Skip to main content

।। नामस्मरण ।। २

।। नामस्मरण ।।


सकाळी सुखाच्या स्वरूपातील नामस्मरण या वर आपण विचार केला. आता दुःख उपभोगत असताना नामाच महत्व विशद करतो
दुःख हे सुखापेक्षा खोलवर परिणाम करणारे, जास्त हानी पोहोचविणारे,  पण सर्वात जास्त अन्तर्मुख व्हावयास लावणारे असते,  हा माझाच नाही तर आपल्या पैकी प्रत्येकाचा  अनुभव असणार, नव्हे आहेच. याच कारण सर्वश्रुत आहे की अश्या प्रसंगातच स्वकीय आणि इतर  यातील सीमा स्पष्ट होतात किंवा  तश्या
त्या व्हाव्यात असा आपल्याच कर्मांचा नियतिरूपि संकेत असतो .   फक्त तो उमगणे जरूर असते अन्यथा विचार निराशावादी होऊन भरकटण्याची शक्यता अधिक असते आणि पुन्हा वाटचाल त्याच कर्मगतीकडे म्हणजेच पुन्हा चुकाच  आणि जन्मोजन्मीचा फेरा, तोही   न चुकणारा .
आता इतके उमगल्यावर अश्या दु:खप्रसंगात मनाचा समतोल राखूंन नियति संकेतांचा योग्य अर्थ लागून इच्छित मार्गी म्हणजेच कर्मगतीच्या पलीकडे जाण्याचा उत्तम सोप्पा सुटसुतीत मार्ग म्हणजेच नामस्मरण याचे अश्या प्रसंगातील अधोरेखित करता येण्या सारखे फायदे 

१ मनाचा समतोल राखणे
२ दु:खप्रसंगातून उभारी
३ चित्ताचि स्थिरता
४ आपपर भावातून सुटका
५ कर्मगतीची प्रचिती
६ निराशावादातून मुक्ती 
७ सर्वाभूति एकत्व

नामस्मरणाने वरील  प्रसंगातून माणूस तावून सुलाखून तर निघतोच पण अश्या प्रसंगाशी धैर्याने सामना करण्याचे मानसिक आणि आत्मिक बळ प्राप्त होते. या व अश्या अनेक बाबींमधुन नामस्मरण व त्याचे महत्व अधोरेखित करता येईल जेणे करून कर्मगतीतून मुक्ततेकडे थोड़े पुढे जाता येऊ शकेल.
आता पुढील विषय कर्मगती  म्हणजे नक्की काय त्याचे स्वरुप आणि महत्व, परिणाम , उपाय इत्यादी पुढील भागात.

शब्द : ब्रम्हाचैतन्य
लेखनिक :प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...