Skip to main content

अध्यात्म विराम १७९

अध्यात्म विराम १७९
 
कालच्या भागावर थोडं बोलून मग पुढे जाऊ. काही काही धर्म सध्या आपला प्रसार करण्यासाठी या एका नीतीचा अवलंब करून आकर्षित करतात. पण हा पळपुटा मार्ग आहे. उलट अश्या कोणत्याही धर्मात जाऊन आपला उद्धार झाला असता तर, त्या धर्मातील नव्वद टक्के लोकांना खोटे धंदे करुन, गैरमार्ग वापरून आपला चरितार्थ चालवत बसावं लागलं नसतं. 

हे विश्वातील कोणत्याही देशातील त्यांच्या प्रजेकडे पाहिलं की लक्षात येईल.  त्यामुळे अश्या कोणत्याही भूलथापा मारणाऱ्या धर्मातील कोणत्याही व्यक्तीच्या बातांना, बळी पडत असला तर त्याला बळी पडू नका आणि पडू देऊ नका. 

कारण कोणताही ईश्वर वा सदगुरू किंवा त्यांचे प्रेषित वा पुत्र हे तुमचा भोग टाळू शकणार नाहीत. त्यामुळे या भ्रमात राहण्याची चूक करू नका. ते पैसा वा जबरदस्ती या जोरावर काही काळासाठी जगाला भ्रमित करू शकतील. पण अंतिम सत्यापासून, तुम्हाला फार लांब नेऊ शकणार नाहीत. ते अंतिम सत्य म्हणजे कर्म भोग श्रद्धा व निष्ठा आणि अंती मोक्ष. त्यांच्या मार्गाने मिळते ती तात्पुरती सुटका. म्हणजेच तात्पुरता भ्रम. यावर उपाय तुमची ईश्वराप्रप्ती साधना, नाम इत्यादी निष्ठेने, श्रद्धेने व विश्वासाने करा. 

कारण कोणताही अन्य धर्मीय, तुम्हाला फारतर पैसा देऊ शकेल, तोसुद्धा काही काळासाठी. कारण त्यासाठी त्यांना अनुदान, सहाय्य, मदत मिळते. त्यातीलच भाग वाटून, ते धर्मप्रचार करतात. पण एकदा तुम्हाला तुमच्या धर्मापासून, धर्म बांधवांपासून तोडण्यात आलं की, त्यांच्या या मदतीचा ओघ पूर्ण बंद होतो. कारण आता तुमच्या परतीचे मार्ग बंद करण्यात आलेले असतात. 

यावर इथपर्यंत इतका खल विचार करण्याचं कारण म्हणजे ज्यावेळी अश्या भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी किंवा विचार समोर येतील, त्यावेळी सावध असणं आणि असा कोणताही चमत्कार करण्याचा अधिकार पृथ्वीच्या पाठीवर फक्त आणि फक्त इश्वरापाशी आहे आणि त्यांच्या इच्छेने सिद्धी प्राप्त सद्गुरू यांच्याशी आहे. 

सद्गुरू किंवा ईश्वर जबरदस्तीने, फसवून वा बळजबरी धाक, मृत्यूचे भय व अन्य कोणत्याही मार्गाने आणण्यात आलेल्या कोणत्याही अनुयायाला, आपला शिष्य व धर्म बांधव मानणार नाहीत आणि मानलं तर ते खरे ईश्वरी दुत वा प्रतिनिधी नाहीत, याबद्दल खात्री बाळगा. 

अजून एक गोष्ट इथे ईश्वर साक्षीने सांगतो की, अश्या प्रत्येक खोट्या आणि अपप्रचारी तत्वांना शेवट आहेच. असे अनेक हल्ले परतवून, पुन्हा दृढतेने उभा राहिलेला असा आपला सनातन धर्म आहे.  त्यावर पूर्ण श्रद्धा व निष्ठा, अभय राहून ठेवा. हा देखील एक घातकाल आहे. पण त्याला शेवट सुद्धा आहे. 

आपणच आपल्या ईश्र्वरावर श्रद्धा, निष्ठा व विश्वास ठेवल्यास तीच श्रद्धा, निष्ठा व तोच विश्वास आपलं कार्य योग्य वेळी करणार म्हणजे करणारच. सद्य स्थितीची जाणीव व्हावी आणि ती होताना भय न वाटता, आपल्या धर्मावर दृढ विश्वास व श्रद्धा टिकून, वाढून, ती निष्ठा कायम असावी, म्हणून हा लेखनप्रपंच केला. आता विषयाकडे येऊ. 

सद्गुरू तत्वांची महती सांगताना आपण ओघात आलेल्या या विषयाचं चिंतन केलं. आता पुन्हा विषयात येऊ. मुळात सद्गुरू हे ईश्वरी अंश असल्यामुळे, त्यांना जगत कल्याण व जगत उद्धार यासाठी आवश्यक सिद्धी व शक्ती प्राप्त असतात. किंवा त्या ईश्वराच्या प्रेरणेनेच साध्य झालेल्या असतात. 

सद्गुरू कार्य हे शब्द सामर्थ्याच्या पलीकडे आहे. अनेक जन्मांची पुण्याई एकत्र आल्यानंतर अश्या असीम कृपेची प्राप्ती होते. ती नित्य राहण्या साठी सद्गुरू सुद्धा सिद्ध आहेतच. पण आपण आपली साधना, भोग भोगुनच संपणार यावरील निष्ठा आणि सद्गुरूवर श्रद्धा दृढ ठेवली पाहिजे. 

श्रद्धा व निष्ठा या कोणत्याही क्षेत्रातील ध्येयाचा प्राण आहेत. इथे तर असं क्षेत्र आहे, ज्यामधील पुढले परिणाम, घडून आल्या शिवाय दिसत नाहीत व जाणवत सुद्धा नाहीत. म्हणजेच सुखाचे दिवस संपून भोगांचे दिवस सुरू झाले की आपल्या लक्षात येतं किंवा कधी माया भ्रम यामुळे लक्षात येतही नाही.पण आत्म्याला व मनाला जाणवतं की, हे पूर्व कर्मांचं फल आहे. 

ज्यावेळी आपल्या वागण्यातून, कर्मातून, बोलण्यातून चूक होऊन गेलेली असते. त्यावर आता विचार करण्यात काहीही अर्थ नसतो. पण यातही सद्गुरू कृपेने दोन मार्ग उपलब्ध असतात. अर्थात त्यानुसार योग्य ते करण्याचा अधिकार आणि विकल्पांची यशस्वीता ही केवळ सद्गुरू कृपेवर अवलंबून आहे. 

यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...