Skip to main content

राम अनुज भरत भाग २५

राम अनुज भरत भाग २५

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

त्या परिसरात दाटीवाटीने एकमेकाला खेटून, त्या वनाला घनदाट करू,या वनाने सूर्य किरणांना जणू प्रवेश नाकारला होता. अगदी भर मध्यान्ही सुद्धा, त्या वनात संध्या समयाचा आभास निर्माण होत असे. अश्या या वृक्ष राजींनी समृद्ध आणि आपल्या समिश्र सुगंधाने भारलेल्या वनातील,आपल्या उत्तम पर्णकुटीत निवास करत असलेले, श्रीराम व देवी सीता, नित्य दिनक्रम करून, स्नान संध्या, पूजा अर्चना आदी उत्तम प्रकारे करून, लक्ष्मणाच्या प्रतीक्षेत होते. अग्नी साठी काष्ठ, कंद मूळ व फळं इत्यादी घेऊन लक्ष्मण लगबगीने पर्णकुटी बाहेर आला.

त्याने आणलेली काष्ठ, ओट्यावरील एका कोपऱ्यात नीट रचून ठेवली. कंद मुळ पर्णकुटीत सुरक्षितपणे, लावून ठेवली आणि फळे, स्वच्छ जळाने धुवून, स्वच्छ कापडात बांधून ठेवली. लक्ष्मणाच्या या कार्याची कुशलता आणि चपळता पाहून, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना फारच कौतुक वाटले. त्यांना गहिवरून देखील आले. कारण एका बलशाली राज्याचा राजकुमार आणि भरताचा अनुज असलेला लक्ष्मण, ज्येष्ठ भ्राता अर्थात माझ्यासाठी पिताश्रीनी दिलेल्या आज्ञेत, स्वेच्छेने सहभागी झाला होता. 

यामुळे श्रीरामांच्या लोचनातून अश्रूंनी, त्यांच्या गालावर नकळतपणे धाव घेतली. देवी सीतेसह, लक्ष्मणाला ही बाब त्वरित ध्यानात आली. लक्ष्मण, भ्राताश्री कौसल्या नंदन श्रीराम, यांच्या समीप आला, त्यांच्या स्कंदाला स्पर्श केला आणि त्यांच्या लोचनातून येणाऱ्या अश्रूंना आपल्या अंगावरील उपवस्त्राने पुसत लक्ष्मण म्हणाला

" हे ज्येष्ठ भ्राता आपल्या लोचनात अश्रू ?. आपण माझ्या आपल्यासोबत येण्याला व असण्याला, आपल्या मना वरील भार, समजू नका. तातांसम असलेले आपण, मला सद्य स्थितीत तातांच्या जागीच आहात. मग पुत्र म्हणून माझं जे नीहित कर्तव्य आहे, तेच मी पार पाडून,माझ्या धर्माचं पालन मात्र, करत आहे. आपण दुःखी होऊन, माझ्या मनातील न्यूनता अजून वृद्धिंगत करत आहात. मी असताना आपण असे कष्ट घेणं, मला वेदनादायक आहे." 

आपल्या खांद्यावरील लक्ष्मणाचा हात हातात घेऊन, त्याला आपल्या समीप बसवून प्रभू म्हणाले.

" हे सुमित्रा नंदन, एका राजाच्या पुत्राला आणि दोन ज्येष्ठ भ्राता असलेल्या बंधूला अश्या प्रकारे वनात अकारण कष्ट करताना पाहून, मनाला वेदना झाल्या आणि अनायास लोचनातून अश्रू ओघळले. हे रघुकुल भूषण ज्या करांनी तुला धरून फिरवलं, ज्या मायेने तुला बालपणी निजवल, त्या माझ्या मनाला आणि मनातील स्नेहाला, हे कष्ट पाहताना, त्रास होत आहे."

लक्षणं हात जोडून विनम्र भावे म्हणाला.

"हे जगताधिपती, आपल्या मायेची, स्नेहाची पखरण अविरत माझ्यावर आहे आणि राहील, हे मी जाणतो. त्याचीच शक्ती व ऊर्जा मला बल प्रदान करते. आपल्या कार्यास न येता रीताच राहिलो, तर हा देह काय कामाचा आहे. म्हणूनच आपण व्यर्थ चिंताक्रांत होऊ नये. आपल्या आज्ञेनुसार कर्म, हाच या देहाचा प्राण आहे, पित्यासमान ज्येष्ठ भ्राताश्री आता पुढे काय आज्ञा आहे, प्रभू."

प्रभू म्हणाले

हे लक्ष्मणा, आता हा रम्य परिसर, इथली निसर्गशोभा आणि निसर्गलीला, अवर्णनीय सौंदर्य, हे सर्व पाहण्यास जाण्याचा मानस आहे. त्यामुळे तुदेखील बरोबर यावस, असं आम्हाला वाटतं. "

अर्थातच जानकीने सुद्धा याला संमती दर्शवली आणि लक्ष्मणास येण्याच्या आग्रह केला. लक्ष्मण म्हणाला

" जिथे आपण, तिथे आपल्या रक्षणार्थ, हा लक्ष्मण येईल. आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे. " 

तिघेही, पर्णकुटी बाहेर निघाले. 
 
श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०३/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...