Skip to main content

कवडसा 12

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …१२……






काकू गेल्या आणि आशाताई लगेच आत गेल्या. आत शीतल असह्य 
वेदनेने व्याकुळ होऊन रडत होती.  आशाताईनी तिचा हात हातात घेतला 
केस सारखे केले आणि शीतलला बांध  आवरता आला नाही


आशाताई : अग शीतल थोड़ सहन कर अस काय लहान मुलासारख 
करतेस. मला माहिती आहे की खुप दुखतय पण एक्सरे येइपर्यंत 

थांबावाच लागेल थोड़ धीरान घे बेटा.  (खरतर आशाताईना सुद्धा,

शीतलकडे बघुन, आपल्याला रडू येईल अस वाटत होत,  पण मोठ्या 

धीरान त्यांनी ते सावरलं  होत)


तेवढ्यात एक्सरे रिपोर्ट घेऊन अवि आणि डॉक्टर साठे दोघेही आले .


डॉक्टर: (रिपोर्ट पहात) दोन ठिकाणी फ्रैक्चर आहे. प्लास्टर शिवायपर्याय 
नाही.  कमीत कमीत सहा आठवडे कंपल्सरी बेड . मी तयारी करतो बर 
सकाळपासून काही खाल्लय का काही


शीतल: (प्रचंड वेदनेतच बोलते) नाही फ़क्त चहा घेतलाय ६ वाजता


डॉक्टर : ठीक आहे आता १० वाजलेत आपण साधारण १.३० वाजता OT 
मध्ये नेऊ. सध्या तिला , तोपर्यंत एक पेन किलर  इंजेक्शन देतो 

तरी थोड़ सहन करावच लागेल I hope you are a brave young 

woman.  ok. मी निघतो बरोबर १. ३० ला येतो.  नर्स तो पर्यन्त याना 

OT मध्ये शिफ्ट करा आणि operation  ची तयारी करून ठेवा .  येतो 

मी आशाताई

आशाताई : बर ठीक आहे.  मी आहेच तोपर्यंत इथे. 

डॉक्टर  साधारण २ पर्यंत येतात,  शीतलला OT  मध्ये नेतात आणि 

अर्ध्या पाऊण  तासाने शीतलला बाहेर आणतात. शीतल शांत पणे 

पडलेली असते, अनास्थेशिया मुळे. तिच्या त्या शांत चेहर्या कडे 

आशाताई कितीवेळ पाहात  असतात आणि डोळ्यातून अश्रूंची बरसात 

आणि बाहेर पहिल्या पावसाची ……


क्रमशः 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...