Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १०

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १०

श्रीशंकर जे स्वतः त्रिगुणातीत आहेत ते स्वतः प्रश्न करते झाले.

श्रीशंकर : गुणात्मक वा गुणातीत म्हणजे काय यदुवीर.

श्रीकृष्ण : सांगतो.  गुण म्हणजे उत्तम गोष्ट, जी आपली पातळी उंचावते. अश्याच उत्तमोत्तम गोष्टी आयुष्यात मिळवत गेलं तर आयुष्य हे समृद्ध होतच पण जीव  पुढे पुढे जात रहातो.  उत्तम गुण असलेल्या गोष्टी अंगीकारत गेलं की, त्याचे गुणधर्म मनाला चिकटतात व त्याचा परिणाम उत्तम विचार करण्यावर होतो. उत्तम विचार हे सर्वात उत्तम धन आहे.

देवी रुक्मिणी : धनापेक्षाही उत्तम धन ?

श्रीकृष्ण : अर्थातच. मनुष्य उत्तम विचारधन असलेला असेल, तर कोणत्याही परिस्थितीत पुढे आणि वरच्या वर्गाकडे जाण्याचा प्रयत्न करेल. आज उत्तम परिस्थितीत असलेला प्राणी कालांतराने व कर्मफल संयोगाने विपरीत परिस्थितीत अडकला तरीही कधीही हीन दर्जाचा वा नकारात्मक विचार करणार नाही. 

जस स्वतः श्रीराम आणि देवी जानकी किती विपरीत परिस्थिती आली तरीही त्यांनी कधीही नकारात्मक विचार वा आपल्या दर्जापेक्षा खाली नेणारे वा जाणारे निर्णय घेतले नाहीत. यालाच गुणात्मकता म्हणतात.

आता हीच गुणात्मकता मनातून अंतरातम्यात उतरली की प्राण्याची गुणात्मक प्रगती होते.  जस भौतिक जगात हीच गुणात्मक वाढ मानवाला भौतिक प्रगती घडवते. तद्वत ज्या वेळी याच गुणात्मकतेचा वापर अंतरातम्यातून परामात्म्याकडे अर्थात ऐहिक सुखाविपरित पारमार्थिक ज्ञान, भक्ती यांच्याद्वारे चिरंतन चेतनाशक्तीच्या स्रोताकडे जाण्यासाठी वापरला जातो, त्यावेळी आत्मोन्नती ही शाश्वत सत्य होते आणि त्या प्राप्तीच्या मार्गावरील मार्गस्थ भक्त होतो.

याच प्रवासात प्राणी आपल्या अनेक जन्मातील पातकांचा लीलया अंत करू शकतो. नव्हे ती पापं आणि त्याचे दोर एक एक करून तेंव्हा सुटण्यास सुरवात होते, ज्यावेळी भक्त आणि भगवंत चिदानंदात एकरूप होत जातात. या एकरूप होण्यासाठी भक्तीची अजोड अशी किमया भक्ताला घडवावी लागते.

श्रीदेवी रुक्मिणी : इथे दोन शंका आहेत. अनुमती असावी

श्रीकृष्ण : बोल भार्ये.

देवी : प्रथम भक्तीची अजोड किमया म्हणजे काय , ती का घडवावी लागते हे वदावे. तदपश्चात मी दुसरा प्रश्न विचारीन. या शंकेच समाधान व्हावं ही इच्छा आहे.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...