Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १२

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १२

देवी रुक्मिणी : मग यावर उपाय काय. कारण मार्ग आहे, पण भरकटण्याची शक्यता सुद्धा तितकीच आहे, अश्या मार्गावर चालणे हे घोरच आहे, हे जाणून काही उपाय असेलच, तर तोदेखील वदावा योगेश्वर.

श्रीकृष्ण : अनेक उपाय अनेक मार्ग असतानाच चूक होण्याची शक्यता जास्त असते, आणि यातील काही मार्ग हे कठोर परिश्रम करायला लावणारे आहेतच, पण त्यात यशस्वी होण्याची शाश्वती देता येणार नाहीच, याउलट अपयश आलंच तर जीव अनेक जन्म मागे जाऊ शकतो. 

म्हणूनच सर्व काळी सर्व वेळी सर्व प्राणीमात्रांना सहज सुलभ असं एकमेव साधन सर्व साधू सज्जनांनी, ऋषी मुनी, संत यांनी हा मार्ग मानवास चालण्यास अगदी सुकर करून दिला. मानवाला नरापासून नारायणापर्यन्त आत्मोन्नतीचा साधा सरळ उपाय हाती दिला आहे.

भगवंतानी सर्व जग निर्मिले आणि स्वयंप्रेरणेने जगास स्वचालीत केले. यात सर्व प्रकारे एकमेव साध्य अर्थातच मोक्ष, मुक्ती म्हणजेच भागवतप्राप्ती. वेद पुराण या माध्यमातून अनेक उपाय पराशक्तीला प्राप्त करण्यासाठी योजून देण्यात आले. पण कालानुरूप त्यांचे महत्व व त्यासाठी करावे लागणारे कष्ट असाध्य होत जातील. हे देखील त्यांनी जाणले होते.

कदाचित हे संत महंत ऋषी मुनी यांनीसुद्धा जाणले असावे. याच दृष्ट्या लोकांनी एक असा उपाय मानवास सांगितलाच नव्हे त त्यावर स्वतः चालून उदाहरण घालून दिले, की या उपायाने काय साध्य होऊ शकते. यात त्यांना अर्थातच भगवंतानी नेहमी साथ दिली.

भगवंतांना सर्वात प्रिय अशी एकमेव गोष्ट जी त्यांच्या सगुण आणि निर्गुण दोन्ही रुपात त्याचे अस्तित्व दर्शवते ते म्हणजे भगवंतांचे नाम. नामाचे स्मरण नाम घेणाऱ्याला साधकाचा दर्जा प्राप्त करून देतं. जे सहज साध्य आणि साधन एकाच वेळी दोन्ही आहे ते म्हणजे नाम.

याच नामाच्या आधारावर प्रल्हाद, ध्रुव, हनुमंत, नारद, विभीषण असे अनेक भक्त भगवंतांच्या सानिध्याला प्राप्त झाले. भगवंताच्या नामावर हे देखील निर्गुण रुपात अमरत्व प्राप्त करते झाले. यांनी आपल्या नामावरील  निष्ठेच्या जोरावर
भगवंताला आपल्या हृदयात विराजमान करून दाखवले. यांनी नामाच्या निष्ठेच्या आधारे अनेक संकट व दुर्धर परिस्थितीलादेखील आपल्यासमोर झुकवून दाखवलं.

भगवंत स्वतः नामाचा महिमा स्वमुखे सांगत होते आणि भगवंत स्वतः श्रोता होऊन श्रवणभक्तीचा आनंद घेत होते.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...