्तम प्रकारची छाया दिली होती.  

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०२/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...