Skip to main content

जानकी पुनःवनवास ४४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ४४

त्या अनुपम रूपाची मोहिनी, सम्पूर्ण जगताला या क्षणी गारुड घालुन स्वये त्यात लुप्त झाली होती. त्याची प्रभा आणि तेजोवलय यात समस्त जगत जणू हरवून आणि हरखुन गेल होत. चौदा वर्षानंतर घडलेल हे दर्शनसुख आणि योग साधण्यासाठी नभोमंडली समस्त तारांगण, चंद्र, सूर्य, इंद्रादि देव, सप्तऋषि, सर्व सुरगण, गन्धर्व, यक्ष, किन्नर, स्वर्गातील अप्सरा, महाविष्णूंच्या नाभीतील कमलास्थित ब्रम्हदेव आपल्या आठही नेत्रातून हे अलौकिक दृश्य साठवून घेण्यास पातले होते. पार्वतीसह प्रत्यक्ष नंदिकेश्वर नंदीवर आरूढ़ होऊन आकाशातून या दिव्य तेजोमय रूपाच्या साक्षार्थ येऊन प्रणाम करते झाले होते.

जिथे प्रत्यक्ष देव , महादेव आणि सुरवर यांची ही स्थिति तिथे तिनहि भ्राता या अवर्णनीय रुपाला पाहुन मोहित झाले नसते तरच नवल होत. सर्व बंधू त्या तेजाने आपणहुन नतमस्तक झाले. स्वये हनुमंत आपल्या स्वामींच्या या स्वरूपाला पाहून वदता झाला

दिव्यची रूप अलौकिक तेज
प्रभा जयांची अनुपम पसरली
सहस्त्र सूर्याला झाकुनिया
दशांगुळे भरूनी ती उरली

सुलोचन भाळी केशरी गन्ध
कांचन रत्नाची ती शोभा
सुरेखित ऐसे नासिकाग्र
सुवर्णमुकुट वाढवी प्रभा

स्कंध भुजा बहुलांब असे
वज्रबाहु रिपू हो कंपित
मध्यभाग नरश्रेष्ठ थोर हा
नवग्रह होय जयाचे अंकित

बहुमोल पृष्ठी तीरकमठा
रामबाण ज्याची क्षमता
काळ कापे हे रणी उतरता
श्रीरामस्वामी मी दास हनुमंता

हनुमंत लोचनात ते रूप साठवून घेण्यासाठी प्रभु समक्ष जाऊन उभा ठाकला. एकटक प्रभुंच्या या दिव्य स्वरूपाला काही क्षण न्याहाळल्यावर प्रभु वदले

"हनुमंता क़ाय पहातोयस".

" प्रभु आपली प्रथम भेट झाल्यापासुन आजपर्यंत आपल्याला मी फक्त तपस्वी परिधानात पाहिल आहे. पण ज्या रूपाची मोहिनी प्रत्यक्ष तिन्ही लोकांना आहे, त्या राजसी रुपात आपल्याला पाहण्याचा योग माझ्या प्रारब्धात आज आला आहे. हे माझ अहोभाग्य आहे.  ते मनोहारी रूप हॄदयात साठवून ठेवू दे. युगायुगात हा योग आला आहे. म्हणून जरा हे रूप डोळ्यात साठवून घेतो."

हनुमंताच्या या लाघवी आणि मधाळ बोलण्याच्या मोहात अडकाव तर विश्वाचा स्वामी हे मोठ पद समोर येत आणि अव्हेराव तर हनुमंत तर आमच्या हॄदयात आहे कस नाकारणार . यांच विचारात असलेले प्रभु.  त्यानी हनुमंताच्या डोळ्यात रोखुन पाहिल आणि प्रभुंची चित्रमय प्रतिमा हनुमंताच्या लोचनावाटे थेट हॄदयात स्थित झालेली फक्त भक्त आणि भगवंत यानाच जाणवली आणि हनुमंताने चरणांवर माथा टेकुन प्रणिपात केला. भगवंतानी हनुमंताला आलिंगन दिल.

तदनंतर तिन्ही बंधुनी प्रभुना आधी पदस्पर्श आणि प्रभुनी त्याना आलिंगन असा चित्ताकर्षक सोहळा पार पडला. इतक्यात प्रतिहारीं आदबीने येऊन काही सांगण्याची अनुमति मागता झाला.  त्यावर भरत म्हणाला

"क़ाय निरोप आहे आणि कोणाकड़ून आलाय. ज़रा सविस्तर सांग"

आज्ञा मिळताच  प्रतिहारीं म्हणाला

" स्वामी ,महर्षि वशिष्ठ त्यांच्यां शिष्यगणासह भेटीची आज्ञा मागत आहेत. क़ाय आज्ञा आहे"

भरताने भ्राता श्रीरामाकडे एकवार पाहिल. प्रभुनी होकार दर्शवला. भरताने प्रतिहारिला निरोप दिला

" कुलगुरु वसिष्ठ आणि शिष्याना आत घेऊन या आम्ही येतोच "

अस म्हणून भरताने प्रभुना म्हटल

" ज्येष्ठ भ्राता आम्हीच कुलगुरुना पाचारण केलय. त्यांच्याशी आपल्या बहुप्रतीक्षित आणि आमच्याही जिव्हाळयाची गोष्ट म्हणजेच आपला राज्याभिषेक सोहळा ,याविषयी ठरवून अंतिम स्वरूप देण्यावर चर्चा करण्याची  गरज आहे. म्हणून "

यावर प्रभु गंभीर पणे म्हणाले.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...