Skip to main content

जानकी पुनःवनवास ६०

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ६०

  या वेळपर्यन्त वाली पुत्र अंगद जो एकटक भगवंतांकड़े पाहात होता, त्याकड़े प्रभुंच ध्यान आकर्षित झाल. भगवंत त्याच्यां जवळ जाऊन त्याला उभ करून म्हणाले

" हे वालीपुत्र अंगद काय पहातो आहेस इतकं भान हरपुन "

"प्रभु आपल्या मुखकमलावरुन नजर कशी दूर व्हावी आणि का, यांच कारण मिळता मिळत नाहीये. आपल मनोहारी रूप एकदा ज्याच्या नजरेला पडेल, त्याला त्याची मोहिनी जडणार नाही हे कस शक्य आहे. पिताश्रीदेखील मृत्यु समयी माझा भार तुमच्यावर टाकून गेले होते. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की या चरणांपाशी मला कायमस्वरूपी स्थान द्या."

" वालीपुत्र अंगदा तुझ हित अहित माझ्या इतकंच सुग्रीव बघण्यास समर्थ आहे आणि म्हणून मी तुला सुग्रीवाच्या सुपुर्द करीत आहे. ते तुझी माझ्या इतकिच किंबहुना जास्तच काळजी घेतील हा मला विश्वास आहे."

यावर बऱ्याच विनवण्या केल्यानन्तर अंगद सुग्रीवासोबत जाण्यास राजी झाला. या नन्तर प्रभु, इतका वेळ हात जोडून शांत चित्ते साश्रु नयनानी हा हृद्य सोहळा पाहात  नव्हे अन्तरात्म्यात साठवून ठेवत उभा असलेल्या प्राणप्रिय भक्त दासांचा दास हनुमंत , याच्याकडे वळले आणि हनुमंताला आलिंगन देण्यास पुढे आले. हनुमंताने त्वरित प्रभुंचे चरण धरुन , प्रभुंचे चरणकमल अश्रुनी शब्दशः धुवून काढले.  प्रभुनी त्याला खांद्याला धरुन उभ केल आणि आलिंगन दिल
लोचनात तिघांच्याही अश्रु आहेत. हनुमंत , प्रभु स्वतः आणि देवी जानकी.

प्रभु हनुमंताला म्हणाले

" तुझे तर अनंत उपकार आहेत आम्हा उभयतांवर. अनेक जन्म भरून काढता येणार नाही इतकि कृपा केलीस तू आमच्यावर.  रघुकुलाची प्रतिष्ठा प्राणपणाने जपलीस तू आणि सीतेला शोधलस. जऱ तू नसतास तर मी कल्पनाही करू शकत नाही की माझ क़ाय झाल असत."

"स्वामी आपण अकारण मला महत्व देत आहात.  तुम्ही साक्षात युगपुरुष, कैवल्यधाम, मायामोचन, सकलदुःख निवारक, त्रिविध ताप ज्यांच्या पायाशी लोळण घेतात तेच , अमोघ शक्तिचा स्त्रोत, प्रत्यक्ष ब्रम्हा व महेश ज्यांचे भक्त आहेत , ज्यांच्या एका संकल्पात प्रत्यक्ष ब्राम्हण्ड ,सर्व जीवशिव सृष्टि उभी राहिली, ज्यांच्या शरीरावरील एका करंगुलीहुन सुद्धा सम्पूर्ण ब्राम्हण्ड  मोठ नाही असे जगतपालक माझे भाग्य आहात. तुमच्या एका संकल्पाने रावण क़ाय, पण समस्त विश्वातील सर्व दानव शक्ति क्षणात चूर्ण होऊ शकतात , त्याना मी सेवक क़ाय सहाय्य  करणार प्रभु. त्याउप्पर इतके सक्षम असूनही आपणच माझ्याकड़ून ही सेवा घडवून घेतलित. या सेवेच दान माझ्या पदरी टाकलत आणि माझ नाव काहीही क्षमता नसताही त्या यशाला जोड़ल गेल."

" हनुमंता अरे इतकं सर्व स्वतः करून पुन्हा श्रेयाचा धनी न होता तू यापासुन बाजू होऊ इच्छितोस. किंबहुना त्या श्रेयाचा मलाच धनी करू पहातोस. हे पवनसुता तू खरच एकमेव श्रेष्ठतम भक्त आहेस. ज्याच्या असण्याने प्रत्यक्ष स्वामिलाही संतोष , गर्व आणि असीम आनंद प्राप्त व्हावा. स्वये शक्तिचा सागर, बुद्धीचे आगर  आहेस तू. मनात आणलस तर सम्पूर्ण विश्व एकाच क्षणात नष्ट करण्याची क्षमता असलेला असा, जणु महारुद्र, परमप्रतापी, धैर्याची परिसीमा , पवित्रतेचा परमोच्च बिंदु  तसेच भक्ति आणि दास्यत्वाची अजोड़ आणि अनुपम मूर्ति आहेस. तुझ्या या सर्व गुणासह तू या समस्त विश्वात ख्यात आहेस आणि अनंत युगांपर्यंत असाच अढळ राहशील हाच माझा तुला आशीर्वाद आहे , हनुमंता. तुझ स्थान माझ्या हॄदयी कायम श्रेष्ठ भक्त आणि भक्तिच सर्वोच्च उदाहरण म्हणून कायमच राहिलं आणि युगानुयुगे तुझेच नाव माझ्या नावसोबत भक्त म्हणून जोड़ल जाईल."

भक्त आणि भगवंत दोघेही एकाग्र चित्ते एकमेकांच्या डोळ्यात पाहात आहेत, जणु एकमेकांच्या हॄदयात एकमेकांना पाहात आहेत आणि सारी सभा आश्चर्य मुद्रेने हे दृश्य डोळ्यात साठवत आहे.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...