Skip to main content

गुंतणे


गुंतणे 

गुंता तूझ्या बटांचा मन सोडवत आहे 
अजुनी तूझेच पाहणे मज ओढवीत आहे 

का गुंतलो तूझ्यात , कि खेळ हा जुनाच 
सूटतात का कधीही कोडी अशी मनात 
तरीहि पून्हा पून्हा मी मन गुंतवीत आहे 
अजूनी तूझेच ..... 

त्या रात्र चांदण्याला आहे रुपेरी धार 
तू भेटसी न मज,म्हणुनी नावेस  किनार 
त्या सागरात तरीही मन बोलवीत  आहे 
अजूनी तूझेच ...... 

विसरू म्हणून कोणी विसरेल का कधीही 
ते प्रेम राधिकेचे  कृष्णास साद घाली 
त्या राधिके परी हे मन तूजसमीप आहे 
अजूनी तूझेच ........ 

निशिगंध धुंद झाला पाहून कैफ तुझा ग 
ती बात हि नाशिली डोळ्यात या तुझ्या ग
भिजणे नी  डुंबणे हे झुरणे नशेत आहे 
अजुनी तुझेच ....... 

हि इश्क जादूगिरी हरणे पुन्हा पुन्हाचे 
धोका इथे घडीचा हे खेळ नशिबाचे 
या खेळण्यात मी ग प्याद्या परीच आहे. 

कवी : प्रसन्न आठवले 
२४/०४/२०१७
१५.३०





    

Comments