Skip to main content

राम अनुज भरत भाग ३२

राम अनुज भरत भाग ३२

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
 
लक्ष्मण पुढे म्हणाला 

"पण एकूण समूदाय फक्त सेनेचाच असावा असे भासत नाही. म्हणजे प्रजाजन सुद्धा त्याच्या सोबत असल्या सारखे, एकूण जनसमुदाय संख्येवरून भासित होत आहे. ज्येष्ठ भ्राता,परंतु यामधे, महाराज दशरथ यांचा रथ कुठेही असल्याचे दिसत नाही. किंबहुना त्यांची राजचिन्हेसुद्धा कुठेही दिसत नाहीत."

यावर प्रभू म्हणाले

"हे लक्ष्मणा, त्यांनीच भरताला,राजसिंहासनावर बसवल्या नंतर, आपल्या भेटीस आणि माझा आशिष घेण्यास धाडले असणार." 

वृक्षावरून अवलोकन करत असलेला लक्ष्मण, चपळाई करुन, खाली उतरून आला. भ्राता श्रीराम यांनी प्रश्नार्थक नजरेने लक्ष्मणा कडे पाहिलं. ते जाणून, लक्ष्मण म्हणाला

"हे रघुकुल भूषण,भरताची स्वारी,स्वल्प समयात, आपल्या समीप येईल. "

प्रभू म्हणाले.

" हे सौमित्र, माझ्या भरताला मी राज पुरुष वेषात पाहू इच्छितो आहे. तू देखील त्याचे स्वागत करायला हर्शाने सिद्ध हो. आपण सर्वच त्याचे क्षेम आणि पिताश्री बद्दल जाणण्यास उत्सुक आहोत. "

इकडे भरत, वनाच्या दिशेने दृष्टिक्षेप टाकत, आपल्या रथातून, आर्य सुमंत याना म्हणाला.

"महामंत्री आर्य, समोरील वनात,मध्यभागी, धूर येतानासा दिसत आहे. मला वाटतं की, ज्येष्ठ भ्राता, देवी सीता आणि अनुज लक्ष्मण,बहुतेक त्याचं स्थळी,रहात असावेत. आपण काहीजण उतरून, तिथे पायी जाऊया. कारण रथ, घोडे घेऊन, ज्येष्ठ भ्राता रघुनंदन यांच्या कडे जाणं श्रेयस्कर वाटतं नाही, असा माझा मानस आहे. मी, आपण, कुलपुरोहित महर्षी वसिष्ठ आणि एक सचिव असे आपण पुढे जाऊ. शत्रुघ्न, ससैन्य, इथे सर्वांच्या रक्षणार्थ प्रतीक्षेत राहील. योग्य समयी आपण परिवार आणि मंत्रीगण, सचिव याना पाचारण करून घेऊ. " 

भरताच्या वाचनांना आर्य सुमंत यांनी त्वरित स्वीकारून, त्यानुसार स्वतः आर्य, महर्षी वसिष्ठ ऋषींना घेऊन आले. अर्थातच चारही जण, समोर येणाऱ्या, धुराच्या दिशेने चालत निघाले. लक्ष्मण पुन्हा त्या वृक्षाच्या एका शाखेवर चढून, पुढील घटनाक्रम पहात होता. 

पण अत्यंत शांत स्वरात, अती उत्साही न होता, त्याने भ्राताश्रीना सूचना दिली की, भ्राता भरत, आर्य सुमंत, महामुनी, सुर्यतेज धारक, कुलपुरोहित महर्षी वसिष्ठ आणि एक सचिव येत आहेत. बाकीचा दळभार आणि प्रजाजन, मागेच प्रतीक्षेत उभे केलेले दिसत आहेत. 

प्रभू श्रीराम प्रसन्न मुद्रेने लक्ष्मण व देवी सीता यांना म्हणाले 

" बघ लक्ष्मणा, असमय अतिक्रोध व अतिउत्साह हे दोन्ही अती घातक असतात. माझा भरत किती नीतिमान आणि उच्च तत्वांचा रक्षक व पालनकर्ता आहे, हे सिद्ध झालं. " 

त्यांना अतिसमीप येत असल्याचे पाहून, लक्ष्मण वृक्ष शाखेवरून खाली आला आणि भ्राता श्रीराम यांच्या मागे येऊन उभा राहिला. त्यापश्र्चात तिघेही, पर्णकुटीकडे येणाऱ्या मार्गाकडे पाहत होते. इकडे, धूर पाहून त्या दिशेने निघालेले भरत आणि इतर तीन जण, एका विशिष्ट वळणावरील वृक्षाच्या पायथ्याशी थांबले. त्या वृक्षाव्या बुंध्यावर असलेल्या एका श्लोकाकडे अंगुलीनिर्देश करून भरत, आर्य सुमंत आणि कुलगुरू महर्षी वसिष्ठ याना म्हणाला. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१०/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...