Skip to main content

भोग आणि ईश्वर २६७

भोग आणि ईश्वर  २६७

काल मनाच्या ऊर्जा, शक्ती याबद्दल आपण बोलत होतो. मुळात मनाकडे ही अफाट आणि अचाट ताकद आली कुठून, हा विचार केला तर लक्षात येईल की, याची निर्मिती वा याचा स्रोत हा प्रत्यक्ष ईश्वराने स्वतः असल्याचं सांगितलं आणि पंचमहाभूता तील अवकाश तत्वाने मनाची जडणघडण केली. इंद्रियांमध्ये मी मन आणि देहातील आत्मा मीच असं सोप्प समीकरण, विधात्याने स्वतः सांगितलं आहे. 

मन मीच आत्मा मीच, तरीही देह आणि बुद्धी यांच्या व्यापामुळे कर्मबंधनांचा भागीदार होऊन, देहातून देहात प्रवास करत बसतो तो आत्मा आणि मन. म्हणजे आधी परमात्म्यापासून विलग होऊन, देहात प्रवेशणं. नन्तर मनाच्या आधारे बुद्धी व देह विचारात वाहावत जाऊन, मायेच्या व काम क्रोधादी असुरांच्या नादी लागणं. चुकीच्या किंवा जरूर नसलेल्या कर्माचे भागीदार होतात. हाच ईश्वरी संकल्पाचा खेळ. मीच खेळ मांडला त्यात मीच खेळाडू आणि मीच पंच. अद्भुत अतर्क्य, उद्या हे विस्ताराने पाहू. 

नंतर विधात्याने निर्माण केलेल्या कर्माच्या साखळीत गुंतून, जन्मोजन्मी षड्रिपुंचे दास होतात. त्या आधारे केलेल्या कर्माचं दान पदरी पडताच, भीतीने, आश्चर्याने, अविवेकाने ते नाकारून, किंवा दुःख करून, परिणाम अजून नकारात्मक करून, आपल्या सह विधात्याचं कार्यसुद्धा कठीण करत जाणं. हाच खेळ खेळत खेळत प्रत्येक जन्म काढायचा. 

पण मन आणि आत्मा यांना षड्रिपु मुक्त करून, मायेचे पाश झुगारून, कर्मबंधनाच्या पलीकडे जाण्याचा विचार सुद्धा न करणं, हे खरतर ईश्वराला अतर्क्य आहे. म्हणजे ईश्वरालासुदधा हे समजायला कठीण आहे की, मन इतकं सशक्त, बलवान आणि व्यापक व खोलवर दिलेलं असताना आणि कर्माच्या चिखलात रुतून बसलेले असताना त्यातून बाहेर न पडण्याचा प्रयत्न सुद्धा न करणं. 

तरीही बुद्धीची झेप आणि मनाचं अवकाश याच ज्ञान नसलेल्या मानवाला त्या ज्ञानाप्रत नेण्यासाठी, त्याची त्याला जाण येण्या साठी अनेक उपाय विधाता आपणहून करतो. घडलेल्या गोष्टीचं फलित भोगत असताना, घडणारी गोष्ट वा कर्म आपल्या हातात असताना, माणूस मागील बाकीवर वा फलीतावर, पुढील गोष्ट ठरवतो. म्हणजे तिथेही तो फक्त नफा तोटा यावर आधारित गणितं ठरवतो. 

कसं आणि काय याचा उद्या विचार करूया. पण या गणितातून बाहेर पडण्याचा कानमंत्र म्हणजे नाम ते घेत रहा. 

भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख आहेत. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.  श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...