Skip to main content

विरहात संपली रात्र


विरहात संपली रात्र


विरहात संपली रात्र, अन दिवस सुना तो गेला 
त्या विरही वळणावरती  का जीव असा   गुंतला 
विरहात संपली ....... 

या वेळी सागर लाटा किती गूढ करती आवाज
रात्रीत किनार्यावरती विचार थबकती आर्त 
त्यावेळी सागरतीरी  हा जीव उगाच अडकला 
विरहात  संपली ....... 

विरहात दुःख हे पदरी विरहातच आहे जळणे 
अन शेवट हाता मध्ये तो केवळ अग्नी उरणे 
त्या ज्वाला तरीही सहणे हा केवळ रस्ता उरला 
विरहात संपली ........ 

नभ केवळ देती आस पाऊस येई कधी तरीही 
श्वासास लागले भास उरले नच हाती तरीही 
पाहणे वाट अन वाट बाकी न उपायच  उरला 
विरहात संपली .... 
कवी: प्रसन्न आठवले 
१७/०४/२०१७
१२.२९



Comments