Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ९

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ९

त्या अवताराचे प्रयोजन असाध्य झाले असते. म्हणून नररूपात जन्म घेताना, जर हा पत्नी विरहाचा शाप भोगून संपवायचाच असेल तर तो संपवायला एकमेव जन्म उरत होता तो म्हणजे रामजन्म. 

श्रीशंकर : म्हणजे या अवताराचं प्रयोजन हे या शापाचे परिमार्जन करण्यासाठी होत तर.

श्रीरामांनी शिवशंभोंना शांतपणे पाहिलं. त्या राजीवलोचनात क्षितिजावर दूरपर्यंत पसरलेली गूढ शांतता दिसत होती. संपूर्ण विश्व ज्या डोळ्यात सामावलेले आहे, त्यात शिवशंकर हरवून गेले.  तितक्याच शांतपणे श्रीराम म्हणाले

श्रीराम : महादेव आपण विश्वाच्या उत्पत्तीपासून सोबत आहात. आपण सुदधा जाणता प्रत्येकाच्या जन्माचं कर्मबंधनातून मुक्ती मिळवण्याचा यत्न करण हेच प्रयोजन असतं. अर्थातच मानवी जन्मात येणं हाच मुळात एक योग आहे, मोक्षमार्गाच्या प्राप्तिकडे जाण्याचा. तद्वत आमचा जन्म हा आपण म्हणता त्या कारणासाठी होताच.  ते अनेक कारणांपैकी एक कारण होतं.

अर्थात मुख्य प्रयोजन हे खल निर्दालन होतं.  परंतु कोणाच्याही जन्माचं प्रयोजन अनेक कर्मफलांचा भोग वा उपभोग हा असतो. अनेक कर्म करून पुढील जन्माचं वा पुढील जन्माच्या समाप्तीचं कारण लिहून ठेवणं, हेसुद्धा असू शकतं. नव्हे असतंच.  जस आम्ही रामजन्मांतच कृष्णजन्माच्या समाप्तीचा अध्याय देखील लिहून ठेवला. नव्हे प्रारब्धाने तो लिहून घेतला. शापाचा भाग वा सहभाग हा मुखत्वे त्या कर्माच्या फलाच्या समाप्तीसाठी होता. कारण केलेलं प्रत्येक कर्म हे कधी ना कधी आपलं रूप घेऊन समोर उभं राहतंच राहतं. हा कर्मभाग कोणालाही चुकत नाही. अगदी ईश्वराला वा त्याच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा नाही.

श्रीशंकर : कर्माच्या या बंधनातून वा यात्रेमधून सुटका होण्याचा मार्ग एकच आहे का भोग वा उपभोग.

प्रभू काही वदणार इतक्यात श्रीकृष्ण , जे इतके प्रहर शांतचित्ते ऐकून घेत होते ते वदले

श्रीकृष्ण : कर्माच्या या गतीतून कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, सांख्ययोग अश्या अनेक मार्गांनी सुटता येऊ शकतं. सर्वसामान्य मानवाला भोग भोगून, अर्थात कर्मफल समाप्ती करता येऊ शकते. पण ही बद्धतेची शृंखला आहे. कारण एक कर्मफल भोगत असतानाच आपण नवीन कर्म करून पुढील फलाची तयारी करूनच ठेवत असतो. या न संपणाऱ्या शृंखलेला तोडण्यासाठी तितकंच गुणात्मक वा गुणातीत कर्म हातून होणं गरजेचं असतं.

श्रीशंकर जे स्वतः त्रिगुणातीत आहेत ते स्वतः प्रश्न करते झाले.

श्रीशंकर : गुणात्मक वा गुणातीत म्हणजे काय यदुवीर.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...