चैतन्याचा रथ चालला
भक्त हृदयी नामातून
वत्सल तो ईश्वरही
वसतो भक्त हृदयातून
वाहतो हा निर्मळ वारा
सुघट घटी बैसले आत्मन
वास करे या हृदयी तेज
वाट पाहे भेटण्या माय मज
उगवतीस सूर्यबिंब ते
पातले जणू हरी प्रतिनिधी
समोर उभा परमात्मा हा
अनेक रूपे साक्षीत्वाची
जात जात जीवन पथावर
ओठ हलती नाम घेताना
साजिरे ते रूप नयनात
दिसे मज मुखी वदताना
इतुके जे दिसले जाणिवेला
तरी मन मागे हरीची खुण
जाणिवेला जाग आली अन
मन अनुभवते शांतपण
कैवल्याची जाणा ही साक्ष
वसतो भक्त हृदयातून
©® कवी : प्रसन्न आठवले
१८/०८/२०२१
०८:४७
Comments
Post a Comment