Skip to main content

राम अनुज भरत भाग २०

राम अनुज भरत भाग २०

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

 मंत्र उच्चार करून महर्षींनी आवाहन केलं.

" हे देवेंद्र, यम, वरुण आणि कुबेर, चारही लोकपाल, मी तुम्हाला आवाहन करतो की, मला अयोध्या राजपरीवार, अयोध्येचं सैन्य, सर्व नर नारी, सर्व प्रजाजन, त्यांचे अश्व, गज, वृषभ, अयोध्येचे सर्व सेवक वर्ग, यांचं आतिथ्य करावयाचे आहे. त्यासाठी आपण माझ्या या छोट्याश्या आश्रमात आणि संपूर्ण परिसरात त्यांच्यासाठी नंदनवना सम व्यवस्था करावी, ही माझी इच्छा आणि नम्र विनंती आहे. 

हे विश्वकर्मा मी आपल्याला आवाहन करतो की, या समस्तांची, उत्तम प्रकारे निवासाची व शयनादी सुविधेची व्यवस्था करण्यात यावी.हे देवेंद्र,या माझ्या सर्व अतिथीची उत्तम करमणुकीची व मनोरंजनाची व्यवस्था व्हावी. हे सप्त नद्यांनो त्यांच्या उत्तम जलपान, रसपान, सुरापान व अत्युत्तम भोजनाची व्यवस्था व्हावी." 

आवाहनानुसार देवेंद्र, यम, वरुण, कुबेर, विश्वकर्मा, गंधर्व, यक्ष समोर उपस्थित झाले. सर्वांनी महर्षींना सादर प्रणाम करून, म्हटले, सर्व काही आपल्या इच्छेनुसार होईल. त्यानंतर ते सर्व अंतर्धान पावले. पण कार्याला लागले. सर्वात प्रथम विश्वकर्मा याने संपूर्ण प्रदेश समतल करून घेतला. तत्पश्र्चात, सर्वत्र उत्तमोत्तम स्वर्गस्थ तलम कापडाने सूसज्जित, उंच, उत्तमोत्तम, झोकदार कनाती, डेरे, छोलदारी यामधे सर्वोत्तम दालनांनी युक्त सजलेली गृहे तयार झाली. 

त्यांच्या भिंतीच कापड उत्तम वेल बुट्टिदार नक्षीकाम आणि रंगकाम केलेलं होतं. त्यांच्या आत भूमीवर उत्तम नक्षीदार अंथरी (हिंदीमध्ये गालिचे), त्यावर उत्तम शिसवीच्या लाकडाचे मंचक, पलंग, त्यावर कापसहून मऊ स्वर्गीय कापसाचे, त्बिछाने, यावर तलमसुत आच्छादनं असा सर्व स्वर्गीय थाट, अनेक योजनांपर्यंत निमिषार्धात विश्वकर्माने तयार करून दिला. 

परिसरात, स्वर्गातील नंदांवनातून आलेली, उत्तम फुलझाड, भरदार व बहारदार वृक्ष, फळझाडे, अत्यंत मनोहारी, नाजूक व मनमोहक रंग व स्वर्गीय सुगंध असलेली फुलझाड, लता, तरु वेली, तयार झाली. सर्वत्र रमणीय दृश्य दिसायला लागलं.जमलेले प्रजाजन, सैनिक, रथी, महारथी हे आश्चर्यचकित होऊन, हा बदलत जाणारा मनोहारी दृश्य सोहळा पाहून, अक्षरशः तोंडात बोटं घालत होते. सर्वांनी भराभर आपल्यासाठी व परिवार आप्तजन,स्वकीय यांच्यासाठी उत्तमोत्तम खोल्या असलेले डेरे निवडून, आपल्या राहण्याची, व्यवस्था करायला सुरुवात केली. पण प्रत्येक डेऱ्यात असलेल्या सजावटी, अंथरी (गालिचे), सजलेले मंचक, पलंग हे पाहून, प्रत्येकाची धांदल उडाली. 

इकडे सप्त नद्यांतील काहींनी, शुद्ध जलांचे कुंभच्या कुंभ निर्माण करून, ते स्थाना स्थानावर ठेवून, सर्वांच्या उत्तम जल पानाची व्यवस्था केली. काही नद्यानी उत्तम फळांचे साखर पाकातले गर, फळांची रसदार पेयं, मधुरसात भिजवलेली साल काढलेले फळांचे कापे, अत्युत्तम फुलांच्या मधाचे रसदार शर्करेहून गोड पाक, यांचे मध्यम ते मोठ्या आकाराचे उत्तम नक्षीकाम केलेले संपूर्ण कनकाचे अर्थात हेम म्हणजे सुवर्णाचे रांजणच्या रांजण निर्माण केले. त्यामध्ये वरील सर्व उत्तमोत्तम पेय, रस, फळांचे मधुरसातील कापे, मधांचे रसदार पाक इत्यादी मधुर मधुर जिन्नस भरून ठेवण्यात आले होते. 

हे सुरू असताना, देवेंद्र आपल्या कार्यात मग्न होते. त्यांनी मोठमोठ्या आकाराच्या हेम पात्रात क्षीर अर्थात दुधा पासून तयार करण्यात आलेले बासुंदी सम चविष्ट, मधुर साहून मधुर आणि अमृताहून सुरस असे अनेक पदार्थ, मांडले. ही सर्व व्यवस्था अक्षरशः निमिषार्धात निर्माण होत होती. त्यानंतर यक्ष आले आणि त्यांनी ...........

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२८/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...