Skip to main content

भोग आणि ईश्वर २१२

भोग आणि ईश्वर  २१२

भक्तिमार्गात येण्यासाठी भगवंतांनी एक सांगितलं आहे की, चित्त शुद्धी ही पहिली पायरी आहे. म्हणून नामाची सुरवात करताना, प्रथम संकल्प  चित्तशुद्धी हा असावा.  चित्तशुद्धीवर मागे काही भागात विस्ताराने लिहिलं आहे. त्यामुळे आता त्यावर न बोलता, मनःशांतीच्या मार्गातील दोन मुख्य शत्रू काम व क्रोध यावर बोलू. 

वास्तविक मनुष्याचा स्थायी स्वभाव हा जन्मतः लिहिलेला असतो, त्याच्या संचितानुसार. त्यामुळे मूळ स्वभावाची वा वृत्तीची ही मुळी जन्मतः खरतर दृढ अर्थात घट्ट असते. म्हणूनच आपण एखाद्याबद्दल बोलताना म्हणतो की, तो थोडा तुसडा आहे, तो रागीट आहे, तो शांत आहे, तो चिकित्सक आहे, इत्यादी इत्यादी. 

म्हणजेच माणसाला मूलतः जे प्राप्त आहे त्यानुसार त्याचं पुढील कर्म घडत जाणार. अर्थात, त्यानुसार त्याची पुढील कर्मगती ठरणार आणि पुढील कर्मफल. आधीच्या कर्माने त्याने प्राप्त भोग, उपभोग योग हे सर्व ठरवलेलं असतं. म्हणजेच रागीट असल्याने, क्रोधाने अयोग्य कृती करणं, क्रोधात संबंध तोडणं, त्यासाठी भांडणं करणं, रागाच्या भरात वाईट बोलणं इत्यादी सर्व, जे घडणाऱ्या  कर्मफला  बद्दल योग्य आहे आणि त्याप्रमाणे घडणार सुदधा , जसे मागील कर्माचे दोष तसे असतील तर.

म्हणजे यातून दोन शक्यता गृहीत धरता येतील. एक म्हणजे यांच्या स्वभावामुळे भोग, दुःख, दैन्य, नुकसान याला स्वतःला आणि याच्या संबंधितांना प्राप्त होणं. दुसरं म्हणजे यांच्या स्वभावामुळे ज्यांच्याशी भांडणं होणार, ज्यांना ऐकून घ्यावं लागेल, त्यांचाही योग तोच असणार, हे ऋण आणि ऋणानुबंध नियमानुसार नक्कीच. मग भगवंत स्वतः गीतेत सांगतात की, 
क्रोधात भवति समोहात .........., हे कशाच्या संदर्भात. 

कारण हरिवचन आहे, म्हणजे त्याचं मोल अनंत आहे. त्याचाच परामर्ष आज घेऊया. भगवंतांनी सांगितलेलं हे वचन सावध करण्यासाठी आहे. आता ईश्वरवचनाची खात्री आणि उपयुक्तता ही फक्त पुढील कर्मांसाठी आहे असं मानायचं का. पण मग तेच भगवंत हमीपत्र देतात की, योगक्षेमं वहात्म्याहं, ते कशासाठी. बर संपूर्ण भगवत गीता ही तुकड्या तुकड्याने जोडायची नाही. ती एकाच क्षत्री, एकाच व्यक्तीसमोर सलगपणे कथन केलेली आहे.

अर्थातच,  या दोन उक्तीचा वा श्लोकांचा किंवा वचनांचा संबंध आहे हे नक्की. कसा, तर क्रोधाच्या कारणांमुळे येणाऱ्या कर्मफळाला त्यागण्यासाठी, योगीयांचा योगी, श्रीयोगेश्वर, याला, त्याच्या अनंत रुपांपैकी एका रुपाला, नित स्मरून नित्य शरण जाणं.  याने काय साध्य होईल, तर ज्यावेळेला आपल्या कर्मफलानुसार, क्रोध हा पाशवी होऊन, आपल्या फळासाठी कार्य करेल, त्यावेळी, नामाची व शरणागतीची देवता आपल्याला व आपल्या क्रोधाला त्यागण्यासाठी, आपल्या स्मरणात क्रोधाचे परिणाम आणून देऊन, त्या परिणामांतून नक्कीच बाहेर येण्यासाठी सावध करणार. 

फक्त त्यावेळी तो अंतरातम्यातून प्राप्त झालेला संकेत धरून, त्याप्रमाणे क्रोध टाळण्यासाठी, आपण जागृत व जागरूक असणं जरूर आहे. यासाठीच जिव्हेला, मनाला व बुद्धीला नित्य नामाची सवय असेल तर, अश्या प्रसंगी प्राप्त झालेल्या , सद्गुरू वा ईश्वर संदेशांचं, आकलन होऊन त्याप्रमाणे योग्य कृती नक्की घडेल. तशी सद्बुद्धी नक्की होईल. पण मग आपल्याबरोबर ज्याचं ऋण लिहिलं आहे आणि आपण कर्म टाळल्यामुळे , आपण तर त्या नवीन तयार होणाऱ्या ऋणातून मुक्त झालो, पण त्याचं काय. याचा परामर्ष उद्याच्या भागात घेऊया. तोपर्यंत नाम जरूर घ्या, एकेक षड्रिपु टाकण्याच्या संकल्पाने नाम घ्या. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३०/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...