Skip to main content

भोग आणि ईश्वर २९३

भोग आणि ईश्वर  २९३ 

मनाचा समतोल राखणं आणि त्या स्थितीपर्यंत पोहोचणं ही खरतर एक मोठीच तपश्चर्या असते. किंबहुना तीच फार मोठी साधना असते. ती प्राप्त झाली की, इतर कोणतीही साधना विनासायास, कोणतीही व्यक्ती करू शकेल. कारण मनाचा समतोल राखणं यात कोणत्याही साधनेचं निम्मं यश सामावलेलं आहे. काहींना ते जन्मतः प्राप्त झालेलं असतं. म्हणजे कितीही मोठी घडामोड वा उलथापालथ होऊ दे, यांच्या विचारांच्या प्रवाहात, त्या गतीत आणि त्याद्वारे प्रत्यक्ष कृतीत काहीही फरक पडत नाही वा बदल होत नाही. 

एखाद्या प्रचंड जलप्रवाहामध्ये अनेक गोष्टी उलटसुलट होतात, जागा, मार्ग वा जगही बदलतात. पण अश्या संतुलित लोकांना वादळातसुद्धा मार्ग सापडतात आणि आपल्या विचारांचं संतुलन व मनाचा समतोल हे यांच्या आत्म्यातून जन्मतः, यांना मिळालेलं असतं. पण यातसुद्धा कर्मसिद्धांताप्रमाणे यांच्या मागील जन्मातील तप वा साधनेचा परिणाम स्वरूप अश्या प्रकारची समतोल व विवेकी मानसिकता त्यांना प्राप्त झालेली असते. पण ज्यांच्याकडे नाही त्यांनाही ते प्राप्त करता येऊ शकतं. 

अश्या प्रकारची मानसिकता ज्ञानानेसुद्धा प्राप्त होते. एक उदाहरण घेऊ म्हणजे समजेल.एखादा वकील, त्याच्या कडे आलेल्या  क्लिष्ट प्रकरणांना व त्यात अडकलेल्या आशिलांना शांत डोक्याने व चतुरस्त्रपणे सोडवून आणतो तो सर्वात प्रथम सर्व ऐकून घेतल्यानंतर, आशील कितीही भांबावलेला असेल, तरीही त्याला शांत करून, विश्वास देतो. तो वकील स्वतः कधीही घाबरून वा उत्साहित किंवा हतोत्साहित होत नाही. 

याला कारण म्हणजे त्याचं कायद्यांचं ज्ञान, त्या ज्ञानाने त्याला प्राप्त झालेली माहिती, जाणिवांची प्रगल्भता आणि या सर्वांतून त्याला आलेला आत्मविश्वास, या सर्वाचा परिपाक म्हणजे त्याच्या मनाचा समतोल आणि विचारांचं संतुलन. म्हणजे मनाच्या शांततेसाठी, विचारांच्या संतुलनासाठी आणि मनाचा समतोल राखण्यासाठी ज्ञान, त्याद्वारे जागृत जाणीवा आणि अनुभव हे अत्यंत जरुरी आहे. यातील ज्ञान हे परिस्थिती आणि वाचन व उपलब्ध माहिती याद्वारे प्राप्त होऊ शकतं. 

ज्ञान हे ज्ञानेंद्रियांतून मनापर्यंत पोचलेले विचार, परिस्थितीचं झालेलं आकलन आणि त्याद्वारे मनात उमटलेले विचार यांचं मिश्रण आहे. या उमटलेल्या विचारांनी जाणीवा व त्या जाणिवांची शक्तिकेंद्रे यांना आलेली जाग आहे. जाणिवांची जागृती, हा खरतर खुप मोठा विषय आहे. तरीही थोडक्यात समजून घेऊ. मुळात जशी देहाला ज्ञानेंद्रिय आहेत, तशीच मनातसुद्धा आत येणारी, सर्व माहिती, आवाज, दृश्य हे अवकाशातील एका पटलावर आघात करून, आतील जाणिवांच्या केंद्रांना उद्दीपित करतात. 

त्यानंतर त्यातून निर्माण झालेल्या कंपनातून प्रतिध्वनी स्वरूपात, योग्य त्या जाणिवांच्या केंद्रांना जागृत करून माहितीचं, आवाजाचं दृष्याचं एकत्रिकरण करून, त्यातून जाणिवांच्या केंद्रातून त्यांना साठवून, त्यावर प्रक्रिया स्वरूप प्रतिसाद वा प्रतिक्रिया दिली जाते. कधीकधी प्रतिक्रिया गरजेची नसेल तर, आपण हुंकार वा हम्म किंवा नुसतीच मान डोलावून माहिती समजली आणि मनाने त्याचा अर्थ जाणला याची प्रतिक्रिया देतो. कधीकधी जेंव्हा अर्थ समजलेला नसतो, तेंव्हा मन प्रश्नार्थक भाव चेहऱ्यावर आणि कधी कधी मुखातून प्रश्नाद्वारे विचारण्याची क्रिया घडवून आणतं. 

म्हणजे जाणीवा या मनात सुप्तावस्थेत असतात आणि त्यांना प्राप्त परिस्थिती, ज्ञान, माहिती, दृश्य इत्यादी गोष्टी जागृत करतात. अर्थातच जाणिवांची जागृती म्हणजे मना तील ज्ञानेंद्रियांना आलेली जाग. म्हणूनच वासनायुक्त ज्ञान, दृश्य आतील पटलावर आपटले की, आतील त्या प्रकारच्या जाणीवा जागृत होऊन, तसा प्रतिसाद मन, देहाकडून प्राप्त करण्यासाठी धडपडते. 

विषय थोडा गहन आहे. म्हणूनच आतापर्यंत या भागात वाचलं,त्याचं चिंतन करूया आणि पुढचं उद्याच्या भागात  पाहूया. पण नामाचा दंडक हा नित्य उपासनेचा आणि साधनेचा प्राण असल्यामुळे ते नित्य सुरूच राहूदे. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०)२५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१९/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...