Skip to main content

कवडसा 10

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …९……

मी बराच वेळ योगेंद्रच्या मेसेजचाच विचार करत होते. मेसेज वरून योगेन्द्रचा स्वभाव लक्षात येत होता. सरळ, प्रत्येक गोष्ट सुस्पष्ट पणे उलगडून सांगणारा, कोणतीही गोष्ट आडपडदा न ठेवता मांडणारा, आणि त्याच वेळी समोरच्याची काही अडचण असू शकते हे लक्षात घेणारा . खरच माणूस म्हणून तरी हा खूपच सभ्य, सरळ आणि सुस्वभावी वाटतो. बाकी प्रत्यक्ष भेट झालीच तर कळेलही. 
पण एकूण मेसेज वरून निदान एकदा तरी भेटावा अस वाटतंय. एक होत त्याने लिहिलेल्या प्रत्येक वाक्यावरून त्याने खूप विचारपूर्वक मेसेज लिहिलाय किंवा विचारपूर्वक लिहिणं हा त्याच्या स्वभावाचा भागच असावा अस वाटतंय .  एकूणच ह्याचा स्वभाव खुपसा समरच्या स्वभावाशी बर्याच प्रमाणात मिळता जुळता, प्रथम दर्शनी तरी, वाटतोय. अर्थांत हे प्राथमिक मत आहे . 
असो खूप दिवसांनी एखाद्या चांगल्या स्वभावाच्या माणसाशी गाठ पडल्ये. नाहीतर समर गेल्या पासून माणसांचे वाईट अनुभवच जास्त आलेत. त्यात आपण एकट्या आहोत हि गोष्ट माहित असलेल्यांचेच अनुभव ,आणि त्यातही जवळचे वाटणाऱ्या लोकांचे हलकट आणि लोचट वर्तनाचे अनुभव किळसवाणे आहेतच पण घृणास्पद सुद्धा. अगदी समर असताना सभ्य पणे  वावरणारे, अगदी मी मी म्हणणारे, प्रत्यक्ष त्यांच्या नसलेल्या माणूस पणाचे  किंवा पशुत्वाचे पदो पदी दर्शन देत होते. आपण खंबीर होतो आणि दीर जाऊ  होते म्हणून ठीक अन्यथा …………असो.  
आता प्रश्न उरतो योगेन्द्रच्या मेसेजचा. काय कराव कळत  नाहिये. एक काम करुया मृदुललाच फोन करून विचारुया. ती योग्य सल्ला देईल. 
शीतल मृदुलला फोन करते . दोनदा लागत नाही पण तिसर्यांदा . 
शीतल : हलो मृदुल मी शीतल बोलत्ये 
मृदुल : बोल शीतल कशी आहेस , काही प्रोब्लेम कि सहजच केलास फोन. 
शीतल : मी बरी आहे.  तुझ कस चाललय.  जीजू कसे आहेत. आणि शालन , बंटी कसे आहेत. त्यांना मावशी विचारत होती म्हणून सांग. आणि हो या सुट्टीत पण येणार आहेत ना  दोघेही शर्वरी बरोबर खेळायला. हं  ठरव  आणि सांग . बर मी फोन या साठी केला होता कि , अग तू त्या योगेंद्र पुरोहितला ओळखत असशील  ना. आपल्याच कॉलेजात होता तो .  
मृदुल : अ योगेद्र , हो ओळखते तो लाजरा , बुजरा , गोरा तोच ना . मुलींशी अजिबात न बोलणारा . त्याचा काय 
शीतल : (जरा खाकारते ) अह  अह … 
मृदुल : शीतल चालू गिरी नकोय त्याला याच वर्णनाने अख्ख कॉलेज ओळखत. म्हणून म्हणाले . मुकाट्याने पुढे बोल त्याचा काय. 
शीतल : मी तर काहीच बोलले नव्हते . फक्त जर घसा साफ केला इतकच . 
मृदुल : आता बोलत्येस कि फोन ठेवू . 
शीतल : अग अग अग लगेच नाकावरचा राग दाखवायला नकोय काहि. असो. आणि गोरी असल्यामुळे तुमचा राग जरा जास्तच लाल दिसतो . जीजू त्यावरच तर  फिदा झाले असतील . कुणाच काय आणि कुणाच काय . 
मृदुल : कळल  पुढे बोल . 
शीतल : त्याचा मेसेज होता मला, गेट टुगेदर बद्दल २१ ला पुढल्या महिन्यात  आमच्या नाशकात आहे म्हणे . ग्रुप मधून  नंबर मिळाला होता म्हणे.  आणि तू पण ये अस म्हणाला . त्यात गम्मत काय झाली माझा मोबाइल बंद नेमका. 
मृदुल : नेहमी सारखा . (जोरात हसते)
शीतल : असूदे मी काय रिकामी नाहीये इथे . आणि लक्षात नाही राहत चार्जिंग करायच. होत अस कधीतरी . 
मृदुल : तर तर आम्ही तर काय  नोकरच  ठेवलेत फोन चार्ज करायला . 
शीतल : बोलू का 
मृदुल : आत तुझ्या नाकावरचा राग दिसतोय मला इथून . असुदेत योगेंद्र बद्दल बोल . 
शीतल : (पुन्हा जराशी खाकारते) अह अह , असो, तर नेमका त्याचा फोन त्याच दरम्यान आला . तो बंद पाहून त्याने मेसेज मध्ये सुस्पष्ट पणे  सर्व मुद्दे मांडत आमंत्रण केलाय . तुझ काय . 
मृदुल : अग हे फक्त तुमच्या क्लासच आहे . B  Division . अह अह . म्हणून योगेन्द्रबुवानी फक्त आपल्यालाच आमंत्रण केलाय . आम्ही A  Division वाले. 
शीतल : तरी बर त्याला बघायला आमच्याच क्लास मध्ये येउन बसायचीस कित्येकदा . आता मासा नाही गळाला  लागला तर आमची division काय. बर ते राहूदेत.   काय करु ते सांग . वेळ घे घाई नाहीये पण आठवणीने फोन कर.  नाही तर बुवांचा परत फोन किंवा मेसेज यायचा. त्याच्या आत मला ठरवू दे. बर ठेवते नंतर निवांत बोलुया. माझ्या dance क्लास ची वेळ झाल्ये ठेवते. पण उद्या नक्की कर नाहीतर मीच करते. by the way  तुला हवाय का बुवांचा नम्बर. अह अह 
मृदुल : आता ठेवत्येस कि फटके हवेत . उद्या करते फोन विचार करून 

शीतल लगबगीने उठते आवरायला कारण dance class च्या मुली यायची वेळ झाली होती . 

क्रमशः 











Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...