Skip to main content

भोग आणि ईश्वर १८९

भोग आणि ईश्वर  १८९

सद्गुरुसेवा, सद्गुरूचिंतन आणि सद्गुरूंनी दिलेला मंत्र, या त्रयीच्या आधारे,प्रत्येक जीव आपल्या आयुष्याची गाडी सुरळीत चालवून या जन्मी मुक्तीच्या वाटेवर बराच पुढे जाऊ शकतो. या तीन नियमांचं पालन केलं तर, आपण अनेक संकटं व भोग यातुन सुखरूप बाहेर पडू शकतो, संसारात अर्थात अधिभौतिकात, तरून जाऊ शकतो आणि  अध्यात्मिक मार्गावर उन्नत होऊ शकतो. 

हे असं होण्यात कसलीही अडचण खरतर यायला नको. परंतु तरीही हे या सूत्रातील समीकरणानुरूप होत नाही. याचं महत्वाचं कारण या समीकरणात धरलेल्या सूत्रात दोन क्ष आहेत.  ते क्ष, जे आपल्याला गृहीत धरून, योजलेले आहेत, ते व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे, गणिता तील सुत्रांप्रमाणे, हे समीकरण कार्य करत नाही. अर्थातच प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्व, स्वभाव, गुणविशेष, प्रारब्ध, संचित यानुसार सदर सूत्रातील क्ष ची किंमत,प्रभाव आणि शक्ती बदलत जाते.

या सूत्राला चालवायला जरुरी ऊर्जा ही आत्मयज्ञातून प्राप्त होणार असल्यामुळे, वाफेवर वा विजेवर चालणाऱ्या इंजिनाप्रमाणे कार्यरत असतं. म्हणजेच जसा इंजिनाचा वेग हा उपलब्ध वाफेच्या वा विजेच्या प्रमाणाशी समान असल्या मुळे, ज्याप्रमाणे पुरेशी वाफ निर्माण होईल वा पुरेशी वीज उपलब्ध होईल, म्हणजेच पुरेशी ऊर्जा प्राप्त होईल, त्यानुसार इंजिन गतिमान राहील आणि नियोजित स्थानी वेळेत पोचेल. 

हे दोन क्ष म्हणजे श्रद्धा आणि दृढ विश्वास. हे दोन क्ष, मनःशक्ती व इच्छाशक्ती या ऊर्जेवर अवलंबून आहेत. म्हणजेच सद्गुरुसेवा, सद्गुरुचिंतन व सद्गुरूंनी दिलेला मंत्र या त्रयीला वा समीकरणाला चालवण्यासाठी मनाची आणि इच्छेची शक्ती हीच अंतिमतः कारक आहे. कारक जितका शक्तीवान, तितकीच या सूत्राची किंमत मोजता येईल वा उत्तर काढता येईल. पण हे उत्तर दोनच जण देऊ शकतात. एक म्हणजे तो साधक स्वतः आणि सद्गुरू. 

पण याचा अर्थ असा होतो की, गणितातील सूत्राप्रमाणे हे सूत्र कार्य करू शकत नाही. कारण मन आणि इच्छेचं बल हे मनाच्या सक्षमतेवर, आघात, घात, भोग, उपभोग याचा मारा पचवून स्थिर राहण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे आणि मन हे सतत दोलायमान असतं. किंवा मनाची ती नैसर्गिक अवस्थाच आहे. आपण मागे पाहिल्यानुसार मन हे आकाशा सम असल्यामुळे स्थिर राहू शकत नाही. ते प्रत्येक प्रसंग, वेळ, घटना, यानुसार अस्थिरच राहणार किंवा होणार. 

मग याला उपाय काय आणि कसा करायचा. उपाय एकच आपलं लक्ष दृढ धरून, त्यावर लक्ष केंद्रित करून, मनाला त्या लक्ष्यावर स्थिर करून साधना करणं. लक्ष आपली आत्मोन्नती, ऊर्जा इच्छाशक्ती व मनःशक्ती आणि दोन क्ष श्रद्धा आणि विश्वास. विश्वास हा मनाला बांधून ठेवतो आणि श्रद्धा मार्गावर संकटं व भोग इत्यादीचा सामना करत साधनेला मार्गस्थ ठेवते. 

यात येणाऱ्या वा आलेल्या संकटांच्या मालिका या एक प्रकारे आपली श्रद्धा आणि विश्वास यांची दृढता यांची परीक्षा घेतात, हे ध्यानात ठेवलं की, अश्या संकटांनी मन विचलित होणार नाही. म्हणजेच आपल्या उन्नत्तीचा मार्ग आपल्याच श्रद्धेवर आणि मनाच्या व इच्छेच्या ऊर्जेवर अवलंबून आहे.  म्हणजेच अविचल राहून, श्रद्धा स्थिर ठेवून साधना करत राहणं हे आणि हेच आपल्या हातात आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे.  म्हणजेच सद्गुरुकृपेचा ओघ, तुमच्याच दृढतेवर आणि साधनेवर अवलंबून आहे. तेवढे सांभाळले तर,बाकीचे सद्गुरू पाहून घेतील. आता या सर्वांवर संचिताचा कितपत परिणाम होतो ते उद्या पाहू. 

उद्या पुन्हा भेटूच. तोपर्यंत नाम घ्या दृढ रहा, स्थिर रहा, गुरुकृपा होईल हे नक्की.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०७/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...