Skip to main content

सुभद्राहरण १७

सुभद्राहरण १७

ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll
 
पिताश्री आणि दादा यांची अनुमती मिळताच कृष्णाने त्वरित दोन रथ मागवून पिताश्री आणि दादा यांना संदेश पाठवून आपण रथासमीप प्रतीक्षेत उभा राहिला.  थोड्याच वेळात पिताश्री वसुदेव आणि दादा बलराम आले आणि दोन्ही रथ निघाले. एका रथात स्वतः पिताश्री आणि एका रथात दादा आणि श्रीकृष्ण.

रथ अर्थातच द्वारकेच्या वेशीवर असलेल्या आश्रमात जाऊन थांबला. विस्तीर्ण जागेत वनवेली, झाडं, मोठमोठे वृक्ष घनदाट झाडी यांच्या मध्ये अनेक पर्णकुटी उभारून पांथस्थ योगी, सिद्धपुरुष, ऋषी, मुनिवर  यांच्या विश्रामासाठी उत्तम व्यवस्था , उत्तम सेवकवर्ग, शांत परिसर, पशुपक्षी यांचा मुक्त वास असलेला हा  आश्रम एक आदर्श ठिकाण होतं. 

येथे आल्यावर सिद्धयोगी महर्षी यांना ध्यानधारणेसाठी अत्युत्तम ठिकाण असलेल्या त्या आश्रमात तिघांनी प्रवेश केला. त्या काळच्या प्रथेनुसार व परंपरेनुसार आपल्याच राज्यात असलेल्या या आश्रमात प्रवेश करून त्यांनी त्या सिद्धयोगीच्या पर्णकुटीत येण्याची अनुमती मिळवण्यासाठी सेवकांकरवी निरोप  पाठवला. अर्थात तपस्विनी त्यांना भेटण्याची अनुमती दिली. 

तिघांनी कुटीच्या बाहेर आपल्या मोजड्या काढून अत्यंत आदरपूर्वक कुटीत प्रवेश केला. वसुदेवांनी सर्वात पुढे होत योगीना प्रणाम केला.

" हे महातपस्वी , योगीराज आपण द्वारकेत येऊन आमच्या द्वारकेची शोभा वाढवलीत आणि कृष्णाच्या विनंतीचा मान ठेवलात. त्याबद्दल समस्त द्वारकावासीयांतर्फे आपले आभार. आता चतुर्मासाचे चार महिने आपण आमच्या अतिथ्याचा स्वीकार करावा." 

तपस्वी वेशातील अर्जुनाने अर्थातच याचा स्वीकार करून संतोष व्यक्त केला. अर्जुनाला या तापसी वेशात कृष्णाशिवाय अन्य कोणीही  ओळखलं नसल्याकारणे कृष्ण व अर्जुन दोघेही मनात आनंदी होते.  आश्रमातील व्यवस्था पाहून व स्वामींच्या आदरातिथ्यात काही कमतरता राहणार नाही याची पूर्ण पाहणी करून सेवकांना उपयुक्त सूचना देऊन आणि कृष्णाला विशेष दायित्व देऊन तिघे पुनः राजप्रासादी परतले. 

ठरल्याप्रमाणे कृष्ण स्वतः येऊन आश्रमाची आणि स्वामींची व्यवस्था नियमित पाहत होता. याचदरम्यान चातुर्मासातील इतर उत्सवांप्रमाणे द्वारकाविसीयांचा आवडता व त्यांचा उत्साह व उल्हास वर्धित करणारा रैवतक पर्वतावरील महाशक्तीच्या यात्रेचा उत्सव सुरू होणार होता. त्याकारणे समस्त द्वारकावासी त्याच्या तयारीला लागले. यात्रेला जाण्याची धामधूम सुरू झाली.

क्रमशः

भाग १७ समाप्त 
११/०४/२०२०
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
ll शुभम भवतू ll 
ll श्रीकृष्णार्पणामस्तु ll जय श्रीकृष्ण ll

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...