Skip to main content

हलकं फुलकं ४ ( एका दिवसात तीन जीवदानं)

 हलकं फुलकं ४ ( एका दिवसात तीन जीवदानं)

कधी देव उगाच खुश असतो कि काय, असं वाटतं. नव्हे तसा अनुभव एकाच दिवसात तीन वेळा येणं म्हणजे ग्रेट. अगदी परवाचीच गोष्ट. 

जीवदान १ ः

वर्क़ फ्रॉम होम स्किममध्ये घरातून ऑफिसचं काम करत होतो. सकाळचीच वेळ. नेहमीच्याच शिरस्त्याप्रमाणे होम मिनिस्टर केर काढण्याचा प्लान करणार म्हणून माझ्या जेवढ्या वस्तू खाली लादिवर होत्या त्या काढून वर ठेवल्या. पण तरिही नेमकी एक वस्तू खालीच राहिली आणि केर काढताना एक जळजळीत कटाक्ष टाकून होम मिनिस्टर आपलं काम करून निघून गेल्या, काही न बोलता. 


जीवदान २ः

त्यानंतर माझं काम रितसर सुरु झालं. बराच वेळ गेला आणि अचानक HM बाहेरून धावत धावत आत आल्या. माझं लक्ष नव्हतं, पण पाणी भरून ठेवलेला तांब्या खरतर लवंडला होता, फार पाणी नसल्यामुळे, माझ्या लक्षात आलं नाही. त्यामुळे HM आले की काय असं वाटून मी पटकन चेअरवरून उतरलो आणि पुसायला फडकं आणायला धावलो. येऊन बघतो, तर ती बेडरूमच्या फ्रेंच विंडोकडे धावली,  बाहेरून काहीतरी आवाज आला होता, त्याकडे बघायला ही गेली. मी आणलेलं फडकं पुसून तिथेच ठेवलं. जाताना तिने बघितलं. पण तिला वाटलं कि तिनेच आणून ठेवलं आणि विसरली असावी. म्हणून काहीहि न बोलता, फडकं उचलून निघून गेली. 


जीवदान ३ः 

रात्री जेवताना,नेहमीच्या सवयीप्रमाणे आमटी घेताना थोडी सांडली, पण ही अर्थातच टीव्हीवरील सिरीयल बघण्यात गुंग असल्यामुळे तीने बघितलं नाही. आमची लादी स्पर्टेक्स आहे म्हणून ही सर्व काळजी. मी मुलीला हळूच खुण करून, हे नंतर नीट पुसून घ्यायला सांगितलं. अर्थातच तिने सरळ होकार दिला नाही, उगाचच नाक बिक फेंदारून काय हे, अशी खुण केली आणि हो म्हटलं. कर्मधर्मसंयोगाने, थोड्याच वेळात हिने आमटी घेतली आणि हिच्या हातून घेताना त्याच स्पॉटवर थोडीशी सांडली. खरतर हिच्या हातून फारच  कमी सांडली होती. पण सिरियलच्या नादात, हिला वाटलं, हिच्या हातून जास्त सांडली. आमच्याकडे फक्त तिने बघितलं. अर्थातच अश्यावेळी, आपलं लक्ष नव्हतं हे दाखवण्याची कला माझ्या अंगी पहिल्यापासून असल्यामुळे, मी पटकन मान वळवून सिरियलमध्ये मग्न असल्याचं दाखवलं. हिला वाटलं चला कोणी बघितलं नाही. नंतर पुसून घेऊ, असा विचार हिने केला असावा, असा मी अंदाज बांधला. 

एकाच दिवशी तीन जीवदानं मिळण्याचं महत भाग्य मला लाभलं, म्हणून मी झोपताना देवाचे विशेष आभार मानले. देवपण म्हणाला अशी संधी युगानुयुगात कधीतरी कोणालातरी देतो मी. आज तुझा क्रमांक लागला, इतकच. 


© ® संकल्पना आणि लेखन  ः प्रसन्न आठवले. 

०१/०६/२०२१

 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...