Skip to main content

कवडसा 11

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …११……



क्लास संपवून शीतल कामं  आवरायला निघाली आणि त्याआधी हातात मोबाइल घेऊन चार्जिंगला लावायला. मोबाइल चार्जिंगला लावून टेबलावर ठेवून शीतल वळली आणि खाली पडलेल्या हेयर पिन वर तिचा  पडला. तो चुकवण्यासाठी तिने एक उडी मारली आणि अचानक पाय ट्विस्ट होऊन ती जमिनीवर पडली.  त्यात डावा पायावर सर्व शरीराचा भार पडला आणि एक जीवघेणी कळ तिच्या  मस्तकात गेली.  काही कळायच्या आत,  इतक्या वेगात सर्व घडल कि  सावरण्याची संधीच तिला मिळाली नाही. भानावर येऊन उठण्याचा प्रयत्न करत असताना,  तिला जाणवल की डावा   पाय  प्रचंड वेदना देतोय आणि  आपण उठूच   शकत  नाही. 

पण प्रसंगावधान राखत, तिने मोठ्या कष्टाने, जमिनीवरुन  सरकत सरकत,  टेबला पर्यन्त जाऊन चार्जरची  वायर खेचून मोबाइल खाली ओढला.  त्या प्रयत्नात  मोबाईल  पडला आणि बैटरी उडाली,  खाली पडली .  पुन्हा कष्टाने सरकत सरकत शीतलने बैटरी उचलून मोबाइल मध्ये घातली. मोबाइल चालू  करून शेजारच्या काकुना फ़ोन केला आणि त्याना बोलावून घेतले. पुन्हा  तसच सरकत सरकत जाऊन, तिने दाराची कड़ी मोठ्या कष्टाने काढली . काकू आत आल्या,  त्यानी  लगेचच परिस्थितीच  गांभीर्य ओळखून,   ताबडतोब शेजारची दोन तीन माणस बोलावली आणि शीतलला लगोलग हॉस्पिटल मध्ये दाखल केल. डॉक्टर एक्सरे च्या तयारीला लागले आणि प्रथमोपचार सुरु केले. एक तासाभरानंतर एक्सरेचा रिपोर्ट येणार होता, तेवढ्या वेळात काकूनी  शीतलच्या आई वडील आणि भावाला फ़ोन करून कळवल.  
आई,  भाऊ लगेच आले 
आई :  काकू अहो काय झाल 
काकु :  अहो सकाळी सकाळीच शीतलचा फोन आला तेंव्हाच मी  म्हटल की घरातून फोन कलांय  म्हणजे नक्की काही प्रॉब्लम आहे.  होते तशीच धावत गेले पाहाते तर काय शीतल आत पडलेली.  ते सुद्धा तिने सरकत यऊन दार उघडले म्हणून.   जर दाराची वरची कड़ी लावालेली असती तर कठीण झाल असत. बर बाकी काहीच बोललो नाही.  तड़क तिला घेऊन इकडे आले  आणि तुम्हाला कळवल . बर मी तशीच आले आहे घर टाकून तुम्ही आहात तर मी जाते  आता . नंतर येते मी.
आशाताई (शीतलची आई): अहो तुम्ही होतात म्हणून वेळेत आली शीतल इथे. खर तर तुमचे आभार कसे मानू (हुंदका देत ) कळत नाहिये.
काकू : अहो तुम्ही आभार काय मानताय,  लाजवताय मला.  शेजारी आहोत.  आम्ही नाही येणार तर कोण येणार. तुम्ही आत जा मी येते नंतर.  
आशाताई : ठीक आहे या आता,  अवि (शीतलचा भाऊ) सोडेल तुम्हाला.  
काकू : अहो नको अविची गरज इथे आहे मी जाते रिक्षाने . 
आशाताई आत जातात आणि काकू घरी जातात 
क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...