Skip to main content

Posts

कवडसा ३२

कवडसा ३२  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,  तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …   ३२ योगेंद्रला भेटून डॉ आशाताईना भेटायला शीतलच्या रूम मधे येतात डॉ : बोला शीतल बाई शीतल : (हसुन आणि लाजून ) काय हो डॉ डॉ: बर शीतल मैडम बस दोघेही आणि आशाताई तिघेहि मनसोक्त हसतात डॉ : कस वाटतंय आता . इथे येऊन बर वाटल ना. शीतल : (प्रश्नाचा रोख लक्षात येऊन ) हो खुप बर वाटल डॉ: मलाही अस म्हणून खुप जोरात हसतात , शीतल पण मनमुराद हसते. डॉ: आशाताई चला आपण आफिस मधे जाऊ बाकी सर्व सूचनां पण देतो आणि सर्व औषध , पथ्य पण सांगतो. आशाताई : शीतल चल मी जाऊन येते . तू उगाचच विचार करत बसु नकोस. ओके. शीतल : हो बाय ये लवकर डॉ : शीतल बेटा बाय आणि गुड़ लक एंड टेक केअर शीतल : थंक्स आणि बाय डॉ आणि आशाताई जातात. इकडे शीतल उदास बसलेली असते आणि अचानक तिचा मोबाइल वाजतो. बघते तर योगेन्द्रचा फ़ोन, ती लगबगिने फोन उचलते शीतल : हैल्लो योगेंद्र : हाय मैडम कश्या आहात शीतल: (मनात हसते पण) आता काय खुश असशील तू योगेंद्र :  का ग शी...

असाच आहेस तू

असाच आहेस तू  असाच आहेस तू खट्याळ पावसा सारखा  कधी बरसतोस तूफान होऊन कधी निःशब्द  आधी असतोस आसमान कोसळणार,  क्षणात असतोस शांत आणि स्तब्ध   कधी असतोस तो क्षितिज विस्तीर्ण विलोभनीय  कवेत सुद्धा न सामावणारा म्हणूनच भावणारा  कधी होतोस कोशात गुरफुटलेला रेशमी कीटक  सूक्ष्म , अनिमिष , अनामिक मुठीत मावणारा  कधी असतोस तो अफाट , सागरीकिनारा   थांग सुद्धा न लागणारा, लागू न देणारा  कधी होतोस तू प्रवाह हातात मावणारा  तू झ्या मनाच्या कक्षा क्षणात अरुंदावणारा  कधी असतोस तो विराट , रौद्र रूप वारा  सोसाट्याचा , सर्व कवेत घेऊ शकणारा  कधी होतोस तू पावलांनाही थारा न देणारा  मनाच्या कोपऱ्यात हरवून गेलेला, जाणारा  किती अकल्पित तुझं रूप प्रत्येक क्षणी  प्रत्येक रूपात  तू झ्या फक्त मलाच कळणारा  मला जवळ असलेल्या मना जवळ असलेला  तुझ्या हृदयात फक्त मलाच सामावणारा  फक्त मलाच सामावणारा, समजणारा  कवी: प्रसन्न आठवले  २४/०४/२०१७ १८....

गुंतणे

गुंतणे  गुंता तूझ्या बटांचा मन सोडवत आहे  अजुनी  तू झेच पाहणे मज ओढवीत आहे  का गुंतलो  तू झ्यात , कि खेळ हा जुनाच  सूटतात का कधीही कोडी अशी मनात  तरीहि पून्हा पून्हा मी मन गुंतवीत आहे  अजूनी  तू झेच .....  त्या रात्र चांदण्याला आहे रुपेरी धार  तू भेटसी न मज,म्हणुनी नावेस  किनार  त्या सागरात तरीही मन बोलवीत  आहे  अजूनी  तू झेच ......  विसरू म्हणून कोणी विसरेल का कधीही  ते प्रेम राधिकेचे  कृष्णास साद घाली  त्या राधिके परी हे मन  तू जसमीप आहे  अजूनी  तू झेच ........  निशिगंध धुंद झाला पाहून कैफ तुझा ग  ती बात हि नाशिली डोळ्यात या तुझ्या ग भिजणे नी  डुंबणे हे झुरणे नशेत आहे  अजुनी तुझेच .......  हि इश्क जादूगिरी हरणे पुन्हा पुन्हाचे  धोका इथे घडीचा हे खेळ नशिबाचे  या खेळण्यात मी ग प्याद्या परीच आहे.  कवी : प्रसन्न आठवले  २४/०४/२०१७ १५.३० ...

तेरे दिदार का मौसम

तेरे दिदार का मौसम हर पल है ये दिल गुलज़ार का मौसम पल पल है तेरे दिदार ....... बनके नगीना बस जाये अंगूठीमे सावन घटासे आ जाये बारिशमें भिगाना प्यार में है तुझे पल पल तेरे दिदार ..... मन क...

श्री स्वामी समर्थ

जातकीय सूत्राला स्मरूनि बोलती स्वामी समर्थ कलियुगातील एक सूत्र जप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जन्म म्रत्यु हे कर्माधिष्टित ठेव तू ही ख...

विरहात संपली रात्र

विरहात संपली रात्र विरहात संपली रात्र, अन दिवस सुना तो गेला  त्या विरही वळणावरती  का जीव असा   गुंतला  विरहात संपली .......  या वेळी सागर लाटा किती गूढ करती आवाज रात्रीत किनार्यावरती विचार थबकती आर्त  त्यावेळी सागरतीरी  हा जीव उगाच अडकला  विरहात  संपली .......  विरहात दुःख हे पदरी विरहातच आहे जळणे  अन शेवट हाता मध्ये तो केवळ अग्नी उरणे  त्या ज्वाला तरीही सहणे हा केवळ रस्ता उरला  विरहात संपली ........  नभ केवळ देती आस पाऊस येई कधी तरीही  श्वासास लागले भास उरले नच हाती तरीही  पाहणे वाट अन वाट बाकी न उपायच  उरला  विरहात संपली ....  कवी: प्रसन्न आठवले  १७/०४/२०१७ १२.२९

ती ओढ अनावर झाली - 6

ती ओढ अनावर झाली  ती ओढ अनावर झाली  हि  आशा अलगद आली  तूज भवती जीवन माझे  सारे ती मिसळून गेली  ती नजर तूझी रे धुंद  करीतसे मला बेधुंद  तू भाव अनामिक माझे  तूजसमिप ओढून नेसी  ती ओढ .....  हि मनात आली लाट   नकळे तूज आपोआप  कि  कळूनी  सारे सखया  मज याद न का रे करसी  ती ओढ .....  या मनात प्रतिमा ती रे  खिळवून मला ठेवी रे  अन नजर तूझ्या प्रतिमेला  या मनी साठवून ठेवी  ती ओढ ....  तू क्षितिजाचीच दिशा रे  असशी तू दूर सदा रे  मी पाठी तुझ्या सखया  रे  हा प्रश्न मनास विचारी   ती ओढ ....  कवी: प्रसन्न आठवले