Skip to main content

राम अनुज भरत भाग २१

राम अनुज भरत भाग २१

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

त्यानंतर यक्ष आले आणि त्यांनी उत्तम आणि मधुर खाद्यान्ने मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने गुळवरी अर्थात आंग्ल भाषेत ज्याला केक व पफ म्हणतात, ते, अमृतफळ अर्थात आत पुरणासारखे अनेक प्रकाराचे मधुर मधुर सारण भरलेले, पण आकाराने मोदका समान पदार्थ, सर्व फळांचे छोटे छोटे कापे घालून केलेली शिखरण (आंग्ल भाषेत फ्रूट सॅलड), कुंडलिक (आताची जिलबी), असे अनेक पदार्थ मांडण्यात आलेले. हे सर्व खाद्यान्न पदार्थ कनकांच्या भव्य अश्या उत्तम पात्रात मांडलेले होते. कनकांच्या मोठमोठ्या परातीत काढून वाढण्यासाठी सज्ज ठेवलेले.

त्यानंतर काही सुरवर आले. त्यांनी तांदूळ, गहू व कड धान्य यांपासून बनवलेले उत्तम खमंगदार व स्वादिष्ट अन्नपदार्थ क्षणार्धात निर्माण करून, ते उत्तम रत्नजडित पात्रात मांडून ठेवले.ही सर्व भोजन,आसन,शयन व्यवस्था सुरू असताना, स्वर्गीय गंधर्व आणि गंधर्व कुमारांनी, विश्वकर्मा रचीत उंच मंचकावर स्थानापन्न होऊन, अत्यंत मधुर स्वरात व सुरावटीवर सुश्राव्य, स्वर्गीय गायनाला आणि वादनाला सुरुवात केली. 

त्या पाठोपाठ देवेंद्र आज्ञेने स्वर्गातून भुलोकि उतरलेल्या अप्सरानी स्वर्गीय आणि बहारदार नृत्य अविष्काराला सुरुवात केली. उत्तम जलपान, रसपान, खाद्य, संगीत आणि नृत्य व्यवस्थेच्या अकल्पित समोर आलेल्या प्रकटणाने,संमस्त अयोध्यावासी जन,सैनिक आश्चर्याकित अचंबित आणि हर्शोल्हासित झालेले होते. या सर्व तयारी बरोबरच, सर्व अश्व, वृषभ व गज यांच्यासाठी उत्तम अश्वशाला, वृषभालय व गजशाला तयार झाल्या. त्यामध्ये सर्व अश्व गज व वृषभ हे स्थानांतरित झाले. त्यांना उत्तमा तील उत्तम प्रकारचे ग्रास उत्पन्न झाले.ज्याचे सेवन त्या सर्व जीवांनी मनसोक्त आनंदाने सुरू केले. 

सर्वत्र जणू उत्तम खाद्यांनांचा सुवासिक सुगंध भरून वाहत होता. त्यातच स्वर्गीय संगीत आणि नृत्य यांनी बहार आणली होती. समस्तअयोध्यावासीय जनसाधारण व सैनिक या उत्तम व स्वर्गीय आगत्याने भारावून, हरखून प्रसन्न चित्त झाले. खाद्य, पेयं, रसपान, यांनी तृप्ती वाढवत नेत, पुन्हा अतृप्ती निर्माण केली.त्यामुळे प्रत्येक जण क्षुधा आणि तृष्णा या सव्यापसव्य खेळात व्यग्र झाला होता. उत्तम भोजन, रसपान, जलपान, संगीत आणि नृत्य यांनी भारलेल्या त्या बहारदार वातावरणात, अयोध्यावासी जन,सैन्य, राजपरीवार अश्व गज व वृषभ यांसह संपूर्ण परिसर निद्रेच्या आधीन कधी गेला ते कोणालाच लक्षात आलं नाही. 

त्याआधी इकडे आश्रमात महर्षी स्वतः आणि ब्रम्हवृंद, भरत, माता, स्नुषा परिवार, सुमंत यांसह मंत्रीगण व त्यांच्या परिवाराचे आस्थेने आतिथ्य करण्यात मग्न होते. प्रत्येक अन्नपदार्थ, रस, पेयं स्वतः हेमपात्रात घेऊन, वाढणीने वाढताना, महर्षींच्या चर्येवरील आनंद व उत्साह, एका उत्तम यजमानाच्या कर्तव्याचं संमाधान सिद्ध करत होता. प्रत्येकाने अत्यंत तृप्तीने, समाधानाने व आनंदाने भोजन, रस व पेयं यांचा लाभ घेतला. तत्पश्चात वरुणानी उत्तमोत्तम तांबूल, काथ, सुपारी व सुगंधित, लज्जतदार व रसाळ फळांचा गर व मधयुक्त पान विड्यांची उपलब्धता करून दिली.

अर्थातच सकल जनांनी या तांबूल विड्यांचा, पुन्हा एकदा हर्षाने लाभ घेऊन, आपल्या उदरासह देहाची तृप्ती करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. कारण उत्तम भोजना प्रमाणेच, हे तांबूल पान उदरात गेलेल्या अन्नाच्या रसांना पोषित करून,अधिका अधिक तांबूल खाण्याची इच्छा द्विगुणित करत होते. या स्वर्गीय तांबूल भक्षणाने, अल्पावधीत पाचनक्रिया पूर्ण होऊन, अनेक मंडळी पुन्हा भोजनास सिद्ध होऊन, पुन्हा उत्तम भोजनाचा आस्वाद घेत होते आणि आत्मसंतुष्ट अनुभूती घेत होते. 

यथावकाश,सर्वत्र शांतता झाली आणि ते अयोध्या नगरीतून, श्रीराम दर्शनार्थ आलेलं समस्त भक्तिभावविश्व त्या स्वर्गीय भोजन, स्वर्गीय संगीत, स्वर्गीय नृत्य आणि स्वर्गीय धुंदीत गाढ झोपी गेलं. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२९/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...