Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ६

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ६

श्रीकृष्ण : खर आहे आपण एकूणच सर्व गोष्टी विश्वाच्या कल्पने विरुद्ध केल्यात.

श्रीराम : आम्ही खूप समयापासून पहात आहोत की आमच्यावर दोन्ही कडून स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. पंचतत्वधारी मानवी देह धारण केल्यानंतर जे भोग भोगावे लागतात, ते भोगूनच संपवावे लागतात. हेच भोग प्रारब्धाचे आणि म्हणून प्राक्तनी आलेले, पण आपल्या कर्माचे असल्याने त्याचा भार न मानता वा अपरिहार्यतादेखील न मानता त्याचा स्वीकार करून तो काळ व्यतीत होण्याची प्रतीक्षा करणं हेच मानवाचं कर्तव्य आहे. नव्हे तो त्या जन्माचा धर्म आहे. प्रत्येक क्षण आधीच्या कर्माचं फल भोगत असताना वा उपभोगत असताना मानव न कळत पुढील फलाची व्यवस्थाच करत असतो.

जीवनाच्या सर्व प्रवासात कमी जास्त, अधिक उण या प्रमाणात चांगलं आणि वाईट,  हे प्रत्येकाच्याच वाट्याला येतं. बर या मध्ये बरेच वेळेला आपला सहभाग नसतानादेखील भोग आपल्या वाट्याला येतात वा  काही भोगणे प्राप्त होतं. अश्या वेळी त्या व्यक्तीचं आपल्यावर काही ऋण असावं असं जाणून त्या समयाला वा प्रसंगाला सामोरं जाणं हाच खरा पुरुषार्थ व तेच आद्यकर्तव्य आहे. 

जे घडलं वा घडेल ते नित्य क्रमाने होत आहे आणि होत राहणार. हे एक प्रकारचं रहाटगाडग आहे. ही एक प्रकारची शृंखला आहे. पण ती जशी समोर येईल तशी स्वीकारत पुढे गेलं तर याचा गुंता न होता प्रश्न उलगडत जातात. अन्यथा तीच शृंखला बेडी बनते आणि मग जन्ममृत्यूचा हा खेळ अनंता पर्यंत सुरूच राहतो.  जन्म कोणताही मिळो मानव वा प्राणी भोग व उपभोग याचीच एक नाजूक दोर तयार असते , तुसुद्धा आपल्याच कर्माने तयार झालेली. आयुष्य हे या नाजूक दोरावर चालण्याचा कष्टप्रद कार्यभाग आहे.

तोल केंव्हा व कुठे जाईल हे सांगणे प्रत्यक्ष ईश्वराला देखील अवघड आहे. अश्या वेळी सावरायला आपले सत्कर्म हेच योग्य वेळी आपल्या कामी येतं. त्याच्याच बळकट आधाराने आपल्या भोगांना आपण सुसह्य बनवू शकतो. यात मुख्य गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपलेच एखादे योग्य कर्म  पाहिजे त्या वेळी वा अयोग्य कर्म नको त्या वेळी समोर येऊन उभे ठाकू शकते. तरीही अश्या प्रसंगी न घाबरता धैर्य राखून व संयमाने कार्य करून अश्या दुर्धर प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी प्राप्त कर्म योग्य रीतीने पार पाडावे, नव्हे तेच आपले अश्या प्रसंगी एकमेव कर्तव्य असते. कदाचित यातूनच काही चांगले उपजेल हा आशावाद असावा.

प्रभू शांत आणि संयत वाणीने बोलत आहेत आणि चक्रधर व चंद्रमौळी आपल्या भार्ये सह, कौतुकाने प्रभुवचन मंत्रमुग्ध होऊन  ऐकत आहेत

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...