Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०२

भोग आणि ईश्वर  ३०२ - कर्मफलाचा नियम वा सिद्धांत

भीष्मांच्या संदर्भात, त्यांनी ओढवून घेतलेली अगतिकता, मायेच्या प्रभावात त्यांनी घेतलेली भीष्मप्रतिज्ञा हे सर्व, त्यांना संचितातील त्या एका चुकीमुळे अकल्पनिय शेवटा कडे नेण्यासाठी घडत गेलं. पण यात त्यांच्या पुण्याईमुळे ते त्यांना जीवनाच्या आणि आत्मप्रवासाच्या अंतिम टप्प्यात भोगता आलं. हा पुण्याचा, सद्गुणांचा, उत्तम वागणुकीचा, सत्कर्माचा परिणाम होता. 

म्हणजे हे कोणत्यातरी प्रभावाने शक्य होऊ शकतं का?. तर हो नक्कीच. सत्कर्म, सदवर्तन व सदाचार या सद्गुणांच्या बळावर आणि सद्गुरुकृपेने भोग टाळणं आणि कर्मफल नष्ट होणं शक्य नसलं तरी, सद्गुरुकृपा त्यांना तुमच्या सोयीने व योग्य काळात भोगण्याची संधी नक्कीच देऊ शकते. अंबिकेबाबत घडलेली घटना आणि त्यायोगे शिखंडीच्या माध्यमातून भीष्मांचा अस्त हा त्यांच्या कर्माने विधिलिखित केला गेला. परंतु त्याचा योग त्यांच्यामधील पुण्यप्रभावामुळे पुढे जात जात, अंतिम चरणांवर त्यांना भोगावा लागला किंवा भोगता आला. 

श्रीकृष्णांच्या कथनातील दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कोणतंही कर्मफल नष्ट वा लुप्त होत नाही, तर ते आपलं कार्य करूनच शांत होतं वा मोक्षास जातं. मात्र सद्गुरु कृपा ही अशी महत्वाची देण आहे, जी प्राप्त झाली असता, येणाऱ्या फलाचा अनिष्ट परिणाम व तीव्रता कमी होते आणि इष्ट फलाचा प्रभाव व व्याप्ती, सद्गुरुकृपा वर्धिष्णू अर्थात वाढवून देते. त्यासाठी मन आणि आत्मा निरंतर त्यांच्या चरणी स्थिर असणं आणि त्यांच्या स्मरणाचा किंवा त्यांनी दिलेल्या नामाचा जागर नित्य मनात व हृदयात प्रज्वलित असणं आवश्यक आहे. 

आपण दोन लेखांपूर्वी चेंडूचं उदाहरण घेतलं आणि फक्त इतकाच विचार करून तो मुद्दा सोडला की, सरळ फेकलेला चेंडू सरळ आपल्याकडे येतो, तोसुद्धा त्वरित, त्याच वेगात, ज्या वेगात आपण त्याला समोरच्या भिंतीकडे फेकला. आता याचा अन्वयार्थ पाहिला की,  सरळ फेकलेला चेंडू ही, आयुष्यातील ती कर्म आहेत, ज्यांचा परिणाम व प्रभाव याच जन्मात पाहायला वा भोगायला मिळतो. म्हणजे त्यांची फलद्रूपता ही विशिष्ट काळात समोर येणारच असते. म्हणजेच आपणच फेकलेल्या त्या चेंडूना आपणच झेलू शकतो वा आपल्याला झेलावं लागतं. 

त्याच वेळी आपण हे देखील पाहिलं की आपण तिरक्या रेषेत डावीकडे आणि उजवीकडे फेकलेला चेंडू  तिरकाच त्याच दिशेकडे जातो. म्हणजे डावीकडचा डावीकडे याप्रमाणे. आता याचा अन्वयार्थ लावू. असं समजा की, एका रेषेत विशिष्ट अंतरावर पाच सात जण उभे आहेत. अश्यावेळी एकाने तिरक्या रेषेत भिंतीवर फेकलेला चेंडू, त्याच दिशेला पुढे तिरका जाऊन दुसऱ्या व्यक्तीच्या हातात पडेल. आपणही त्या पांच सात जणांमध्ये उभे आहोत. 

अश्यावेळी आपण तिरका फेकलेला चेंडू, त्याच दिशेने तिरका अर्थात त्याच कोनात दुसरी व्यक्ती झेलेलं. आता समजा किंवा जाणा की आपण म्हणजे आपला सद्य जन्म, फेकलेला प्रत्येक चेंडू म्हणजे केलेलं वा घडलेलं कर्म आणि असा फेकलेला चेंडू, पुढच्या रेषेत ज्या व्यक्तीकडे गेला, तो आपला भविष्यातील जन्म. म्हणजे या जन्मात केलेल्या कर्माचं फल पुढे कुठल्यातरी जन्मात भोगणं वा झेलणं अथवा प्राप्त करणं अपरिहार्य आहे. 

हे झालं आपण उजवीकडे फेकलेल्या चेंडुबद्दल. पण आपल्या रेषेत आपल्या डावीकडे उभ्या असलेल्या व्यक्तीने फेकलेला चेंडू, आपल्याकडे येईल. अर्थात आपल्या मागील जन्मात आपण केलेल्या कर्मांची फलं या जन्मात प्राप्त होणं किंवा समोर येणं वा भोगावी लागण. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की, खूप वेळा आपण न केलेल्या गोष्टीचा दोष, अनिष्ट गोष्टी वा व्यक्ती अथवा घटना, नित्य वा कधीकधी आपल्या समोर येऊन आपण त्यातून कष्टले व त्रासले जातो. 

आता या कर्मांचा काही निश्चित नियम लागतो किंवा त्यांची काही संगती लागते का ते पाहूया. असा कर्मांचा नियम जाणण्याचा प्रयत्न , याआधी कोणी केला असेल तर मला ज्ञात नाही,पण आपण करून बघूया. विश्वातील कोणतीही गोष्ट ही वेग या संकल्पनेवर आधारित आहे आणि त्याच्या गतीवर त्याचं लक्षकडे पोचणं अपेक्षित आहे. कर्म ही या जड जगतातील गोष्ट आहे, त्यामुळे त्यालासुद्धा वेगाचा नियम लागू होतो.  म्हणून वेग व गती याच नियमांचा आधार घेऊया. 

समोर फेकलेला चेंडू, जितक्या गतीने फेकला जाईल, तितक्याच गतीने किंवा त्याहून किंचित जास्त गतीने एखाद्या व्यक्तीकडे येईल. कारण तो ज्या लक्षावर किंवा भिंतीवर आपटेल, त्या भिंतीचं  किंवा त्या लक्षाचं पाठबळ किंवा फोर्स त्या चेंडूवर पडून तो अधिक वेगाने हातात येईल, हा वैज्ञानिक सिद्धांत आहे. हाच नियम आधीच्या व्यक्तीने तिरक्या रेषेत, फेकलेल्या व आपल्या कडे आलेल्या वा आपण तिरक्या रेषेत फेकलेल्या व आपल्या पुढे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे गेलेल्या चेंडूला लागू होईल. 

आता कर्माच्या संदर्भात वेग या संकल्पनेवर विचार करू. पण उद्याच्या भागात,पण नामरूप कर्म करतच रहा,ते आपला प्रभाव कधी पाडेल हे सांगता येणार नाही, पण निष्फळ नक्की जाणार नाही, हे देखील सत्य आहे. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत.  

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं आहे. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...