Skip to main content

कवडसा 6

कवडसा 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
कहाणी एका संघर्षाची सुरु …5……
समर विश्वास लहानपणापासून शांत, मृदु भाषी, हुशार असल्यामुळे विचारांची प्रचंड खोली असलेला, खेळापेक्षा अभ्यास, वाचन, मनन, या गोष्टींमध्येच रमलेला, सतत कसल्यातरि चिंतनात स्वतःला गढून् घेणारा, बालिशपणा, पोरकटपणा , उतश्रृंखल वागण, या पासून स्वतःला कायम दूर ठेवणारा, फार कमी पण मार्मिक बोलणारा ,असा होता.
समुद्राच  पाणी वरुन जीतक शांत दिसत शांत दिसत त्याच्या कित्येक पट मंथन हे त्या पाण्या खाली चाललेल असत, या न्यायाने प्रत्येक निर्णय सखोल विचार करुनच घेणारा .  मुद्द्यांचीच् नव्हे तर गुद्द्यांची सुद्धा लढाई मुद्द्यांनी  सोडवता येते या विचारांवर पूर्ण श्रद्धा असलेला.
बेताचीच परिस्थिति असलेल्या घरातून स्वकर्तुत्वावर सर्व उभ करण्याची उमेद असलेला,  पूर्ण होकारात्मक विचारसरणीचा , अतिशय खडतर परिस्थितीत देखील कधीही निराश न होणारा , शेवटच्या श्वासापर्यंत जगण्यातील जिद्द न सोडणारा. त्याच्या वागणया बोलण्या तील समतोलपणा नजरेतील साधेपणा,  स्वभावातील सच्चाई, जी वर्तनात सुद्धा  पावलो पावली जाणवायाची.
त्यामुळे त्याच मित्रमंडळ तस कमीच. निर्व्यसनि असल्यामुळे अश्या व्यक्तिना मतलबी मित्र मंडळी कमीच असतात, आणि  जी असतात ती जीवाभावाचीच असतात . आपमतलबि लोक सहसा यांच्यावाटेला जात नाहीत .

क्रमशः

Comments

  1. कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...