Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ५

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ५

श्रीकृष्ण : अनेक आदर्श व अनेक आदर्शांचे मापदंड त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष कृतीने घालून दिले. एक गोष्ट न ठरवता करून दाखवली ती म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या धाकाने, दडपणाने, भयाने वा परिणामाने डगमगून न जाता धैर्याने, पण तितक्याच शांतपणे त्यास सामोरे कसे जावे.  प्रारब्धाचे कोणतेही भोग हे शांतपणे आणि धैर्य राखून त्याचा स्वीकार करून , परंतु त्याने डगमगून न जाता पुढे जात राहणे हेच मानवाचे कर्तव्य आहे.

श्रीशंकर : त्यांचा अजून एक व्यक्तिविशेष जो आम्हाला आवडतो तो म्हणजे आदर्श राजाचा वस्तुपाठच जणू त्यांनी जगाला घालून दिला. राजाने सतत म्हणजे अष्टौप्रहर फक्त जनांचा आणि त्यांच्याच आशा आकांक्षा यांचा विचार करावा.
अगदी एकदा राज्यपदी बसल्यावर स्वतःच्या परिवाराकडे सुद्धा एक प्रजा म्हणूनच पाहावे, याच उत्तम उदाहरण प्रभूंनी स्वतःच्या आदर्शवत जीवनाने पुढील कित्येक पिढ्याना दाखवून दिलं आहे.  राजाने फक्त  लोकोपयोगी कार्य आणि लोकांच्या भल्याचाच विचार सतत करणं गरजेचं आहे. रामराज्य ही एक अशक्य वाटणारी कल्पना त्यांनी प्रत्यक्ष कृतीतच आणली नाही , तर त्याच रक्षण प्रत्यक्ष संसाराचा त्याग करून त्यांनी सत्यात उतरवून दाखवली.

श्रीकृष्ण : हो नक्कीच. एक काट्यावर चालणारं आयुष्य कसं जगावं आणि ते जगत असताना सोसावे लागणारे घाव लीलया  पेलून ही सुळावरील पोळी खाण्याची कामगिरी राजाने केली तर तो एक आदर्श राजा म्हणून प्रजेची सेवा करू शकतो. अश्या आदर्श राजासाठी अनेक नीती नियम स्वतःच्या जगण्यातून तयार करून दिले. त्याचप्रमाणे जे नीतिनियम अनेक युगांपासून चालत आले आहेत आणि ज्यांच पालन  रघुकुलातील सर्व राजानी तसेच जनकादि राजानी आपल्या जीवनात केले, त्या साऱ्या नीतिनियमांचे पालन आपणही उत्तमरीत्या केले. 

श्रीशंकर : अश्या आदर्श राजाला जीवन जगताना मानवी देहात वावरताना आणि त्या देहातील सर्व मर्यादा पाळून एक उत्तम पुरुष म्हणून संयत पण धीरोदात्त जीवन कंठीत करताना पाहण्याचं भाग्य आम्हाला प्रत्यक्ष मानवी म्हणजेच महारुद्र अवतारात पाहता आलं, हे आमचं सदभाग्य. नव्हे तर त्या कार्यात काही वाटा उचलून प्रभुसेवेची अर्थात महाविष्णू सेवेची सुवर्णसंधी प्रभूंनी आम्हाला  दिली याबद्दल प्रभू आपला आजन्म ऋणी असेन. त्याचप्रमाणे या ऋणातून कधीही बाहेर न येण्याची आमची इच्छा आहे. ती इच्छा आपण नक्कीच पूर्ण कराल, नव्हे हा हट्ट आपण पुरवाल यावर ठाम विश्वास आहे.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...