Skip to main content

कवडसा 8

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु ………

शीतल अशीच एकटक आकाशाकडे कितीतरी वेळ बघत होती…     आणि अचानक टेबलावर वाजत असलेल्या मोबाइलच्या रिंगने  भानावर आलेल्या शीतलने मोबाइल उचलून पाहिला.  तीन मिस कॉल्स आले होते एका अननोन नंबर वरून. शीतल शक्यतो माहिती नसलेल्या  नंबर वरुन आलेले फ़ोन   घेत नसे.   हां सुद्धा   कॉल तिने घेतला नाही.   पण लगेचच त्याच नंबर वरुन  मेसेज आला  "मॅडम महत्वाच् बोलायचय, फ़ोन घ्यायला हरकत नाही , मी परत फोन करतोय - योगेन्द्र पुरोहित" .
शीतलला  नाव ओळखीच वाटत होत  आणि  लगेचच तिच्या लक्षात आल की योगेन्द्र तिच्याच  बरोबर कॉलेज मध्ये होता. थोडासा लाजरा , गोरा , साधा, सरळ, पण मुलींशी फार न बोलणारा. आणि आपण तर कधी त्याच्याशी बोलल्याच आठवत नाही.  पण आज आता इतक्या वर्षानी  याच काय काम असेल आपल्याकडे. मधल्या चार वर्षात कोणा  कोणाला समरबददल कळलय काही कळायला मार्ग नाही. आपण मृदुल आणि साक्षी यांच्याच  संपर्कात होतो.
मृदुल आणि साक्षी माझ्या ख़ास जीवा भावाच्या मैत्रिणी, अगदी बहिणी समान, म्हटल  तरी चालेल. मृदुल नावाप्रमाणेच नाजूक गोरी पान दिसायला उत्तम सर्वात महत्वाच् म्हणजे निरागस आणि निष्पाप . बोलताना सुद्धा तिच्या स्वभावातील हळुवारपणा जाणवायचा. खूप गोड हसायची सुद्धा. आम्ही दोघी तिला हसरी बाहुली म्हणून चिडवायचो. ( ते आठवून शीतल स्वतःशीच  मिश्किलपणे हसली. शीतल स्वतः सुद्धा खूप गोड हसते.) 

या उलट साक्षी, बोलायला बिनधास्त, तडफदार, एखाद्या बद्दल किंवा विषया बद्दल आपला मत बिनदिक्कतपणे, स्वच्छ शब्दात, मांडणारी.  समरने तर तिला झाशीची राणी असच नाव ठेवल होत . एकप्रकारे स्पष्टवक्ती. कोणत्याही प्रश्नावर विशेषतः स्त्रियांसंबंधीच्या प्रश्नावर ती तडफेने आणि स्पष्टपणे बोलणारी होती किंवा असते. त्यावेळी तिच्या हातात नाही पण जिभेवर नक्कीच तलवार असते. आणि आम्ही दोघी तिला कायम समजावतो …   अग हो हो…    आपण युद्ध करत नाहीयोत साधी चर्चाच तर आहे. 
आमच्या तिघींचा मनाचा एक कोपरा ख़ास राखून ठेवलेला आहे एकमेकीसाठी. शाळा, कॉलेज, लग्न, मूलं , संसार, या सगळ्या  व्यापात सुद्धा सुट्टीत चार दिवस निवांतपणे भेटण आम्ही  अजुन टिकवलय . खरच काळाच्या कसोटिवर टिकून असलेली आणि सुखात आणि दुःखात .... हो दुःखात सुद्धा साथ आणि हात न सोडलेली मैत्री आहे आमची . त्याच आधारावर तर या चार वर्षात उभे राहू  शकलो आपण.
पण हां योगेन्द्र का बर फोन करणार आहे काही अंदाज येत नाहिये. बघू फोन आल्यावरच कळेल ते.…. 


क्रमशः  

Comments

  1. कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...