Skip to main content

भ्रमरांप्रमाणे गुंजे सदा



भवरे कि गुंजन 

भ्रमरांप्रमाणे गुंजे सदा 
मन हे तराणे गायी सदा 
प्रेमात ग तुझिया सखे 

हृदयात या तुझी प्रीत ही 
श्वासात माझ्या तुझा गंध हा 
जागी या जणू मी आलो सखे  
तुझे हात हात असे भास हा 

भ्रमराप्रमाणे ....... 

क्षितिजापुढे प्रेम माझे सखे 
तुला बाहणे मना आस हि 
तुझे पाहणे मज सुखावे सखे 
हृदयात जागा तुझी खास हि 
भ्रमराप्रमाणे ...... 

कवी : प्रसन्न आठवले. 
१०/०४/२०१७
१५. ३८

Comments