Skip to main content

कवडसा 7

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …6……

कॉलेज चे दिवस संपले कधी, समरन आपल्याला पाहिल कधी , मी आवडले काय  आणि मागणी घालून त्याने माझ्याशी लग्न ठरवल हे इतक्या लगेच घडल की विचार करायला काही उसन्त सुद्धा  मिळाली नाही. अक्षरशः एखाद्या सिनेमातील कथे प्रमाणे भासतय अजूनही .लग्ना नंतरचे ते ऊटी - कोडाई चे दिवस, अजुन सुद्धा विसरु शकले नाहिये .   अर्थात ते दिवस विसरण्या सारखे नव्हतेही.  कोणीच विसरु शकत नसेल आयुष्यभर . त्यानंतर कित्येक वेळेला फिरायला जाऊन देखील हनीमूनचे दिवस कधीच विसरणार नाही मी . 
"संसार मांडते मी, संसार मांडते " आशा ताईचा आवाज आणि आपल सर्वात आवडत गाण त्यावेळच् .....हो  .. आता त्यावेळच असंच .......... (आलेला हुंदका अथक प्रयत्नाने परतवतत आणि मुठ लोखंडी कठड्यावर घट्ट दाबत आणि  हुंदका पुन्हा पुन्हा परतवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत  ) ……  म्हणाव ..... लागेल ....किती उत्साहाने आपण संसाराची घडी या गाण्यातल्या प्रमाणे बसवली होती, (एक दीर्घ श्वास आणि एक उसासा टाकत ) आपले मोकळे केस बांधत शीतल अचानक वास्तवात येत आणि निळ्या पण शांत अश्या आकाशाकडे एक टक पाहात स्वताःशीच्  बोलली ,समर काय झाल रे हे, कुठे गलास तू अचानक, सर्व सोडून, टाकून, विसकटुन, गेलास ,  आलास वेड लावलस, माझ सर्वस्व घेतलस, माझ सर्वस्व झालास, तुझ्या सोबत एकएक वीट रचल्ये , या संसाराची, आपल्या या वेलीला फूल आल एक छानस, मला आधार दिलास, माझा अधार झालास, समुद्र किनार्यावर वाळूचा बंगला बनवावा आणि अचानक एखादी लाट  येऊन तो पार उध्वस्त व्हावा  तस होऊन बसलय.  जाऊदे आता रडून तरी काय होणार आहे जो गेलाय……….  ,  त्याच्या फ़क्त आणि फक्त आठवणी शिल्लक आणि त्यावर जगण. त्या  आठवणींचा हात धरून पुढे पुढे जाण , एवढच  आता आपल्या हातात उरलय. त्या आठवणींचा गोफ रोज सोडवायचा आणि रोज पुन्हा बांधून ठेवायचा   …… 
शीतल अशीच बराच वेळ  शून्यात नजर  लावून एकटक  पाहात उभी होती त्या निळ्याभोर आभाळाकडे . 

क्रमशः 

Comments

  1. कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...