Skip to main content

जानकी पुनःवनवास ३८

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ३८

हनुमंत किंचित स्मित करून वदते झाले.

" सम्पूर्ण विश्व ज्यानी आपल्या संकल्पमात्रे निर्मिले आणि त्याच विश्वासाठी त्रिदेव निर्माण करून व्यवस्था पूर्णपणे स्वयमचलित करून आपण त्याविश्वाचा अंशमात्र न राहता पूर्ण तटस्थ राहून निजानंदात जे रत असतात, अश्या त्या परम ईश्वर आणि दयाळू जगदिशांविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही हे जाणून तुमच्या आज्ञेनुसार मी मला जे ज्ञात आहे आणि माझ्या अल्पमतिनुसार काही सांगतो. काही चूक झाल्यास ती माझ्या शब्दान्ची असेल हे जाणाव"

"हनुमंता तू एक उच्च पातळीवरील भक्त आहेस , तद्वत तुझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा सार्थ, यथार्थ आणि परमार्थच असेल. तू बोलत रहा मी ऐकत राहतो"

भरताला पुन्हा वंदन करून हनुमंत सांगतो

" तुमच्या माझ्या सर्व विश्वाच्या बुद्धिला जरी एकत्र केल तरीही त्यांच्याविषयी आकलन होणार नाही. अखिल विश्व आणि पंचमहाभूतं त्यांच्यां आज्ञेनुसार कार्यरत झाली, आणि त्यांच्या संकल्पपूर्ति पर्यन्त ते अखंड कार्यरत राहिलं. समस्त विश्वाची प्रेरक , चैतन्याचा स्त्रोत आणि शक्तीचे उगमस्थान तेच आहेत."

" हनुमंता एक गुंता झालाय तो जरा विस्ताराने सांग. जऱ सर्व त्यानी निर्माण केलय, सर्व त्यांच्या आधीन आहे , आणि सर्वात तेच आहेत, पण तरीही हे दानव, मानव, हे पापकर्म करतात त्याही मागे त्यांचीच प्रेरणा असा अर्थ नाही निघत का यातून. जरा स्पष्ट सांग. कारण हे बुद्धिपलिकडील आहे"  अस म्हणून भरत आदरयुक्त नमस्कार करतो.

भरताने नमस्कार करताच हनुमान किंचित प्रश्नार्थक झाले. ते पाहून भरत वदला

"हनुमंता अरे ज्ञान जो देतो तो वंदनीय आणि पूजनीय आहे . तरच त्या ज्ञानाचा उचित अर्थ बुद्धिद्वारे आत्म्याप्रत पोचू शकतो. अन्यथा ध्वनित अर्थदेखील बुद्धिला प्राप्त होणार नाही, अस शास्त्रवचन आहे.  म्हणून हा नमस्कार. अन्यथा तुला असा भास होईल की तू एका कातळाशी बोलत आहेस."

भरताच्या या उत्तराने प्रसन्नचित्त मारूतिराया पुढे सांगतात

" विश्वनिर्मितित भगवंतांचा संकल्प हा एका स्वयमचलित विश्वाचा आहे, हे कायम ध्यानात ठेवा. त्यांमुळे भगवंतांचा अंश जरी प्रत्येक शरीरात , प्रत्येक सजीवात नव्हे चराचरात जरी असला तरीही पंचमहाभूतांच्या या जड़देही आल्यावर आत्माला मूळ स्वरूपाचा विसर पडतो, आणि या विश्वात संचारित असलेल्या  मायातत्वानुसार आपला उगम आणि अंतिम निर्गमन कुठे असावे , व्हावे वा कुठे जावे हेच तो विसरतो. हा सर्व भौतिक जगत , पँचमहाभूतयुक्त देह आणि माया याचाच एकत्रित परिणाम आहे भ्राता भरत"

हनुमंत पुढे बोलणार इतक्यात भरत प्रश्न विचारतो.

"पण मग जऱ संकल्प ईश्वराचा आणि माया, भौतिक जगत हेही त्यानेच निर्मिले हे का. म्हणजे यांची सांगड कशी घालायची. बुद्धिपलिकडी या गोष्टी विस्ताराने सांग , जेणेकरून त्यांचे आकलन होईल. "

हनुमंत पुढे बोलतात.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...