Skip to main content

सुभद्राहरण १८

सुभद्राहरण १८
ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
समस्त द्वारकावासी उत्सवाच्या तयारीला लागले. यात्रेला जाण्याची धामधूम सुरू झाली. ललना साजशृंगाराला लागल्या. पुरुष मंडळी जरुरी सामान शकटात अर्थात घोडागाडीत भरून त्यांची तयारी करू लागले. व्यापारी आपला विक्रीचा माल शकटात भरून सेवक वर्गाशी ने आण करावयाच्या मोबदल्याबद्दल घासाघीस करत होते. ज्यांची मोबदल्याची बोलणी अंतिम होत होती ते व्यापारी आपला माल सेवकांकरवी एक वा एकापेक्षा जास्त शकटात भरून निघण्याच्या तयारीत होते.
कपडालत्ता, दागदागिने, लाकडी खेळणी, शोभेच्या वस्तू, साजशृंगाराचे सामान अश्या अनेक वस्तूंनी शकटं भरू लागली. भरलेली शकटं सैनिक व्यवस्थेत द्वारका नगरीच्या सीमेपर्यंत नेऊन उभी करण्यात आली. सर्वात जास्त शकटं साजशृंगार , दागदागिने, हिरे रत्ने , मोती यांची होती. अर्थातच द्वारकेत सुबत्ता असल्याकारणे यात्रेत आलेले जन या प्रकारच्या वस्तू जास्त घेणार याची व्यापारी मंडळींना अनुभवामुळे खात्री होती.
हा रैवतक पर्वतावरील महाशक्तीचा उत्सव म्हणजे एक पर्वणीच होती. वृष्णी संघ, भोज आणि अंधक वंशाचे लोक हा उत्सव आयोजित करत असत. रैवतक पर्वतावरील महाशक्ती अर्थात देवीचा हा उत्सव व त्यानिमित्ताने प्रतिवर्षी भरणारी ही यात्रा असे. ज्यामध्ये द्वारकेत आल्यापासून यादव देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत. या उत्सवात सर्वसामान्य जनता उत्साहपूर्वक सहभागी होऊन, देवदर्शन व त्याबरोबर मनोरंजन, सामान , रत्न, हिरे मोती दागदागिने कपडेलत्ते यांची अमाप खरेदी करत असे.
दरवर्षीच्या या उत्सवासाठी सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात येत असे. समस्त सहभागी द्वारकाविसीयांसाठी निम्म्याहून अधिक चतुरंग दळभार त्यांच्या सोबत जात असे. कारण संपूर्ण राजपरिवार या उत्सवाला उत्साहात जात असे. याचकारणे, दळभाराचे दोन भाग करण्यात येत असत. एक जे रैवतक उत्सवाला सुरक्षेसाठी जात ते आणि जे द्वारकेच्या सुरक्षेसाठी द्वारकेत राहून सर्व व्यवस्था , द्वारका, राजप्रासाद रिकामी असलेली घरं यांच्या सुरक्षेसाठी मागे अर्थात द्वारकेत ठेवले जात ते.
अर्थातच जे रैवतक उत्सवाला सुरक्षेसाठी जात त्यांना आनंद होत असे. हा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी प्रतिवर्षी अशी व्यवस्था केली जात असे की ज्यांना आधीच्या वर्षी जायला मिळालं नाही ते या वर्षी सुरक्षाव्यवस्थेसाठी उत्सवाला जात असत. जेणेकरून प्रत्येकाला हा आनंद घेता यावा. म्हणजेच कोणावर अन्याय झाला असं कोणालाही वाटायला नको.
सर्वसामान्य जनता तर हळू हळू तयार होऊन नगरसीमेपाशी जमा होऊ लागली आहे. सैन्यव्यवस्था चोख तयार होऊन आपल्या सुरक्षेची तालीम करत उभी आहे. प्रत्येकाला मिळालेल्या सुचनेचं त्यांचे त्यांचे वरिष्ठ वा गटप्रमुख पुन्हा एकदा पालन करण्याचा आदेश देत आहेत. काही सेना मागे काही मध्ये मध्ये आणि काही सर्वात पुढे अशी व्यवस्था करून सर्व सज्ज आहेत निघण्याच्या आदेशाची प्रतीक्षा करत.
हळू हळू राजप्रसादातून प्रमुख मंडळी अर्थात वसुदेव देवकी, उग्रसेन, दादा बलराम रेवतीदेवी, कृष्ण रुक्मिणी यांसह समस्त स्रीवर्ग तयार होऊन आपापल्या रथात आरूढ होतच आहेत. अर्थात ज्याप्रमाणे स्रीवर्गाची तयारी शेवटपर्यंत पूर्ण होत नाही तेच इथेही घडत आहे. निघे निघेपर्यंत स्त्रियांना काहीतरी राहिलं असच सतत वाटत आहे. म्हणून समस्त पुरुषवर्गाने आपापल्या स्त्रियांना बळेबळेच बाहेर काढलं. रुक्मिणी रथारुढ होऊन कृष्णाच्या प्रतीक्षेत आहे आणि अर्थातच आता सर्वांचं लक्ष कृष्ण व कृष्ण भगिनी सुभद्रा यांच्या अगमनाकडे लागलंय.
क्रमशः
भाग १८ समाप्त

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll शुभम भवतू ll
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...