भोग आणि ईश्वर ३४५ ब्रह्मांड रचना करताना रचनाकार ब्रम्हा आणि ज्यांच्या संकल्पने तून हा सर्व खेळ सुरू झाला ते श्रीमहाविष्णू यांनी इतक्या अचूक शास्त्रीय आधारावर, सृष्टी, जीवसृष्टी निर्जीव पण तरीही नियमबद्ध रचना केली आणि हा जीवाचा खेळ सुरू करण्या साठी आदित्य, वसू, लोकपाल, विधाता इत्यादी व्यवस्थापक नेमून, त्यांना निश्चित कार्य, त्या कार्याचं दायित्व, त्यांच्या कार्या वर सृष्टीची नियमितता, मिती, त्रिमिती, परिमिती, बहुमिती या आलेखांची व परिणामाची निर्मिती केली. त्या त्या व्यवस्थापकांच्या कार्यावर, त्यांचा स्वतःचाच वचक राहील हे देखील पाहिलं. ही सर्व लोकपालांसह व्यवस्था इतकी चोख की, अनेक युगं, महायुगांचा काळ होऊनही एक सुतभर सुद्धा चूक आजच्या घडीपर्यंत घडलेली नाही आणि पुढेसुद्धा असंभव आहे. जे घडलं, जे घडतंय व जे घडणार त्या प्रत्येकाला कारण व गती यांचे नियम आहेत व असणार. जग, जगातील सुक्ष्मातील सूक्ष्म जीवसुद्धा कारणाशिवाय पुढे सरकत नाही वा सरकू शकत नाही. कारण व कार्य कारणभाव यांच्यासाठी कर्मफलाची व्यवस्था, कर्माच्या गतीसाठी, माया भाव अशी मनाला आकृष्ट करणारी व्यवस्था क...