Skip to main content

राम अनुज भरत भाग २६

राम अनुज भरत भाग २६

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

तिघेही, पर्णकुटी बाहेर निघाले. परिसरात फेरफटका मारायला निघाल्यावर, आश्रमापासून जवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने, प्रभू निघाले. जल प्रवाह दृष्टिक्षेपात आल्यावर,भगवान श्रीराम सीतेला म्हणाले. 

" हे वैदेही, ते बघ, इथून मंदाकिनी नदीच्या पात्राकडे पाहा. स्फटिकासमान वाहणाऱ्या या जलप्रवाहाने हा प्रदेश किती सुशोभित केला आहे. निर्झर वाहणाऱ्या या शुभ्र जलाने, हा प्रदेश किती समृद्ध केला आहे. बघ सीते, मंदाकिनी नदीच्या दोन्ही किनारी, मनमोहक, सुवासिक आणि सुंदर फुलांच्या भाराने झुकलेली झाडं दिसत आहेत. जणू त्या घनदाट फुलझाडांनी त्या नदीच्या पात्राला वेढून टाकलं आहे. त्या फुलझाडांना त्या नदीच्या जलानें,जणू अमृप्राशन करवून,त्या झाडांची निगा राखली आहे,असच भासत आहे. अनंत,कण्हेर,बकुळ, सुवर्णचंपा नागचंपा, जाई,जुई, मंदार, निशिगंध, मालती, मोगरा, पारिजात अश्या अनेक विध फुलांनी त्या किनाऱ्याला, जणू मोहिनी घातली आहे. 

या भूमीवर एकदा आलेला कोणताही मानव, इथून पुन्हा जाण्याचा विचारसुद्धा करू शकणार नाही. मला तर अशी इच्छा निर्माण झाली आहे की, मी, तू आणि लक्ष्मण यांच्या सह, वनवासाची चौदा वर्ष, अश्या निसर्गाच्या सान्निध्यात सहज पूर्ण करू शकेन. मंदाकिनीनदीच्या पात्रापासून आपण थोडे दूर आलो की, वृक्षराजीनी नटलेलं घनदाट वन आहे. ज्यामधे आम्र, जम्बुल, पिप्पल, अर्थात पिंपळ, वट, धव, प्रियाल, अंकोल, तामृवृक्ष, बेल, तेंदू, मधूकर्णिका, कडुनिंब, सेतुवृक्ष, बोर, आवळा, कदंब इत्यादी घनदाट सावली देणारे वृक्ष आहेत. 

त्याचं बरोबर, करवंदाच्या जाळी, इतक्या घनदाट आहेत की, त्याच्या आत, सूर्यकिरण पोचू शकत नाहीत. एकूणच या सर्व विपुल आणि विशाल वृक्षराजीनी बहरलेल्या प्रदेशातील वनात,सूर्याच्या किरणांना आत प्रवेश करायला जणू मज्जाव आहे. ही वनातील पायवाट दिसत आहे ती येथील मुलवासी लोकांच्या येण्याजाण्याची मार्गिका आहे. या शूर आणि स्वाभिमानी मुलनिवासी जनांना, येथील वन्य व हिंस्त्र पशू सुद्धा बिचकुन असतात. आपल्या मानवी देहाचा एक विशिष्ट प्रकारचा गंध ओळखून वन्य प्राणी आपली चाहूल घेऊन, आपल्या मागावर येतात.

पण हे मुलवासी येथील एका झाडाचा विशिष्ट द्रव काढून, त्याचं रोगण आपल्या सर्वांगाला लावून मग, या वनात, कंद मूळ, फळं, आपलं खाद्य त्याचप्रमाणे शिकारीसाठी करण्या साठी बाहेर पडतात. ज्यामुळे त्यांना वनातील हिस्त्र श्वापदांच भय रहात नाही. इथून जवळच त्यांची वस्ती आहे. आपल्याला जाता जाता त्यांना पाहण्याची संधी मिळेल." 

पुढे फिरत असताना, दुरून एका मुलवासी असलेल्या वस्तीवरून प्रभू जात असताना, प्रभूंनी एका शाकारून तयार असलेल्या, काही घरांच्या वस्तीकडे अंगुलीनिर्देश केला आणि प्रभू म्हणाले

" हे आर्ये, समोर दूर अंतरावर बघितलस तर तुला दिसेल की, काही नरनारी, त्या घराबाहेर उभे राहून, वार्तालाप करत आहेत. त्यातील पुरुष अत्यंत दणकट, चपळ आणि चलाख असतात. अनेक महाकाय प्राण्यांची सुद्धा शिकार करायला ते सक्षम असतात. या निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्यभर रहात असल्याकारणाने, त्यांना या घनदाट वनातील, धोका दायक जीवनाशी जुळवून घेताना, चाणाक्षपणा, चपळाई आणि कमालीची ऊर्जा व शक्ति बाळगणं क्रमप्राप्त असतं. 

याचसाठी त्यांना सतत शस्त्रसज्ज आणि अत्यंत सतर्क राहणं जरूरीचं आहे. यांना बाहेरून आलेल्या आगंतुक व अनोळखी व्यक्तींमधे सद्हेतू व गैरहेतू ने प्रेरित असलेली व्यक्ती नजरेने ओळखता येते. वनातील आयुष्य याना कमालीची चतुराई व आलेल्या जीवाचा उद्देश समज ण्याची कला शिकवते. म्हणूनच याना मनाने जिंकण सहजी शक्य आहे. पण शस्त्राने जिंकण महाकठीण कार्य आहे. कारण प्राण्यांच्या चपळाईशी सामना करता करता, याना चपळाईने शस्त्र चालवण्याची हातोटी साध्य करून देते. 

प्रभू आपल्या कोमल वाणीने, सुकोमल जनंक नंदिनी राजदुलारी, विदेहकन्या देवी मैथिली हिला सर्व काही समजावून सांगत होते. प्रभू अत्यंत मृदू वाणीने, अत्यंत शांत व गंभीर स्वरात बोलत असत. हे प्रभुंचं वैशिष्ट्य होतं. कोणत्याही व्यक्तीला, ची अत्यंत गोड, मृदू आणि रसदार वाणी संमोहित करून, भारून टाकत असे. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०४/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...