Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १६

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १६

श्रीशंकर : सर्व काळी आणि सर्व वेळी ईश्वर कसा व कुठे कुठे पाठीशी उभा राहील व यासाठी प्राणीमात्राने काय करावे म्हणजे या सात्विक छायेच्या प्रभावात प्राणी सर्वकाळ राहील, हे कृपया विस्तृतपणे कथन करावे.

यावर श्रीहरी क्षणाचाही विचार न करता वदते झाले.

श्रीकृष्ण : ईश्वर हा सर्वकाळी आणि सर्ववेळी आत्म्याच्या सर्वात समीप म्हणजे हृदयस्थानी अर्थात हृदयमंदिरी विराजमान असतो. त्याला फक्त साद घालून आपला म्हणणं अत्यंत निकडीचं आहे. ही निकड किती लवकर प्राण्याला भासते त्यावर त्याला तो त्या स्वरूपात समोर येऊन उभा राहतो.

श्रीशंकर : आपला मुद्दा लक्षात आला नाही.  विस्तारपूर्वक कथन करावं जगतस्वामी.

श्रीकृष्ण : जगतपिता आणि जगतस्वामी दोन्ही आपलीच रूप आहेत. ( स्मित हास्याने दोघे एकमेकांना पाहतात). विस्ताराने कथन करतो. ऐकावं श्रीमहादेव. हे जगत भगवंताच प्रकट रूप आहे. म्हणजेच इथे सत् असत् , जन्म मृत्यू, पाप पुण्य, सर्व त्याचं असणं वा नसणं यावर अवलंबित आहे.

ईश्वराचं अधिष्ठान म्हणजे सत्य, पुण्य अर्थात सकारात्मकता आणि त्याच नसणं म्हणजे पाप, मृत्यू वा नकारात्मकता.

श्रीशंकर : ईश्वराचं  अस्तित्व सर्व चराचरात. मग असणं आणि नसणं म्हणजे नक्की काय सांगाल जरा उलगडून. श्रीयोगेश्वर.

श्रीकृष्ण : ईश्वराचं अस्तित्व नाही अशी जगात नव्हे ब्रह्मांडात एक तिळभर देखील स्थान नाही. पण या अस्तित्वाला अर्थ फक्त आणि फक्त स्मरणाने प्राप्त होतो. ज्या स्थानी, ध्यानी आणि मनी ईश्वराचं स्मरण आहे तिथे तो स्मरणकाळी आहे यात शंकेला वाव नसावा, कणभर देखील नसावा.

स्मरणाचा अर्थ भक्ती, योग, याग हे अनेक मार्ग असा आहे. परंतु उद्देश ईश्वराचं स्मरण राहावं. ते जितकं अधिक तितकी सकारात्मकता अधिक, तितकाच ईश्वर समीप अधिकाधिक. या स्मरणाचा मार्ग कोणताही निवडावा स्थल काल याप्रमाणे.
त्या त्या युगात तो तो मार्ग श्रेष्ठ ठरेल, नव्हे काळ त्याला ठरवेल. कधी यज्ञ याग, कधी योगयाग, कधी तपादी साधने प्रबळ होती. परंतु .......

सर्व उपस्थित देवी देवता श्रीकृष्णांकडे प्रश्न, कुतूहल आणि उत्सुकता या भावाने बघत होते. एक क्षण थांबून श्रीकृष्ण पुढे वदले.

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...