Skip to main content

जानकी पुनःवनवास ४६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ४६

आणि चारही बंधु चार वेगवेगळ्या कार्याकरता चार वेगळ्या दिशाना गमन करतात.

भ्राता भरत त्वरेने अतिथि गृहाकडे निघतो, जिथे महर्षि वशिष्ठ अर्थात रघुवंशाचे कुलगुरु आणि त्यांचा शिष्यगण आधीच येऊन आसनस्थ आहेत. आत अर्थातच वर्दी गेलेली आहे की, भ्राता भरत येत आहेत. महर्षि वशिष्ठ आपल्या आसनी स्थित आहेत . त्यांचा स्नानसंध्या आणि नित्य पूजाअर्चना विधि समाप्त झाला आहे आणि ते ध्यान लावून नामस्मरणी रत आहेत. त्यानी ध्यानाला बसण्याआधी प्रमुख शिष्याला सांगून ठेवल आहे की राजगृहाकड़ून कोणीही आल की मला लगेच तशी वर्दी द्या.

आणि म्हणूनच प्रमुख शिष्य त्याना तशी सूचनां देतात. थोड्याच अवधित भ्राता भरत कक्षात प्रवेश करतो.  गुरुदेव वसिष्ठ त्यांचे कुलगुरु आणि शिक्षक असल्यामुळे भरत मोठ्या आदबीने हात जोडून महर्षिंच्या ध्यान समाप्तीची प्रतीक्षा करत आहे. मधल्या अवधित भरत तेथील व्यवस्था आणि इतर शिष्यगण यांची मोठ्या आस्थेने विचारपूस करतो. त्यातील काहीजण चारही बन्धु आश्रमात शिकत असताना त्यांचे सहआध्यायी असतात. त्यांमुळे जिव्हाळयाच्या काही गोष्टी आणि काही जुन्या आठवणी यांची गुम्फण त्यांच्यां चर्चेत असते. सर्व शिष्यगण ते ऐकण्यासाठी तिथे जमा होतात. 

अतिथि विश्राम गृह हा राजप्रासादातील एक विस्तीर्ण आणि सुशोभित परिसर आहे. त्यात अनेक कक्ष आहेत. येणाऱ्या अतिथींच्या श्रेणिनुसार त्यांच्या राहण्याची , जलपान व भोजन याची चोख व्यवस्था तिथे आहे. त्याच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागात पुरेसा सेवकवर्ग आहे. त्या सेवकवर्गाच्या सहकुटुंब  राहण्याची व्यवस्था देखील तिथेच केलेली आहे, जेणेकरून अतिथीना कोणत्याही गोष्टीन्ची कमतरता भासणार नाही.

तसेच त्यासाठी एक मंत्री दर्जाचा अधिकारी नियुक्त आहे. या अतिथी विभागाच्या सर्व चोख व्यवस्थेचे अधिकार व जबाबदारी त्याच्याच शिरावर आहे. त्याचबरोबर त्यासाठीच्या खर्चाची विशेष तजवीज राजखजिन्यातून करण्यात आली आहे. मंत्रिपदाला साजेस भवन सुद्धा त्याच विस्तीर्ण परिसराच्या उत्तर बाजूला बांधले आहे. ज्यामधे मंत्रीगण व त्यांचा सेवक वर्ग सहकुटुंब निवासास आहेत.  त्या सम्पूर्ण परिसरात अनेक भव्य व्रुक्षांची दाटि होती आणि त्यायोगे अतिथिगृहाचा विस्तीर्ण भूभाग हा सदोदित सावलित असे. तरीही  शरयुनदितून पाणी आणवून दिवसातून तीन ते चार वेळा परिसरात फवारुन  गारवा निर्माण करण्यात येत असे.

राजप्रासादात अनेक कामांसाठी अनेक ठिकाणाहून अतिथि येत असत. त्या सर्वाना विना मोबदला राहण्याची उत्तम व्यवस्था , अतिथि श्रेणिनुसार होत असे. यात त्यांच्यां राहण्या व खाण्यासह सर्व व्यवस्था चोख असे , तसच त्याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही हे पाहण्याच काम या विभागाचे असे. त्याचप्रमाणे जऱ काही तक्रार वा उणीव असेल तर सम्बंधित प्रमुख व वेळप्रसंगी  मंत्री देखील उपलब्ध असेल अशीच नियमावली करण्यात आली होती, व त्याची काटेकोर अंमलबजावणी होते यावर प्रसादाकड़ून लक्ष ठेवल  जात असे.

कारण    "अतिथि देवो भव"  चा सुवर्ण काळ होता तो

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...