Skip to main content

जानकी पुनःवनवास ४५

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ४५

अस म्हणून भरताने प्रभुना म्हटल

" ज्येष्ठ भ्राता आम्हीच कुलगुरुना पाचारण केलय. त्यांच्याशी आपल्या बहुप्रतीक्षित आणि आमच्याही जिव्हाळयाची गोष्ट म्हणजेच आपला राज्याभिषेक सोहळा ,याविषयी ठरवून अंतिम स्वरूप देण्यावर चर्चा करण्याची  गरज आहे. म्हणून "

यावर प्रभु गंभीर पणे म्हणाले.

"मी हे तुम्हाला कोणत्याही गैर हेतुने अथवा गैरअर्थाने विचारत नाही. पण एका शुद्ध हेतुने आणि भावाने विचारत आहे की, तुम्ही या बाबतीत सखोल विचार विनिमय आणि सर्व संबंधित जसे तिनहि माता, राज्याचे  अमात्य, मंत्रीगण सेनापति यांच्याशी चर्चा केली आहे का? त्याचप्रमाणे लोकमताचा कल ध्यानात घेतला आहे का ? "

प्रभु पुढे म्हणतायत

"कारण त्यावर पुढील कारभाराची दिशा आणि रूपरेषा ठरवता येईल. मी हे यासाठी विचारत आहे की, येथे मधल्या चौदा वर्षात भ्राता लक्ष्मण व मी वनात आणि भ्राता भरत नंदीग्राम येथे होतो.  म्हणून हे जाणून घेणे निकडीचे आहे. एक प्रजादक्ष राज्यकारभार करण्यासाठी ते खुप गरजेचे आहे.  किंबहुना अश्या सर्वमान्य राजालाच पुढे उत्तम कारभार करणे सोप्पे जाते अस वेद शास्त्र आणि गतस्मृति सांगतात. इतकाच माझ्या विचाराचा हेतु आहे, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा अश्या बहुमताने घेतलेले निर्णय दीर्घकाल टिकतात आणि अधिक परिणामकारक असतात, तसेच ते लादले गेलेले नसतात."

लक्ष्मण आपले विचार प्रकट करतो.

"ज्येष्ठ भ्राता यामधे सर्व प्रथम चार जणांच्या विचारांना आपल्याला क्रमाने महत्व द्यावे लागेल.

-   सर्वात प्रथम राजपरिवारातील माता आणि इतर ज्येष्ठ यांचे क़ाय मत आहे. 

- दूसर म्हणजे आचार्य, कुलगुरु व धर्मातील इतर ज्येष्ठ मंडळी

- तिसर मत हे अमात्य , मंत्रीगण आणि सेनापतिंच

- चौथ मत हे प्रजाजनांच.

आता आपण यावर विचार करूया. भरता तुझ मत क़ाय आहे याबाबत."

"ज्येष्ठ भ्राता आणि लक्ष्मण व शत्रुघ्न , यावर मातांच्या नकाराचा वा दुमताचा प्रश्न उद्भवेल अस वाटत नाही मला. अमात्य व मंत्रीगण तद्वत सेनापति यांच्याशी गेल्या चौदा वर्षातील सर्व बोलण्यातून आणि त्यांच्यां वागण्यातून मला हे लक्षात आलय की,  पिताश्रीनंतर ज्येष्ठ भ्राताच एक कुशल , न्यायी, व उत्तम राजा म्हणून रघुकुलाची कीर्ति द्विगुणित नव्हे शतगुणित करतील. प्रजाजनांची प्रतिक्रिया व मत,  ज्येष्ठ भ्राता आपण, चौदा वर्षानपुर्वी प्रत्यक्ष पाहिलय आणि अनुभवलय . जयामध्ये मागील चौदा वर्षात एक शत औंस तीळ देखील बदल होणे संभवत  नाही.  तरी सुद्धा आपण यावर पुन्हा सर्वांशी चर्चा करून सर्वमान्यता बघुया. माझ व्यक्तिगत मत यावर खरच विचार करण्याची गरज नसावी. "

लक्ष्मण त्वरेने म्हणतो

" ज्येष्ठ भ्राता आपल्या मनात अशी शंका येण्यास कारण कदाचित "  अस म्हणून तो फक्त एकदा भरताकडे बघतो , त्यावर भरत लगेच उत्तरतो

" होय ज्येष्ठ भ्राता लक्ष्मण म्हणतोय तस कदाचित माता कैकईमुळे तर आपण शंकित नाही ना?"

यावर आतापर्यंत शांत पणे ऐकणारे प्रभु वदले

" भरता आणि लक्ष्मणा ती एक शक्यता तपासून पाहणे गरजेचे आहेच. पण त्याची चिंता आपण करू नये. माता कैकईशी यावर मी स्वतः चर्चा करून त्यांचे मत जाणून घेईन.  त्यासाठीच मी मातेच्या महालात निघतोच.  पण आचार्य, कुलगुरु आणि शिष्यगणाला भरता तू सामोरा जा, व शत्रुघ्ना तु अमात्य , आर्य सुमंतासह इतर सर्व मंत्रीगण व सेनापति याना विचारविनिमयासाठी अन्तःपुरातील खाजगी कक्षात येण्यासाठी त्वरेने निरोप पोचतील अशी व्यवस्था कर. लक्ष्मणा तू माता कौसल्या व सुमित्रा यांच्याशी बोलून व त्यांचे मत जाणुन घे.  मी माता कैकईसह इतर ज्येष्ठांशी वार्त्तालाप करून खासगी कक्षात लक्ष्मणा तुझी वाट पाहिन. काही शंका असल्यास आपण त्यावर नन्तर सविस्तर चर्चा करुच."

यावर सर्व बन्धु भ्राता श्रीरामाना म्हणतात

" जशी आपली आज्ञा ज्येष्ठ भ्राता "

आणि चारही बंधु चार वेगवेगळ्या कार्याकरता चार वेगळ्या दिशाना गमन करतात.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...