Skip to main content

राम अनुज भरत भाग १३

राम अनुज भरत भाग १३

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

त्वरित निषाद राज आपल्या साथीदारांसह पुढील व्यवस्था करण्यास्तव, गंगा तटी निघाला. तटावर येऊन त्याने, मोठ मोठ्या नावा,अर्थात जहाजं, एका. बाजूला लावून घेतली. त्यानंतर माध्यम आकाराच्या नावा, एका ठिकाणी एकत्रित आणल्या. मोठ्या नावांमध्ये उत्तमोत्तम मल्लाह अर्थात निषाद नेमून दिले. स्त्री वर्गासाठी विशेष सजवलेल्या, उत्तम रंगकाम केलेल्या व सर्वोत्तम नावा नियडून, त्यात उत्तम पेहराव केलेले मल्लाह नेमून, तो पुन्हा राजकुमार भरत यांच्या दिशेने निघाला. 

गूहाच्या आणि त्याच्या सर्व साथीदारांच्या आतिथ्याने, कृतार्थ आणि समाधानी झालेला भरत, या सुखमय वागणूक, प्रेम, स्नेहभाव यामुळे प्रफुल्लित झाला होता. पण त्यापेक्षा, या कल्पनेने भारावून गेला होता आणि आत्मसंतुष्ट झाला होता की, आपल्यावरील रोष दूर होताच, निषाद राजाने आपलं आदरातिथ्य इतक्या थाटात केलं, तर निरतिशय प्रेमभाव ज्यांच्याबद्दल आहे, त्या जगतपिता श्रीराम, यांचं आगतस्वागत, आदरातिथ्य किती भव्य, दिमाखदार आणि कौतुकास्पद झाला असेल, याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. 

भरताच्या मनात विविध विचारांचं काहूर माजलं आहे. भ्राता श्री इतक्या कष्टमय वनवासाच्या परिस्थितीत जात असताना, निदान हा सुखावह, आगत्यशीर आतिथ्य घेऊन, कंटकांच्या मार्गाने गेले, हे खरतर ग्रीष्मात येणाऱ्या वळवाच्चा सरिसमान आहे. काही क्षण सुखद गारवा मिळतो, म्हणून वळवाचा आनंद, पण तप्त ग्रीष्म पुन्हा अधिक जोमाने लाही करेल, हे दुःख आहेच. ही वनवास दुःखाची लाही, किती काळ अजून दाह देणार, ते प्रभूंना माहीत. 

याचं विचारात भरत, ज्या घनदाट वृक्षाखाली मऊसूत, मृदू मुलायम पानांची शय्या करून, भ्राताश्री निजले होते, त्या वृक्षाखाली उभ राहून, मनोमन हाच विचार करत होता की, जे कधीही साध्या भूवर सुद्धा निजले नाहीत, ज्यांनी उंची महालातील, उत्तम मंचकावर शय्या केली, त्या श्री राघवेंद्र यांनी आणि सुकोमल जनक नंदिनी, राजकन्या असलेल्या सीतेने, 

या अश्या वनातील एका वृक्षाखाली रात्र घालवली. खरंच अश्या या परिणामाला मीच कारणीभूत आहे. माझी मला लाज वाटते.वास्तविक मला जगण्याचा काहीही अधिकार नाही. अश्याच विचारात भरत गढून गेलेला असताना, गुह लगबगीने आला. त्याची चाहूल लागून, भरताची तंद्री भंग पावली. गुह भरत, सुमंत यांच्याकडे येऊन म्हणाला.

" हे महाबली भरत कुमार, आपल्या गंगापार जाण्याची तयारी, पूर्ण झाली आहे. आपण सर्वांना चलण्याची आज्ञा करावी." 

भरताने आर्य सुमंत याना, आज्ञा केली की, सर्वांना त्वरित गुह यांच्या सूचनेनुसार, त्या त्या नौकेत बसण्याची आज्ञा द्या आणि अल्प वेळेत, सर्वांनी गंगा पार जाण्याचं कार्य पूर्ण करावं. आर्य सुमंत, सेनेचा, राज परिवाराचा आणि प्रजाजन यांचा असे तीन समूह करून, नावांच्या क्षमते नुसार चढण्यासाठी सज्जता करण्यास्तव कार्याला लागले. सैन्याने त्वरित, शिस्तबद्ध रित्या परिवारातून आणि प्रजेतून, स्त्री वर्गाला प्रथम पुढे जाण्याची व्यवस्था केली. छोट्या छोट्या नोकांमधे, प्रजेतील सर्व स्त्रीवर्ग चढण्यास सुरुवात झाली.

मध्यम आकाराच्या नोकांमध्ये, परिवारातील सर्व माता, स्नुषा व इतर स्त्रीवर्ग त्यामागे सेविका वर्ग याना मध्यम आकाराच्या नौकांमधे बसण्याचं कार्य पूर्ण करण्यात आलं. अश्या प्रकारे राज परिवार व प्रजाजन यातील समस्त स्त्री वर्ग, नावांमध्ये बसला. 

त्यानंतर छोट्या नौकांमधे पुरुष प्रजाजन बसण्यास सुरुवात झाली. भरताच्या अनुमतीने, भरलेल्या छोट्या व मध्यम नौका सोडण्यास सुरुवात झाली.अर्थातच सैन्याची एक मुख्य तुकडी, काही रथ, घोडे व हत्ती घेऊन, मोठ मोठ्या नोकांमधून पुढे गंगापार झाली होती. कारण येणाऱ्या स्त्रीवर्गाची व्यवस्था करण्यासाठी, आर्य सुमंत यांनी ही योजना केली होती.

पुढे गेलेल्या सैन्याच्या तुकड्यांनी, रथ, घोडे आणि आपला इतर शस्त्र अस्त्र साठा, हे साहित्य परिसरातील चारही कोपऱ्यातून विखरून, बाहेरील बाजूने सुरक्षा व्यवस्था चोख केली. परिसराकडे येणारे सर्व रस्ते चोख बंदोबस्त करून बंद करण्यात आले. कारण मागच्या नौकांमधून, परिवारातील व प्रजेतील स्त्रीवर्ग येणार होता, त्यासाठी ही सर्व व्यवस्था करण्यात आलेली होती. 

आधी गेलेल्या सैन्याने, सुरक्षा व्यवस्था आणि रथांची मांडणी केल्यानंतर, तिकडून परतून आलेल्या नावांमधून काही सैनिक परत आले आणि तोपर्यंत स्त्री वर्गाने भरलेल्या सर्व छोट्या व मध्यम नौका इथून निघाल्या. त्यानंतर परतून आलेल्या मोठ्या आकाराच्या नोकांनधून बाकीचे रथ, घोडे, हत्ती, पायदळ, माहूत, घोड्यांचे प्रशिक्षक असे सर्वजण बसले. इतर छोट्या व मध्यम नौकेत, राजकुमार भरत, शत्रुघ्न, आर्यसुमंत, एका नौकेत, इतर मंत्रीगण बाकीच्या अनेक नोकांमधुन वेगवेगळे जाण्यास निघाले. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२१/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...