Skip to main content

कर्म गती सिद्धांत



  ।। कर्म गती सिद्धांत ।।


हे मानवा , हे बघ संपूर्ण ब्रह्मांड. याच संपूर्ण अस्तित्व, चलन, आणि अंत माझ्यापासून सुरु होतो. माझ्यातच याची समाप्ती. सर्व चल ,अचल , जीव - सजीव अथवा निर्जीव श्रुष्टीचा कर्ता , धर्ता , हर्ता  मीच आहे. इथल्या प्रत्येक प्राणीमात्रावर मी लक्ष ठेवून आहे. 

देवा इथे एक शंका आहे देवा . 

बोल मी त्याच साठी आलोय. 

सजीव ठीक आहे पण निर्जीव वस्तू वर  नजर, म्हणजे. 

अरे तुझ्या दृष्टीने ती निर्जीव म्हणून मीही निर्जीव म्हणालो. अन्यथा या जगात अस्तित्वात असलेल्या आणि, निर्माण होऊन नष्ट झालेल्या प्रत्येक गोष्टीच महत्व आणि स्थानमहात्म्य मी जाणतो. तू जाणत नाहीस इतकच . आणि या ब्रह्मांडाच चलन अहेतुक, नसून हेतुपूर्ण आहे. ते सतत , निरंतर, व्यवहारी राहावं याचसाठी कर्मसिद्धांताची निर्मिती केली. सर्व गोष्टी आपसूक, कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय व्हावयात सुरळीत आणि स्वयंचलित पणे व्हाव यासाठीची सर्व व्यवस्था मी केली आहे. कर्माच्या कोणत्याही व्यवहारात मी कधीही हस्तक्षेप करत नाही. मग चमत्कार वगैरे जे आम्ही म्हणतो ते कसे करता, अथवा होतात. मुळात तुम्ही ज्याला चमत्कार म्हणता तो कर्मसिद्धांताचा एक भाग असतो. कोणाच्याही कर्मात जर एखादी गोष्ट, वस्तू, व्यक्ती त्याची त्याने लिहून ठेवली असेल, तर ती त्याला मिळण्यापासून जगातील कोणतीही व्यक्ती,  शक्ती, वा युक्ती त्यापासून त्याला वंचित करूच शकत नाही. इतका साधा आणि सोप्पा  सिद्धांत प्राणी मात्राना अवगत असून, वेळोवेळी मी सांगत असून सुद्धा समजत नाही , हे खरंच खेदजनक आहे. आणि याच सिद्धांतावर त्यांना कर्मफल मिळते आणि  अपेक्षित असते , पण तरी ते नाकारण्याचा हट्ट असतो. जे आपल्या समोर आलं ते आपलच कर्मफल आहे हे ज्ञात नसावं हे अतर्क्य आहे. 

देवा यात मला काही प्रश्न, उपप्रश्न आहेत. 

ठीक आहे आज इतकच. उद्या बोलू सवडीने. 

क्रमशः 

प्रसन्न आठवले 






Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...