Skip to main content
श्रीगणेशाय नमः 

गजवदना भालचंद्रा लंबोदर फणीवरा
एकदंता विनायका वंदितो तुज गौरीसुता 

शिरी तव मुकुटमणी शोभत
त्रिपुंड गंध भाळी विराजित
हेमकुंडले शूर्पकर्णी तव डुलत 
मुखी तव सहस्त्र सूर्याचे तेज हे शंभुनंदना
एकदंता विनायका वंदितो तुज गौरीसुता 

गळा घातल्या अष्टमाला
शुंडा शोभते नक्षत्रमाला
उपरणे मयूर नक्षीकला
सजली अवघी सृष्टी स्वागता गिरीजाकुंवरा
एकदंता विनायका वंदितो तुज गौरीसुता 

कंठी कौस्तुभमणी शोभतो
दोंदी सर्पराज नीत विराजितो
सुवर्णपट्टा रत्नजडित शोभतो
पितांबर मूर्त मनोहर रिद्धीसिद्धी वरा
एकदंता विनायका वंदितो तुज गौरीसुता

पैंजण रुणझुण निनादती
स्वरमधुर गंधर्व गीत गाती
सुरांचा महोत्सव त्रिजगती
नर्तनी गायनी गुंगून मोहित केले तू जगता
एकदंता विनायका तुज वंदितो गौरीसुता 

मूर्ती प्राणप्रतिष्ठा करुनिया 
पूजन अर्चन करती भक्तप्रिया
मोदक लाडू अर्पिती नैवेद्या
सकल भक्त रक्षण ब्रीद राखीसी हे वरदा
एकदंता विनायका तुज वंदितो गौरीसुता 

प्रसन्न करसी भक्तजना
चिंतामणी तू हे मोरया
आठवले शब्द कवनी या 
स्वीकारिसी हे गीत वाहिले चरणी मोरया 
एकदंता विनायका तुज वंदितो गौरीसुता 

©® कवी : प्रसन्न आठवले
भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४३
१०/०९/२०२१

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...