Skip to main content

भोग आणि ईश्वर ३०३ - कर्मफल बल दिशा

भोग आणि ईश्वर  ३०३ - कर्मफल बल दिशा 

कालच्या विषयावर चिंतन पुढे सुरू करूया. कर्माच्या बाबतीत वेग म्हणजे काय किंवा कशाच्या आधारावर हा वेग ठरवायचा, ते पाहू.  हा वेग म्हणजे मनाने वाचेने, देहाने बुद्धीने त्या कर्माला लावलेले बल आणि ते बल म्हणजे ज्या भावाने, प्रभावाने, आपण ते कर्म केलं आहे, त्या भावाप्रमाणे त्या कर्माचा वेग ठरवता येईल. म्हणजेच जे भाव, भार, मनःस्थिती असेल त्यानुसारच ऊर्जा, चेतना, सामर्थ्य, दिशा हे सर्व त्या कर्माला प्राप्त होणार. 

म्हणजे नकारात्मक वा सकारात्मकतेने केलेलं कर्म. म्हणजे जितक्या तीव्रतेने एखादं कर्म करू, तितक्याच तीव्रतेने व प्रभावाने ते या किंवा पुढील जन्मात भोगावं लागेल. म्हणजे एखाद्याला प्रेम, आदर मान सन्मान दिलात, तर तोच, पुढे या किंवा पुढच्या जन्मात, परत तुमच्याकडे येईल. याचा जास्त खोलात जाऊन विचार आणि विश्लेषण करणं गरजेचं आहे. का आणि कसं ते पाहूया. 

यापूर्वीच्या अनेक लेखात मी मनःस्थिती, धनभार ऋणभार, नकारात्मक सकारात्मक, इष्ट अनिष्ट विचार या सर्वांवर विस्तृत विवेचन केलं आहे. त्यामुळे ते आता इथे पुनः देत नाही. पण ते डोक्यात ठेवा म्हणजे या पुढचं लक्षात येईल. आता मनाच्या वेगा बद्दल विचार करताना, मुद्दा भाव, भावना, धनता व ऋणता या सर्वांवर त्या कर्माचा वेग आणि दिशा ठरते. म्हणजे पून्हा त्या चेंडुकडे जाऊया. जसा चेंडू फेकला जाईल त्याच वेगात तो परत आपल्या लक्षाकडे परत येईल. 

समजा त्या चेंडूला फेकणाऱ्याने, फेकताना पूर्ण गती देऊन फेकला तर, अतिवेगात लक्षाकडे जाऊन, आदळून, पुन्हा मागे जास्त वेगात येईल. कारण ज्या भिंतीवर आपण तो चेंडू फेकतो, त्या भिंतीचं बल त्या चेंडूवर कार्य करेल, हे तर सामान्य शास्त्र आहे आणि सृष्टीच्या नियमा प्रमाणे, ब्रह्मांडातील सर्व गोष्टींवर विज्ञानाचे नियम कार्य करतात. आपल्याला काही ज्ञात झालेत, तर काही अजूनही ज्ञात नाहीत, पण नियम आहेत हे नक्की. 

आता अशी कल्पना करा की, फेकताना आपण चेंडूला गती आणि फिरकी दोन्ही दिली, तर काय परिणाम होईल. परत येणारा चेंडू अधिक गतीने तर येईलच, पण त्याची दिशा फेकणाऱ्यालासुद्धा कळणार नाही किंवा अंदाज करता येणार नाही. आता हे सर्व कर्मावर बसवून पाहूया म्हणजे अनेक गोष्टी, ज्या आजपर्यंत अंधारात होत्या त्या स्पष्ट होतील. 

कर्माला जेंव्हा भाव, मनःस्थिती, विचार, इच्छा, वासना यांचं बल व फिरकी, यांची साथ प्राप्त होते, त्यावेळी ते कर्म तोच भाव, स्थिती, विचार, इच्छा, वासना इत्यादी घेऊन जास्त वेगाने अर्थात जास्त परिणाम समोर घेऊन, आपल्याकडेच परत येईल. आता स्वतःच विचार करा की, सर्व ग्रंथ, सर्व सद्गुरू, संत महंत, ज्ञानी इत्यादी कानी कपाळी ओरडून, आयुष्य घालवून,का सांगत आहेत की, नकारात्मक विचार टाका, त्याज्य गोष्टी मनात ठेऊच नका त्यांना तिलांजली द्या, उच्च व सकारात्मक विचारच करा. या सर्वांचा संबंध आपल्या प्रत्येक कर्माच्या वेगाशी आहे. 

म्हणजे आपण सकारात्मक धनभारीत होऊन कर्म केलं तर नक्कीच तो चेंडू इष्ट आणि सकारात्मक परिणाम अर्थात फल घेऊन आपल्याकडे येईल, हे ध्यानात ठेवा. म्हणूनच सर्व स्तोत्र, मंत्र, जागर, आरत्या, काकडे, झाडा फुलांची, पक्ष्यांची किलबिल या सर्व योजना, प्रचलित गोष्टी, कथा, कहाण्या हे सर्व सकारात्मक होण्यास जीव तोडून सांगत आहेत. फक्त हे इतक्या विस्तृतपणे कोणी मांडलं नसेल. हे सर्व उलगडून सांगायचा मतितार्थ आता ध्यानात येईल. 

आता चेंडूचं उदाहरण पुन्हा पाहूया, अजून काही गोष्टी सापडतात का, ते कळेल. असं समजा की, आपण समोर चेंडू न फेकता, आजूबाजूच्या किंवा ३६० कोनात कुठल्याही भिंतीवर चेंडू ताकद लावून, फिरकी देऊन फेकला, तर तो कोणत्या बाजूने परत येईल, हे विधाता आणि ईश्वर दोघेच जाणतील. वास्तविक अर्थाने सुद्धा हेच सत्य आहे. कारण उदाहरण म्हणून फक्त समोर भिंत आहे हे समजणं गोष्ट वेगळी आहे. ते फक्त मुद्दा ध्यानात यावा म्हणून सांगितलं होतं. पण आत्म्याचं  जीवनचक्र हे शब्दशः वर्तुळाकार आहे. म्हणजे प्रत्येक कर्म हे विश्वातील त्या त्या भावाच्या कार्यशक्तीला स्पर्श करायला जाताना, अज्ञातातील कोणत्या दिशेने जाईल, हे या पृथ्वीवर बसून सांगणं अवघड आहे. 

म्हणजे आपण केलेलं कर्म वेग व फिरकी घेऊन, विश्वात संचार करत करत, त्या त्या भावाच्या कार्यशक्तीला स्पर्श करून आपल्याकडे कुठून व कसं येईल, हे जाणणं कठीण आहे. दीर्घ चिंतनाने कदाचित याचा थोडासा उलगडा होईल. पण पूर्ण कल्पना यायला, सद्गुरुकृपा आणि ईश्वरी शक्तीचा आशिर्वाद हा अत्यंत जरूर आहे. त्याशिवाय ते अशक्य आहे. 

विषय खूप गहन आणि मोठा आहे, त्यामुळे पुढचं चिंतन उद्या करूया. पण नाम घेऊन मनातील भाव सकारात्मक करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवू. 

प्रिंट होऊन पुस्तकं कालच प्राप्त झालेली आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू होईल आणि त्यांना तसं सूचित केलं जाईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०) ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत.  

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं आहे. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२९/०९/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...