Skip to main content

जानकी पुनःवनवास ५९

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ५९

प्रभुनी या प्रणामाचा स्वीकार केला आणि ते पुढे गेले, जिथे राजा सुग्रीव उभे होता. त्याना प्रभुनी आधी नमन करून मग आलिंगन देऊन गळाभेट घेतली आणि प्रभु वदले

" राजा सुग्रीव "

"प्रभु आपल्यासाठी फक्त आणि फक्त सुग्रीव. राजा तर किष्किंधेचा मीही नन्तर झालो आणि आपणसुद्धा अयोध्यानरेश नन्तर झालात. पण मी रिक्तहस्त असताना फक्त माझ्या सेनापतिच्या हनुमंताच्या शब्दान्वर विश्वासुन तुम्ही मला सखा मानलत आणि मला धन्य केलेत. "

सुग्रीवा अरे मीच ज्यावेळी द्विधा मनस्थितित आणि जानकीला  गमवून तिच्या शोधार्त विमनस्क स्थितीत असताना तू अगदी प्रत्यक्ष देवासारखा धावून आलास . सुग्रीवा अरे त्याच मोल म्हणून शतजन्म तुझा ऋणी राहीन आणि शतजन्म मी त्यासाठी उपकृत असेन."

"प्रभु उपकार ह्या शब्दाने आपण आमच मोल तोलू नये. इतकं मोठ काही केलय अस आम्हाला कोणालाही वाटत नाही. किंबहुना आम्हा  लोकांची ती परंपरा आहे. जेंव्हा एखाद्याला आपल मानल की प्रत्यक्ष प्राणसुद्धा आम्ही त्यागुन दिलेला शब्द पूरा करू. प्रभु आणि आपण जे माझ्यासाठी वैयक्तिक व किष्किंधा नगरीसाठी केलय त्याचे उपकार हे अनंत जन्मापर्यंत मी परत फेडू इच्छीत नाही"

"अर्थात"

" अर्थात तितके जन्म आपण आमचे सखे म्हणून पुन्हा पुन्हा येत रहाल आणि आम्ही आपल्या दर्शनमात्रे धन्य धन्य होत राहु"

अस म्हणून प्रभुनी पुन्हा सुग्रीवलां दीर्घ आलिंगन दिल आणि ते वळले लंकानरेश विभिषणाकड़े. इथे प्रभु बराच वेळ विभिषणाच्या नजरेत न्याहाळून बघत होते. यावर विभीषण म्हणतो

" प्रभु क़ाय पाहात आहात"

" तुझ्या माझ्यावरील स्नेहाला क़ाय उपमा द्यावी यांच विचारात आहे मी. त्यासाठी शब्द जमा करत होतो."

विभिषणाने यावर साश्रु नयनानी प्रभुना पाहिल. प्रभु पुढे म्हणाले

"इतकि माया प्रत्यक्ष शत्रुवर केलीस विभिषणा तू"

प्रभुना मधेच अडवून विभीषण म्हणाला

"प्रभु शत्रु आणि मित्र याचा निर्णय फक्त काही गोष्टीनवरुन करता येतो जो मी केला"

" कोणत्या गोष्टी विभिषणा "  प्रभुनी पृच्छा केली

विभीषण किंचित स्मित करून म्हणाला

" प्रभु हा निर्णय खरतर प्रत्येकाच्या आयुष्यात अनेकवेळा येतो. पण कधी कधी हा निर्णय सहज सोप्पा नसतो. कारण तो कदाचित स्वकियांविरुद्ध जाण्याप्रत  असु शकतो.  अश्या संघर्षाच्या समयी मी या बाबी विचारात घेतल्या की

१. धर्म कोणत्या बाजूने आहे
२. सत्य कोणत्या बाजूला आहे
३. सारासार विवेक क़ाय दिशा दाखवतो
४. निर्णय घेतल्यावर आपला अंतरात्मा आपली साथ देईल
     का नाही.

प्रभु इथे मला भ्राता कुम्भकर्णाचे शेवटचे शब्द आठवतात . भ्राता कुंभकर्ण जाणत होते की धर्म आणि सत्य प्रभुंच्या बाजूने आहे. म्हणून शेवटची  विनंती त्यानी ज्येष्ठ भ्राता दशानन याना केली की अजूनही वेळ गेली नाही, आपण श्रीरामांना शरण जाऊन त्यांच्या धर्मपत्नी सीतेला माघारी पाठवावे आणि समेट घडवून आणावा. पण त्यानी ऐकल नाही आणि पुढच युद्ध घड़लच. त्यावेळीच मला या गोष्टीची कल्पना आली की आपल्याला या दोन गोष्टीतुन एक निवडायची आहे. निर्णय अवघड़ नव्हता पण सहज सुद्धा नव्हता. मी धर्माची आणि सत्याची वाट चाललो. आपण आपल्या वचनाला जगलात प्रभु. तू सत्य आणि धर्म या वाटेवर पाऊल टाक त्यानन्तर तुझी जबाबदारी माझीच. आपण आपला शब्द खरा केलात प्रभु. म्हणूनच मी आपली साथ देऊ शकलो. "

विभिषणासह सुग्रीव , अंगद, या सर्वांचेच लोचन भरून आले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...