Skip to main content

कवडसा ३२


कवडसा ३२ 
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,
 तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा) 
 कहाणी एका संघर्षाची सुरु … ३२

योगेंद्रला भेटून डॉ आशाताईना भेटायला शीतलच्या रूम मधे येतात
डॉ : बोला शीतल बाई
शीतल : (हसुन आणि लाजून ) काय हो डॉ
डॉ: बर शीतल मैडम बस
दोघेही आणि आशाताई तिघेहि मनसोक्त हसतात
डॉ : कस वाटतंय आता . इथे येऊन बर वाटल ना.
शीतल : (प्रश्नाचा रोख लक्षात येऊन ) हो खुप बर वाटल
डॉ: मलाही
अस म्हणून खुप जोरात हसतात , शीतल पण मनमुराद हसते.
डॉ: आशाताई चला आपण आफिस मधे जाऊ बाकी सर्व सूचनां पण देतो आणि सर्व औषध , पथ्य पण सांगतो.
आशाताई : शीतल चल मी जाऊन येते . तू उगाचच विचार करत बसु नकोस. ओके.
शीतल : हो बाय ये लवकर
डॉ : शीतल बेटा बाय आणि गुड़ लक एंड टेक केअर
शीतल : थंक्स आणि बाय
डॉ आणि आशाताई जातात. इकडे शीतल उदास बसलेली असते आणि अचानक तिचा मोबाइल वाजतो. बघते तर
योगेन्द्रचा फ़ोन, ती लगबगिने फोन उचलते
शीतल : हैल्लो
योगेंद्र : हाय मैडम कश्या आहात
शीतल: (मनात हसते पण) आता काय खुश असशील तू
योगेंद्र :  का ग
शीतल : आता काय सुटका होणार इथून .
योगेंद्र : तू सुद्धा असशील ना
शीतल : प्रश्नाला प्रतिप्रश्न हे उत्तर असु शकत नाही महाशय
योगेंद्र : बर महोदया खर सांगू की नाटकि
शीतल : बघ ते तू ठरव मी काही सांगत नाही फक्त
योगेंद्र : फक्त काय
शीतल : काही नाही असच
योगेंद्र : आता सांग डोक्यात कीड़ा टाकून जाउदे नको
शीतल : काही नाही फक्त खर बोललास तर बर वाटेल तुझ्याच मनाला
योगेंद्र : ( फक्त हसतो) बर ते बघू पण as you wish , खर सांगतो.
शीतल : ओह म्हणजे साहेबांची इच्छा नाहीये तर. मग राहुदे.
योगेंद्र : बापरे बर खर सांगतो आणि मला पण आवडत ते ओके
शीतल : बापरे का म्हणालास .
योगेंद्र: इतका राग पटकन नाक लाल झाल असेल नक्की
शीतल : बर तू सांगतोस ना
अस म्हणून दोघे हसतात
योगेंद्र : खर तर खुप confusedमनस्थिति आहे माझी.
तुला बोलवायला आलो काय आणि एक्सीडेंट झाला काय तुझी भेट अश्याप्रकारे झाली काय अतर्क्य आहे. योगायोग या गोष्टिवर माझा तसा विश्वास कमीच आहे . पण हे amazing आहे. हाच विचार करतोय
शीतल ': वा अजुन एक आश्चर्य मीही तोच विचार करत होते.
योगेंद्र : वा अजुन एक योगायोग
शीतल : मग आता कधी भेट
योगेंद्र : बघू नशिबात कधी लिहिल्ये त्याप्रमाणे
शीतल : हो पण फोन केलास तर घेईन आणि बोलीन की भेट होईल तेंव्हा होउदे ( शीतल जरा फणकाऱ्यानेच बोलते)
योगेंद्र : सॉरी बाबा ते लक्षात नाही आल आणि
शीतल : तू घेशील की नाही फोन अस ...
योगेंद्र : सॉरी पण तसच काहीस
शीतल : तस असत तर बोलले असते का सांग
योगेंद्र : अरे सॉरी म्हणालो मी प्लीज गुस्सा इतना ......
शीतल : योगेंद्र (अस म्हणून हसते ती आणि लटक्या रागाने)
ए गप काही काय .
योगेंद्र : वा हसलिस लगेच बर वाटल .
शीतल : आता तू पण पटकन बरा हो आणि घरी ये एकदा खुप निवांत गप्पा मारू
योगेंद्र : हो तरी दोन एक महीने जातील .
शीतल : दोन बापरे
योगेंद्र : अग दोन महीने असे सहज जातील आणि फोन करिन की मी मधे मधे पण तू कधी फ्री असशील माहित नाही
शीतल : मी अस करिन तुला msg करिन फ्री असले की चालेल ना
योगेंद्र : thats much better
शीतल : चल मग आई यायची वेळ झाली ठेवू का फोन
योगेंद्र : हो ठेव ,  but gud लक आणि टेक केअर , काहीही लागल तर सांग
शीतल : नक्की and you too be careful आणि बेस्ट लक to यु too बाय सी यु
योगेन्द्र :  बाय सी यु
दोघेही फोन ठेवतात आणि बराच वेळ हातातल्या फोन कड़े बघत असतात

क्रमशः

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...