Skip to main content

राम अनुज भरत भाग ९

राम अनुज भरत भाग ९

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

त्यां सेवकाना सूचना देण्यात आल्या की, हत्ती, घोडे, रथ व सर्व दळभार विना विलंब व योग्य गतीने, शिघ्रतेने श्रीरामां पर्यन्त पोहोचण्यासाठी उत्तम समतल (समतल म्हणजे सपाट, गुळगुळीत) करा, मार्गात जिथे नदी नाले आहेत, तिथे उत्तम व मजबूत पूल बांधणी करा.  कच्चे बांध बंधारे जिथे आहेत, तिथे त्यांना पुरेशी मजबूती देण्या साठी कार्य करा,जिथे मार्ग कंटक मिश्रित व वनातून जाणारा आहे, तिथे मार्ग निष्कंटक व सैन्य जाण्यासाठी सुरळीत करा, यासाठी त्यांना पुढे धाडण्यात आलेलं होतं

जलदगतीने कार्य करून, या कुशल कारागिरांनी सर्व मार्ग निर्धोक, सुरळीत, मजबूत, समतल व सुरक्षित करून, तशी सूचना राजकुमार भरताकडे पाठवली. अर्थातच ते गंगा तटापर्यंतचा सर्व  मार्ग निर्धोक, सुस्थित व मजबूत करत पुढे गेले आणि जसजशी कार्यात प्रगती साधली जात होती, तसतशी त्याची सूचना राजकुमार भरत यांच्याकडे पाठविण्यात येत होती. या संदेशवहन कार्या साठी खास व्यवस्था आर्य सुमंत यांनी केलेली होती. अतिजलद संदेश वहन करणारी गुप्तचर यंत्रणा या कार्यात कार्यरत करण्यात आली होती.

पुरेसा मार्ग अत्युत्तम करण्यात आल्याचा हेतू साध्य झाल्या नंतर, आर्य सुमंत यांनी राजकुमार भरत याना त्याची सूचना देऊन,  निघण्याची अनुमती मागितली. राजकुमार भरत याने तशी अनुमती देताच, सर्व सुसज्ज व्यवस्था घेऊन,दळभार, नगरवासी, ग्रामवासी, राज स्त्रिया, राजपरीवार, राजकुमार भरत, शत्रुघ्न, तीनही माता, स्नुषा या सर्व पुढे ठेवून, सर्व जण ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना घेऊन येण्यासाठी, रवाना झाले. अर्थातच मागे, सुरक्षेसाठी सैन्य व्यवस्था, पुरेसा शस्त्र अस्त्र साठा आणि उत्तम दर्जाचे सुसज्जित सैन्य यांनी मागे राहिलेल्याची व्यवस्था, लावून ठेवण्यात आलेली होती. 

सर्वात पुढे रथारुढ होऊन, भरत आर्य सुमंत हे एका रथात आरुढ होते. त्यापाठी भ्राता शत्रुघ्न आणि समवेत समस्त स्त्री परिवार हत्तीत अंबारीमध्ये स्थानापन्न होते, बाकीचे परिवार सदस्य वेगवेगळ्या रथांमधे आणि त्या पाठी संपूर्ण दळभार, इतर साधन व्यवस्था या सर्वांना घेऊन निघण्याची आज्ञा राजकुमार भरत याने दिली. प्रत्येक मनात, देहात, वाणीत आणि समस्त हृदयात ज्येष्ठ राजपुत्र श्रीराम यांचे दर्शन आणि त्यांना समजावून, साकडं घालून, प्रसंगी आणा घालून, माघारी आणायचं, हीच इच्छा, शब्द होते. 

त्यामुळे एकप्रकारे, इतका जनसमुदाय रामनामाचा गजर, घोष व साद घालत एखाद्या तीर्थक्षेत्री निघालेला भक्ती सागर आहे, असाच भास, त्रिलोकात होत होता. मनात, हृदयात, वाणीत आणि प्रत्येक आत्म्याला आस फक्त राम दर्शनाची होती. जणू ही राम भक्तांची मांदियाळी, राम दर्शनार्थ, गंगा तटाला पदयात्रा करत निघाली होती. 

अयोध्या राजकुमार श्रीरामचंद्र यांचा विजय, दशरथ नंदन प्रभू श्रीराम यांचा विजय, विदेह कन्या जनक दुलारी सीतादेवी यांचा विजय, सौमित्र वत्सल भ्राता श्री लक्ष्मण यांचा विजय, श्रीराम प्रिय भ्राता भरत और शत्रुघ्न यांचा विजय असो, या जयघोष, उद्घोष यांनी पृथ्वीसह संपूर्ण आकाश दुमदुमून गेलं.  परंतु हे सर्व दृश्य, आकाशातून विहार करणारे देवर्षी नारद स्वयम् पहात होते आणि मनात धास्तावले होते. कारण राम अवताराचं खरं गुह्य, खरा उद्देश ते जाणत होते.

त्याचं कारणे, जर इतक्या सर्व आप्त, जन, भक्त, प्रिय प्रजाजन यांच्या विनंती, आग्रह, हट्ट, भाव जाणून, परम दयाळू, श्रीराम जर परत अयोध्येला गेले, तर समस्त जगताचा ताप आणि भूवरील हे महाभयंकर पाप कोण निवारण करणार, या चिंतेने, नारदमुनी अस्वस्थ झाले होते, चिंताक्रांत होते आणि मनात श्री महाविष्णूचा नामजाप करत होते. नारायण नारायण नारायण. तारणहार या लीलेचा काय अर्थ काढतात, तेच जाणोत, असं मनात म्हणून, पुन्हा पुन्हा नारायणाचा जाप करत होते. 

मजलदरमजल आणि मुक्काम करत ही राम भक्तांची मांदियाळी, गंगा तटाकडे पोहोचत होती. इकडे गंगा किनारी अनेक छोट्या, मोठ्या व महाकाय नावा, जहाजं आणि त्या वाहून नेणारे शेकडो नावाडी, हे यात्रेकरू, प्रवासी यांच्या प्रतीक्षेत होते. सर्वात अग्रस्थानी व सर्वांनी घेरून असलेल्या परिघात मध्यभागी, या सर्वांचा लाडका राजा निषादराज गुह होता. तो सर्व व्यवस्था चोख असल्याचे पहात, समाधान व्यक्त करत होता. कुठे काही गैर व्यवस्था, काही तंटा बखेडा उभा राहिला तर आपण हून मध्यस्थी करून, प्रत्येक वाद, निर्विवाद करत होता. 

निषाद राज गुह, प्रभूंना वनवासात निघाल्यावर भेटलेला आणि भक्त झालेला. .......

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१७/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...